Monday, 17 October 2022

अंधेरी पूर्व पोटनिवडणुक

 अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

 

राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवारनोंदणीकृत पक्षांचे तीन तर इतर पक्षांचे नऊ उमेदवार

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवारदि. १७ ऑक्टोबर २०२२

 

            मुंबई उपनगरदि. १५ :  महाराष्ट्र विधानसभेच्या  अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे : 

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

५. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

१०. श्री.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१४. श्री.शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष).

            याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले कीआज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

            याचबरोबर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

000

 


 

 

 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi