Monday, 17 October 2022

दिलखुलास

 दिलखुलास’ कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे

 मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत

 

            मुंबईदि.17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या का


र्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआरया ॲपवर मंगळवारदि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छताशहरातील नियमित कचऱ्याचे संकलनसुशोभीकरण यावर भर देत आपल्या कामात सातत्य राखत कराड नगरपरिषदेने हे यश मिळविले आहे. वॉटर प्लस शहर, माझी वसुंधरा अभियानातही कराड नगरपरिषदेने उत्तम कामगिरी केली आहे. नगरपरिषदेच्या या प्रेरणादायी कार्याची माहिती कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi