सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 18 October 2022
ग्रहण निर्णय*
🌹 *ग्रहण निर्णय* 🌹
*अशोककाका कुलकर्णी*
*पाचेगावकर*
*धर्मज्ञानगंगा समूह*
*९०९६३४२४५१*
*यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत . यावर्षी लक्ष्मीपूजन सोमवार २४ ऑक्टोबर रोजी असून ग्रहण २५ ऑक्टोबर आहे . त्यामुळे लक्ष्मीपूजन साठी ग्रहणाची कोणतीही अडकाठी नाही . कारण लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसरे दिवशी ग्रहण आहे व ग्रहणाचे दुसरे दिवशी बलिप्रतिपदा आहे . त्यामुळे दिवाळीत जरी ग्रहण आले असले तरी धार्मिक विधीसाठी , पूजेसाठी कोणतीही अडचण नाही.*
*ग्रहण माहिती*
*यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या २५ ऑक्टोबर , मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आहे . हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे . हे सूर्यग्रहण भारतात ग्रस्तास्त दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाईल . त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही . म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा .*
*ग्रहणाचा स्पर्श :-दुपारी १६:४९*
*ग्रहण मध्य :- दु .१७:४३*
*ग्रहण मोक्ष ( सूर्यास्त ) :- संध्याकाळी १८:०८*
*ग्रहणाचा पर्वकाल:- १ तास १९ मिनिटे राहील .*
*ग्रहणाचे वेध*
*ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून लागणार असून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामधे भोजन करू नये , स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध इत्यादी करता येईल . तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग करता येईल . ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण ४:४९ ते सायंकाळी ६:०८ पर्यंत पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र ही कर्मे करू नयेत.*
*ग्रहणातील कृती*
*ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे , पर्व काळामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम , दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे . ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे . अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान , दान करण्यापूर्ती शुद्धी असते .*
*ग्रहणाचे फळ*
*ऋषभ , सिंह , धनु , मकर या राशींना शुभ फल*
*मेष , मिथुन , कन्या , कुंभ या राशींना मित्रफल*
*कर्क , तुला , वृश्चिक व मीन या राशींना अनिष्ट फल आहे .*
*ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये .*
*मंत्र तंत्र पुरश्चरण*
*नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकालात केल्याने मंत्र सिद्धी होतो .*
*स्नानाविषयी*
*ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहे तरीही उष्णोदकाहून शितोदक पुण्यकारक . पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी , सरोवर , नदी , महानदी , गंगा , समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे . सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे . नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाची वेळी नर्मदेचे स्मरण करावे .*
*मोक्षस्नान आणि भोजनाविषयी*
*या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसल्याने मोक्षवेळा दिलेल्या नाहीत . तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्ष वेळा नंतर म्हणजे सायंकाळी ६:३२ नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून नंतर भोजन करावे.*
*( ग्रहण माहिती व वेळ संदर्भ - दाते पंचांगातुन घेतले आहेत )*
*ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम :-*
*१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे .*
*२) पायाची अढी घालून बसू नये .*
*३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे .*
*४) झोप घेऊ नये .*
*५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे .*
*ग्रहण शास्त्रार्थ*
*चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसत असेल तोपर्यंत पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल, तर त्यानंतर दुसर्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल; पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून, अस्तानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणचेही बिंब जर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल, तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले, तर शास्त्ररीत्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊन, स्नानदानादिक कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणिग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत.*
