Thursday, 20 October 2022


मुंबईतील रुग्णालयांचा कायापालट करणार

 मुंबईतील रुग्णालयांचा कायापालट करणार

- मंत्री दीपक केसरकर

· सर जे. जे., कामा रुग्णालयाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट.

मुंबई, दि. 19 : सर जे. जे. रुग्णालय व कामा रुग्णालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यात येण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) व राज्य शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सर जे. जे. रुग्णालय व कामा रुग्णालयांना भेटी दरम्यान मंत्री श्री. केसरकर बोलत होते. आगामी काळात मुंबईतील रुग्णालयांचा पायाभूत व मुलभूत सुविधांसह कायापालट झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न व्हावे, अशा सूचनाही त्यांनी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सर जे. जे. रुग्णालय व कामा रुग्णालयांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व रुग्णालयासाठी आवश्यक साधनसुविधा याबाबत माहिती जाणून घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सर जे. जे. रुग्णालयात कार्डिओलॉजी विभाग, नवीन कॅथलॅब, सर्जिकल विभाग, ओपीडी विभाग तसेच रुग्णांसाठीचे स्वयंपाकगृह, सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील सोयी सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.


यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ. अशोकानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरवसे, कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे, मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष माने यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी सर जे. जे. रुग्णालयातील सद्यस्थितीतील उपलब्ध सोयी सुविधा व रुग्णालयाच्या समस्यांबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी मंत्री श्री. केसरकर यांना अवगत केले. 


           मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सर जे. जे. महाविद्यालयातील शिकणारे विद्यार्थी व रुग्णांना लागणाऱ्या व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये आवश्यक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जे. जे. रुग्णालयाचा परिसर जुना असून येथील बऱ्याच वस्तू जुन्या व जीर्णावस्थेत आहेत. विद्यार्थी वसतिगृहाच्या ठिकाणी दर्जेदार सुविधा उपलब्ध करणे, वीजेची व्यवस्था करणे, इमारतीचे रंगकाम करणे अशा विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नवीन क्रीडा संकुल निर्मितीसाठी

 नवीन क्रीडा संकुल निर्मितीसाठी प्रशासकीय कार्यवाही गतीने करावी

-   क्रीडा मंत्री गिरीश महाजन

 

मुंबई दि. 19:  विभागजिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाच्या बांधकामास गती द्यावी. नवीन क्रीडा संकुलासाठीची आवश्यक मान्यतेसंदर्भात प्रशासकीय कार्यवाही गतीने करण्याची सूचना सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

           मुंबई येथील क्रीडा विभागाकडील मैदानेस्टेडियमजागा - खेळपट्टीबाबत तसेच राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा विभागाअंतर्गत खेळाडूंसाठी उपलब्ध क्रीडा संकुलत्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी घेतलात्यावेळी ते बोलत होते. क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओलआयुक्त सुहास दिवसेमुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरउपसचिव सुनील हांजेमुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीराज्यात 155 क्रीडा संकुले आहेत. त्यांचा योग्य वापर आणि क्रीडापटूंना त्याचा लाभ मिळावा यासंदर्भात पाहणी करण्यात यावी. प्रगतीपथावरील 122 क्रीडा संकुलांच्या बांधकामास गती द्यावी. नवीन क्रीडा संकुल निर्मितीकरिता शासनाने निश्चित केलेल्या अनुदानानुसार प्रशासकीय मान्यता द्यावी. बहुउद्देशीय सभागृहमुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेचशासकीय अनुदान मर्यादेबाहेर आलेले प्रस्ताव तपासून त्यामध्ये कोणत्या सुविधा खेळाडूंसाठी प्रस्तावित आहेतहे तपासून अनुदान मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करावीअसे त्यांनी सांगितले.

            मुंबईतील आझाद मैदानक्रॉस मैदानओव्हल मैदानकुपरेजमहाराष्ट्र लॉन टेनिसमुंबई हॉकी असोसिएशनवानखेडे मैदान या मैदानांसह क्रीडा विभागाच्या जागांवर कार्यरत असणाऱ्या संस्थांसोबत जमिनीचा भाडेतत्वावरील करार करताना शासकीय खेळाडूंना सुविधा तसेच वेळ देण्यासंदर्भात नियम करण्यात यावेत,  अशाही सूचना मंत्री श्री. महाजन यांनी केल्या.


दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (युडीआयडी कार्ड) वितरण

 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे

(युडीआयडी कार्डवितरण

 

          मुंबई, दि. 20 :- मुंबई उपनगरातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (UDID CARD) वितरण सुरु झाले आहे. दिव्यांगानी वैश्विक ओळखपत्र चेंबूर, कलेक्टर कॉलनी येथील रोचीराम टी थडानी स्कुल फॉर हिअरिंग हॅन्डीकॅप येथून या ओळखपत्राचे  वितरण सुरु असल्याची माहिती मुंबई उपनगरच्या समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी दिली.

