Wednesday, 19 October 2022

गुलाब चे फुला


 

हसले रे क्षण माझे


 

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरण

 साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे

मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधान मंत्र्यांना विनंती

 

        मुंबई, दि. १८ : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.

            आपल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, २०२१-२२ मध्ये साखर निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारने खुले धोरण स्वीकारल्याने जगात साखर निर्यातीत भारत मोठा निर्यातदार ठरला.  यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि परकीय चलन सुद्धा वाढले.

            यंदापासून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे असे कळते.  मात्र, ही पद्धत आपल्या कारखानदारांना तोट्याचीच आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, मार्चपर्यंत देशातला गळीताचा हंगाम संपतो.  १ एप्रिलपासून ब्राझील मधील हंगाम सुरु होतो आणि स्पर्धा निर्माण होऊन इतर साखर निर्यातदार देशांना त्याचा लाभ होतो.  शासनाला साखर निर्यातीसाठी कोणतेही अर्थसहाय करावे लागत नाही.  कोटा पद्धतीमुळे ज्या कारखान्यांना निर्यातीत रुची नाही ते देखील प्रत्यक्ष निर्यात न करता पैसा कमविण्यासाठी त्यांचा कोटा इतरांना हस्तांतरित करू शकतात.  कोटा पद्धतीमुळे अनावश्यकरित्या प्रशासकीय अडथळे निर्माण होतील तसेच पारदर्शकता राहणार नाही.  तसेच निकोप व्यवसायाची संधी राहणार नाही

परमार्थ सेवा रत्न पुरस्कार

 डॉ. राजेंद्र बडवेडॉ. शैलेश श्रीखंडे परमार्थ सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाश साबळेला

परमार्थ खेल रत्न प्रदान

 

            मुंबई, दि. 18 : टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना त्यांच्या कर्करोग उपचारशल्यक्रिया व संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी 'परमार्थ रत्नपुरस्कार प्रदान करण्यात आला.

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे उभयतांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक विजेत्या अविनाश साबळेला राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ खेल रत्नपुरस्कार देण्यात आला.  परमार्थ सेवा समिती या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 'दिपावली स्नेह संमेलनया कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. 

            पाश्चात्य देशातील कर्करोगाच्या तुलनेत भारतात कर्करोगाचे प्रमाण कमी आहेही समाधानाची बाब असली तरी वाढत्या शहरीकरणासोबत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या ४० टक्के जास्त असल्यामुळे सन २०३५ पर्यंत तंबाखूची शेती पूर्णपणे बंद केल्यास कर्करोगावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी केले.

            लठ्ठपणामुळे १९ प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता राखल्यास तसेच अन्न संरक्षण शास्त्रीय पद्धतीने केल्यास आणखी १५ टक्क्यांनी कर्करोगाचे प्रमाण कमी करता येईल, असे डॉ.बडवे यांनी सांगितले. 

            टाटा रुग्णालय दरवर्षी देशभरातून साडेचार लाख रुग्ण उपचारासाठी येतात असे सांगून वाराणसीगुवाहाटीविशाखापट्टणमपंजाब व खारघर येथे कर्करोग उपचारासाठी इस्पितळे उभारली गेली असली तरी देखील टाटा रुग्णालयात येत्या काही वर्षात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दहा लाख इतके असेलअसे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. कर्करोगाच्या प्रभावी उपचारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्करोग विशेषज्ज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.    

            तंबाखू शिवाय युवकांमध्ये अंमली पदार्थांचे वाढते व्यसन चिंतेची बाब असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.  रुग्णसेवा करणे हा सच्चा परमार्थ असल्याचे सांगून देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी लोकांनी क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांचा पोषण आहार खर्च वहन केल्यासतो देखील परमार्थ ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

            परमार्थ सेवा समिती टाटा रुग्णालय येथे ५० कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र किमोथेरपी केंद्र बांधून देणार असून या केंद्राच्या माध्यमातून दररोज ५०० रुग्णांना मदत होईल असे परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला बिर्ला समूहाच्या संचालक राजश्री बिर्लापरमार्थ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मनमोहन गोयंकामहिला समितीच्या प्रमुख शारदा बुबना व सूत्रसंचालक अनिल त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.

