Monday, 17 October 2022

अवघे धरू सुपंथ


 

नमो महालक्ष्मी


 

आली माझ्या घरी


 

वाजवा रे वाजवा


 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुक

 अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

 

राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवारनोंदणीकृत पक्षांचे तीन तर इतर पक्षांचे नऊ उमेदवार

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवारदि. १७ ऑक्टोबर २०२२

 

            मुंबई उपनगरदि. १५ :  महाराष्ट्र विधानसभेच्या  अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे : 

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

५. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

१०. श्री.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१४. श्री.शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष).

            याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले कीआज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

            याचबरोबर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

000

 


 

 

 

 


Sunday, 16 October 2022

पोलीसांच्या नियमित आरोग्य तपासणी

 पोलीसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

                                      - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       

        मुंबई दि.16 : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईलयासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. राजवर्धनसेवेक्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासीअपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोतेनिशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अपोलो क्लिनिकचे संचालक श्री. कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसरात्र कर्तव्यावर असतांना पोलीसांचे आरोग्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा नियमितपणे आरोग्य तपासणी झाल्यास वेळीच काळजी घेवून भविष्यातील मोठे आजार टाळता येऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार वाहतूक पोलीसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच भविष्यात मुंबईतील सर्व पोलीसांची आरोग्य तपासणी करण्याचा डॉ. कपोते यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनामार्फत परवानगी आणि सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी डॉ. कपोते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

0000


मालमत्ताविषयक प्रदर्शन

 मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री यांची भेट

 

        मुंबई दि.16 : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया - महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणीनिवडून आलेले अध्यक्ष अजय अशरसचिव धवल अजमेराकोषाध्यक्ष प्रितम चिवुकुलाकन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवीउपाध्यक्ष डॉमनिक रोमेलपूर्वाध्यक्ष दिपक गोराडियामयूर शाहनयन शाह आदी उपस्थित होते. 13 ऑक्टोबरपासून हे प्रदर्शन सुरू आहे.

            बांधकाम व्यवसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            मुंबई व परिसरातील आघाडीचे 100 हून अधिक विकासक या मेगा-शोमध्ये सहभागी झाले आहेत. घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना या मालमत्ता प्रदर्शनात एकाच छताखाली 500 हून अधिक प्रकल्पांमधून 50 हजाराहून अधिक युनिट्समध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. प्रदर्शनाला प्रतिसाद मिळत आहे.

0000

   

Featured post

Lakshvedhi