          वैश्विक ओळखपत्राद्वारे केंद्राच्या व राज्यसरकारच्या विविध योजना व सवलतींचा लाभ दिव्यांगांना घेता येतो. मुंबई उपनगरातील दिव्यांगांनी सोमवार ते शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत आपले आधार कार्ड घेऊन वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) प्राप्त करून घ्यावे, असे अवाहनही त्यांनी केले.   

000

एकल वापर प्लास्टिकबंदी

 एकल वापर प्लास्टिकबंदीचीकडकअंमलबजावणी करणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

        मुंबईदि. 20 :- राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईलअशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.           

            वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2022 अंतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरसहकार मंत्री अतुल सावेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईमुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तवपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडेप्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आणि कुलाबा येथील शाळेतील तसेच कमला मेहता अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेकोरोनाच्या प्रादूर्भावामुळे असलेले निर्बंध संपून आता सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी सण देखील उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. मागील काही वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी ध्वनी आणि हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले.

            विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी संदेश पोहोचतो त्‍यामुळे दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे वर्षभर जनजागृती करण्यात येत असल्याची पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.

        कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सिद्धी निकम या दिव्यांग विद्यार्थींनीने आपण वसुंधरेचे रक्षक बनून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करूयातअसे आवाहन यावेळी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित सर्वांना केले. शासनाने एकल वापराच्या प्लास्टिक वापरावर पूर्ण बंदी आणावी तरदैनंदिन वापरात नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावाअशी विनंतीही तिने केली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण रक्षणाची शपथ

           ‘भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांच निसर्गाशी अतूट नातं आहे. आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू.

            आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो कीदैनंदिन जीवनात ज्या सिंगल युज प्लास्टिकमुळे प्रदूषण होते त्याचा वापर करणे आम्ही टाळू.

            आम्ही असाही संकल्प करतो कीसमृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरीता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लाऊ व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.

            दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाशया दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरीता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.

            आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो कीवर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.


अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी

 अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणी दिवशीमुंबई उपनगरात मद्य विक्री नाही

 

            मुंबई उपनगरदि. २० : मुंबई उपनगरातील १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया तर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया खुल्यामुक्त व निर्भय वातावरणात पार पडाव्यायासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी ते मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

            पूर्वेस मिठी नदी -१६८ चांदिवली पासून दक्षिणेस सहर रोडबाप नाला - १६७विलेपार्लेपर्यंत तसेच पश्चिमेच्या पश्चिम रेल्वे ट्रॅक -१६८ अंधेरी पश्चिम पासून उत्तरेस जत्वार नगर रोड नंबर ५जे.व्ही.एल.आर. रोड -१५८ या परिसरातील सर्व मद्य परवाने बंद असतील. हा बंद कालावधी मतदानाच्या ४८ तासांपूर्वी म्हणजेच दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा मतदान संपेपर्यंत असेल. त्याच प्रमाणेमतमोजणीच्या दिवशी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

            सबब दिनांक १ नोव्हेंबर (सायंकाळी ६ पासून)२ नोव्हेंबर३ नोव्हेंबर (मतदान संपेपर्यंत) आणि ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुंबई उपनगरातील नमूद परिक्षेत्रात मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून फौजदारी कारवाई केली जाईलअसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.

000

पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे

 पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर करा

- रविंद्र चव्हाण.

            मुंबई, दि. 20 : पालघरच्या जिल्हा क्रीडा संकूल समितीची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युद्धपातळीवर करण्यात यावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.


            पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलसंदर्भात स्थापन केलेल्या समितीची बैठक आज श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, महापालिका आयुक्त अनिल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.जी.पालवे, पालघरचे जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, क्रीडा विभागाचे प्रभारी उपसंचालक स्नेहल साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, पालघरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, प्र.जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.


            पालघरमध्ये 16 एकरच्या प्रशस्त भूखंडावर जिल्हा क्रीडा संकूल प्रस्तावित करण्यात आले आहे. या संकूलाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर झालेला असून दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. संकूल उभारणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया आठवड्याभरात सुरु करुन पुढील कार्यवाही तातडीने करण्याची सूचना श्री. चव्हाण यांनी दिली.


            श्री. चव्हाण यांनी प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांचा आढावा घेतला. या क्रीडा सुविधांमध्ये 400 मीटरचा ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, विविध खेळांची क्रीडांगणे, फीटनेस सेंटर, जलतरण तलाव, इनडोअर मॉल, मुलामुलींचे वसतिगृह, खेळाचे साहित्य आदी विविध बाबींचा समावेश आहे.

            प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने परिपूर्ण होतील व हे काम उत्कृष्टरित्या पार पडेल याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत संकुलाच्या उभारणीच्या कामात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग व त्यांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.


****


संध्या गरवारे/विसंअ/

Featured post

Lakshvedhi