००००


 

Maharashtra Governor presents Parmarth Ratna Awards to Stalwarts in Cancer Care

      Mumbai, 18th Oct : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Parmarth Ratna' Awards for the year 2022 to the Director of Tata Memorial Hospital Dr Rajendra Badwe and Deputy Director Dr Shailesh Shrikhande at Raj Bhavan Mumbai on Mon (17 Oct). The awards were presented to the two stalwarts in recognition of their excellence in cancer surgery, research and management at the 'Diwali Sneh Sammelan' organised by the Parmarth Seva Samiti.

      The Governor also presented the 'Parmarth Khel Ratna Award to Avinash Sable, the Silver medallist in the 3000 metre steeplechase event at the Commonwealth Games 2022. The Committee announced extending financial support to the Tata Memorial Hospital for the construction of a dedicated Chemotherapy Centre at a cost of Rs.50 crore.

         Director of the Birla Group Rajashree Birla, Chairman of the Parmarth Seva Samiti Laxminarayan Biyani, President Manmohan Goenka, Mahila Samiti President Sharda Bubna and Master of Ceremony Anil Trivedi were present.

0000

 

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य

 गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळवलेआता सुराज्याकडे वाटचाल करूया

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

 

            मुंबईदि. १८ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवलेआता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा यंदा प्रथमच राज्य शासनाने घेतली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यस्तरीय तीन आणि प्रत्येक जिल्ह्यातून एका सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले.

            समाजात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळाचा गौरव करणे हाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ असणे आवश्यक आहेअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीलोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केलीयामागचा उद्देश हा समाजातील एकात्मता टिकून राहावी असाच होता. आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबर समाजाला दिशा आणि विचार देण्याचे काम करीत आहेत. देशभक्तीराष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आणि या स्पर्धेत राज्यातील ३५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहभाग घेतला.

            आज राज्यभरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आज उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या देखाव्यातून समाजातील समस्या मांडण्याबरोबर सामाजिक प्रबोधन करण्याचे काम अविरत करत असतात. यावर्षी सुद्धा नदी संवर्धनशिक्षणपर्यावरण यासारखे विषय मांडून समाजाला दिशा दिली असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            अकोला जिल्हयातील पातूर येथील श्री. खडकेश्वर म. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथमअहमदनगर जिल्हयातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार यावेळी देण्यात आले.

याशिवाय जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव

अमरावती : एकविरा गणेशोत्सव मंडळ औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ बीड जय किसान गणेश मित्र मंडळ भंडारा आदर्श गणेश मंडळ बुलढाणा सहकार्य गणेश मंडळतालुका चिखली चंद्रपूर न्यु इंडिया युवक गणेश मंडळभानापेठ वार्ड धुळे श्री. संत सावता गणेश मित्र मंडळसोनगीर गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळआरमोरी गोदिया नवयुवक किसान गणेश मंडळदेवरी 10 हिंगोली श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळएनटीसी 11 जळगांव जागृती मित्र मंडळभडगांव 12 जालना संत सावता गणेश मंडळपरतूर 13 कोल्हापूर श्री. गणेश तरुण मंडळढेंगेवाडी 14 लातूर बाप्पा गणेश मंडळ 15 मुंबई शहर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळना.म.जोशी.मार्ग 16 नागपूर विजय बाल गणेशोत्सव मंडळकिराडपुरा 17 नांदेड अपरंपार गणेश मंडळ 18 नंदुरबार क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ 19 नाशिक अमरज्योत मित्र मंडळसातपूर

20 उस्मानाबाद बाल हनुमान गणेश मंडळ 21 पालघर साईनाथ मित्र मंडळनालासोपारा 22 परभणी : स्वराज्य गणेश मंडळदेवनांदरा 23 पुणे : जयजवान मित्र मंडळनानापेठ 24 रायगड : संत रोहीदास तरुण विकास मंडळमहाड 25 रत्नागिरी : पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळमंडणगड 26 सांगली : तिरंगा गणेशोत्सव मंडळविटा 27 सातारा : सार्वजनिक क्रिडा गणेशोत्सव मंडळसावली 28 सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा 29 सोलापूर : श्रीमंत मनाचा कसबा गणपती 30 ठाणे : धामणकर नाका मित्र मंडळभिवंडी 31 वर्धा : बाल गणेश उत्सव मंडळसमुद्रपूर 32 वाशिम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ 33 यवतमाळ नवयुग गणेश मंडळ

            गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

            यावेळीसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विद्या वाघमारेपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडेआदी उपस्थित होते.