*आंघोळीला पाणी घेण्याविषयी कमी-अधिकपणा-*
*कढत पाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक. दुसर्याने दिलेल्या पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक. त्यापेक्षा वाहाते पाणी पुण्यकारक. वाहात्या पाण्यापेक्षा सरोवराचे पाणी पुण्यकर. सरोवराच्या पाण्यापेक्षा नदीचे पुण्यकर. याप्रमाणेच तीर्थे, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकर. ग्रहणांत वस्त्रासह स्नान करावे. अशा स्नानाला काही ग्रंथकरांनी मुक्ति स्नान म्हटले आहे. ते मुक्तिस्नान जर केले नाही, तर सुतकीपणा जात नाही. ग्रहणाच्या स्नानाला मंत्राची जरूरी नसते. सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. काही बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात. सोयर अथवा सुतक यामध्ये ग्रहणाबद्दल-स्नान, दान, श्राद्ध वगैरे अवश्य करावीत. नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला, आणि बायको जर विटाळशी असली. तर भांड्यात पाणी घेऊन, त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. तीन दिवस किंवा एक दिवस उपास करून ग्रहणाची स्नानदानादि कर्मे केली असता मोठे फळ मिळते. एकच दिवस जर उपास करणे असेल, तर तो ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपास अहोरात्र करावा असेही म्हणतात. मुलगे असलेल्या व गृहस्थाश्रमी अशांनी ग्रहण, संक्रांति वगैरे दिवशी उपास करू नये. पुत्रवान् या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकार कन्यावान असा करून, तशांनीही उपास करू नये असे म्हणतात. ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांना सांगितले आहे. 'सर्व वर्णांना राहुदर्शनाचे सूतक आहे' म्हणून ग्रहणकालात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्याने धुऊन शुद्ध करावीत. गाई, भूमि, सोने, धान्य वगैरेचे जर ग्रहणांत दान केले, तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो ब्राह्मण, तो दानपात्र होय. सत्पात्री दानाचे मोठे पुण्य आहे. 'चंद्र-सूर्याच्या ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे, सर्व ब्राह्मण व्यासांसारखे आणि सर्व दाने भूमिदानासारखी असे वचन आहे . ग्रहणांतले श्राद्ध करायचे ते आमान्नाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्ने करून करावे. सूर्यग्रहणांत तीर्थयात्रांग श्राद्धाप्रमाणे ज्यात तूप मुख्य आहे अशा अन्नाने श्राद्ध करावे. ग्रहणात श्राद्धाला जेवणारा महादोषी होतो. श्रीमंताने ग्रहणांत तुलादानादिक करावे. चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणात तीर्थाचे ठिकाणी महापर्वकाळी मंत्राची जर दीक्षा घेणे असेल, तर महिना, नक्षत्र वगैरे शोधण्याची जरूरी नाही. मंत्रदीक्षा घेण्याचा प्रकार तंत्रग्रंथात पाहावा. दीक्षा शब्दात उपदेशाचा अन्तर्भाव होतो. युगायुगात दीक्षा होते आणि कलियुगात उपदेश होतो. मंत्र घेण्याच्या कामी सूर्यग्रहणच मुख्य आहे. चंद्रग्रहणात जर मंत्र घेतला, तर दारिद्र्यादिक दोष प्राप्त होतात असे कोणी सांगतात. 'आधी उपास करून, चंद्रसूर्याच्या ग्रहणांत स्नान करावे; आणि स्पर्शकालापासून मोक्षकाला पर्यंत एकाग्रचित्ताने मंत्राचा जप करावा, मग जपाचा दशांश होम करावा, आणि नंतर होमाचा दशांश तर्पण करावे. होम करण्याचे सामर्थ्य नसल्यास,* *होमसंख्येच्या चौपट जप करावा.' मूलमंत्राचा जप करून, त्याच्या शेवटी द्वितीया विभक्त्यंत असा मंत्रदेवतेच्या नावाचा उच्चार करून,*
*'अमुकदेवता तर्पयामि नमः'*
*असे मोठ्याने म्हणावे. यवादियुक्त अशा पाण्याच्या ओंजळींनी होमाच्या दशांशाने तर्पण करावे. याप्रमाणे 'नमः' पर्यंत संपूर्ण मूलमंत्राचा उच्चार करून, अमुक देवतेला मी अभिषेक करतो असे म्हणून तर्पणाच्या पाण्याने आपल्या स्वतःच्या मस्तकावर अभिषेक करावा. याप्रमाणे तर्पणाच्या दशांशाने मार्जन करावे व तर्पणाच्या दशांशाने* *ब्राह्मणभोजन घालावे. याप्रमाणे- जप, होम, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मणभोजन हे पाच प्रकारांच्या रूपाचे पुरश्चरण होय. तर्पण वगैरे करणे जर अशक्य असेल, तर त्या त्या संख्यांच्या चौपट जप करावा. हा जो पुरश्चरणाचा प्रकार सांगितला, तो ग्राससहित उदय अथवा अस्त पावणार्या ग्रहणांत होत नाही. पुरश्चरणसंबंधाने जो उपास करावयाचा, तो पुत्रवान आणि गृहस्थाश्रमी यांनीही करावा. पुरश्चरण करणार्याच्या नित्य नैमित्तिक स्नानदानादिकांचा जर लोप होईल, तर दोष सांगितला असल्याने,* *स्नानदानादिक कर्मे मुलगा, बायको वगैरे प्रतिनिधींकडून करवावी.*
Monday, 17 October 2022
तलाठी भरती प्रक्रियa
तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी
- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. 17 : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज दिले.
महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.
००००
दिलखुलास
दिलखुलास’ कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत
मुंबई, दि.17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या का
र्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, शहरातील नियमित कचऱ्याचे संकलन, सुशोभीकरण यावर भर देत आपल्या कामात सातत्य राखत कराड नगरपरिषदेने हे यश मिळविले आहे. वॉटर प्लस शहर, माझी वसुंधरा अभियानातही कराड नगरपरिषदेने उत्तम कामगिरी केली आहे. नगरपरिषदेच्या या प्रेरणादायी कार्याची माहिती कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गतप्रोत्साहनपर लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गतप्रोत्साहनपर लाभ योजनेचा 20 ऑक्टोबरपासून शुभारंभ
- सहकार मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 17 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.
सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण
सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017 - 18, सन 2018 - 19 आणि सन 2019 - 20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रकियेला सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. दि. 20 रोजीच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. सावे म्हणाले.
या योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत :-
1. कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
2. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
3. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.
योजनेची कार्यपद्धती :-
1. या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
2. सदर प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
3. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधीत बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
4. सदर यादीमधील संबंधीत शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
5. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.
कर्जमुक्ती योजनेसाठी निकषात न बसणाऱ्या व्यक्ती :-
1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
2. महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
3. केंद्र सरकार व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारापेक्षा अधिक असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
5. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
6. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
7. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
००००
विसंअ / काशीबाई थोरात
झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर
झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची
राज्यपालांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 17 :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ - ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला नफा कमीत कमी ठेवावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या '३० व्या प्रॉपर्टी एक्स्पो' या फ्लॅट्स व गृहविक्री प्रदर्शनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. १६) भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. गृहविक्री प्रदर्शनाचे आयोजन क्रेडाई - महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने केले होते.
मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या भव्य गृह विक्री प्रदर्शनामुळे घर खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक विनाविलंब घर घेण्यास उद्युक्त होतील, असे राज्यपालांनी सांगितले.
गृहनिर्माण बांधकाम व्यवसायामुळे किमान २५० छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळते, अनेक लोकांना रोजगार मिळतो तसेच, शासनाला देखील महसुली उत्पन्न मिळते. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र अनेक उद्योगांचा कणा असल्याचे क्रेडाई - एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या दालनाला भेट दिली. राज्यात फ्लॅट - घराची नोंदणीसाठी ई-नोंदणीची सुविधा सुरु केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रेडाई -एमसीएचआय संस्थेचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
००००
Maharashtra Governor visits Grand Property Expo in Mumbai
Mumbai 17 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari visited the 30th Grand Property Expo organised by CREDAI - Maharashtra Chamber of Housing Industry and interacted with builders and citizens at MMRDA Grounds in Mumbai on Sunday (16 Oct).
The Governor visited the stalls of various real estate developers and interacted with the builders. The Governor felicitated the officers of Registration for implementing the decision of e-registration of property in Maharashtra.
Office bearers of CREDAI MCHI & builder’s were present at the event.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