००००

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम

 ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम तत्काळ सुरू करावे

- रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे

            मुंबई, दि. 18 : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची पुढील टप्प्यातील कामे तत्काळ सुरू करावे, या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, येत्या दिड वर्षात लाभ क्षेत्रातील लाभार्थींना पाणी मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.

             मंत्रालयात ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

            मंत्री श्री. भुमरे म्हणाले, ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना पारंपरिक वितरण व्यवस्था ऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा केल्याने होणाऱ्या बचतीतून वाढीव 1750 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी खेर्डा ते पाचोड अशी विस्तारित उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली आहे. यामुळे पाचोड परिसरातील दहा गावांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने नवीन निविदा काढण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            प्रकल्पाची कामे सुरू असताना स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाची समस्या निर्माण होऊ नये याकरिता कामे सुरू असतानाच योग्य नियोजन करावे .कायमस्वरूपी पक्के कामे करण्याचे नियोजन करण्यात यावे. कॅनॉल वर पूल बांधताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. भुमरे म्हणाले ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व गोदावरी खोऱ्यात असून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना आहे.

            ही योजना गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात प्रस्तावित आहे. प्रकल्पामुळे सुमारे 65 गावांमधील 20 हजार 265 हेक्टर शेती क्षेत्राला लाभ मिळणार असून 3 हजार 205 हेक्टर वरील निर्मिती होऊन कार्यान्वित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.



सिंगापूर आणि भारतात अनेक साम्यस्थळे

 सिंगापूर आणि भारतात अनेक साम्यस्थळे

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सिंगापूरच्या ५७ व्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा.

            मुंबई दि. १८ : सिंगापूर मध्ये आल्यानंतर भारतात आल्याची भावना होते, दोन देशात बरेच साम्य आहे, असे उद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हॉटेल ट्रायडंट येथे सिंगापूरच्या ५७ व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंगापूरचे कौन्सुल जनरल चाँग मिंग फुंग, चाँग हाय वेई, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर - पाटणकर आणि विविध देशांचे कौन्सुल जनरल उपस्थित होते. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सिंगापूरची आजपर्यंतची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता अशा अनेक क्षेत्रांत सिंगापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. सिंगापूरची प्रगती अनेक बाबतीत आदर्शवत आहे.

            दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत, दिवसेंदिवस ते अधिक दृढ होत आहेत, ही आनंददायी बाब आहे. दोन्ही देशांचे हे शांतता आणि परस्पर सहकार्याचे पर्व वृद्धिंगत होत जावो अशा शुभेच्छा त्यांनी यानिमित्ताने दिल्या. भारत आणि सिंगापूरची अनेक साम्यस्थळे त्यांनी सांगितली. अनेक भारतीय सिंगापूरमध्ये अनेक वर्षांपासून व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यांना कधीही परकेपणा जाणवत नाही.

            श्री चाँग मिंग फुंग म्हणाले, भारतासोबत द्विपक्षीय संबंध पूर्वीपासून मजबूत आहेत. उद्योग, शिक्षण, वाणिज्य, सेवा, सांस्कृतिक, पर्यटन, राजनैतिक संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावेत. अनेक भारतीय कंपन्या सिंगापूरमध्ये आहेत. या सर्वांमुळे दोन्ही देश प्रगतीची यशोशिखरे गाठत आहेत.

            श्रीमती मनीषा म्हैसकर - पाटणकर म्हणाल्या, सिंगापूर आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. परस्पर सहकार्य दोन्ही देशांना प्रगतीपथावर नेण्यास मदत करतील.



Featured post

Lakshvedhi