Sunday, 16 October 2022

पोलीसांच्या नियमित आरोग्य तपासणी

 पोलीसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

                                      - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       

        मुंबई दि.16 : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईलयासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. राजवर्धनसेवेक्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासीअपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोतेनिशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अपोलो क्लिनिकचे संचालक श्री. कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसरात्र कर्तव्यावर असतांना पोलीसांचे आरोग्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा नियमितपणे आरोग्य तपासणी झाल्यास वेळीच काळजी घेवून भविष्यातील मोठे आजार टाळता येऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार वाहतूक पोलीसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच भविष्यात मुंबईतील सर्व पोलीसांची आरोग्य तपासणी करण्याचा डॉ. कपोते यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनामार्फत परवानगी आणि सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी डॉ. कपोते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

0000


मालमत्ताविषयक प्रदर्शन

 मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री यांची भेट

 

        मुंबई दि.16 : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया - महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणीनिवडून आलेले अध्यक्ष अजय अशरसचिव धवल अजमेराकोषाध्यक्ष प्रितम चिवुकुलाकन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवीउपाध्यक्ष डॉमनिक रोमेलपूर्वाध्यक्ष दिपक गोराडियामयूर शाहनयन शाह आदी उपस्थित होते. 13 ऑक्टोबरपासून हे प्रदर्शन सुरू आहे.

            बांधकाम व्यवसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            मुंबई व परिसरातील आघाडीचे 100 हून अधिक विकासक या मेगा-शोमध्ये सहभागी झाले आहेत. घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना या मालमत्ता प्रदर्शनात एकाच छताखाली 500 हून अधिक प्रकल्पांमधून 50 हजाराहून अधिक युनिट्समध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. प्रदर्शनाला प्रतिसाद मिळत आहे.

0000

   

नवनवीन संकल्पनांचा वापर

शासनामध्ये होणार नवनवीन संकल्पनांचा वापर

राज्य शासनाच्या विविध विभागात नवनवीन संकल्पनांचा वापर करण्याच्या अनुषंगाने नुकताच स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. यामध्ये देशभरातील स्टार्टअप्सना सहभागी झाले होते. यामधील निवडक उत्कृष्ट स्टार्टअप्सना आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विजेत्यांना शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येतील. यामध्ये कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी श्रीनिवास सुब्रमण्यम (अरिती बिझनेस सोल्युशन्स), डॉ. रीचा पवार-नायर (खेतीबडी ॲग्रीटेक), आशिष आनंद (व्हर्ल फिनटेक सोल्युशन्स), शिक्षण आणि कौशल्यविषयक स्टार्टअपसाठी मनु कोहली (कॉगनिबल इंटरनॅशनल), नेहा चौहान (ॲव्हिओट्रॉन एअरोस्पेस), हेमाली तुराखीया (स्यात एंटरप्रायजेस), गव्हर्नन्स क्षेत्रातीस स्टार्टअपसाठी अमन संघवी (एजरक्राफ्ट सोल्युशन्स), जागृती दबस (आर्म्स फॉर एआय), पुनम गुप्ता (ड्रोनामॅप्स), आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सेंथीलकुमार मुरुगसन (सेव्ह मॉम), निशांत काठपाल (अयाती डिव्हायसेस), प्रतिक लोढा (निओ डॉक्स), साईप्रसाद पोयरेकर (पॅसिफाय मेडीकल टेक्नॉलॉजीज), इतर विविध क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सुनिल जलीहाल (इंडिक इन्स्पिरेशन्स), बिस्वजित सवाईन (कोराशिया टेक्नॉलॉजिज), नितीन देशपांडे (कॅटोनिक इंडिया), स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलीटी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी आशिष शर्मा (निओमोशन असिस्टीव्ह सोल्युशन्स), प्रबोध महाजन (लर्न अँड एम्पॉवर), रवी कौशिक (एअर्थ रिसर्च), डॉ. श्रीकांत सोला (डेव्हीक अर्थ), शाश्वतता क्षेत्रातील स्टार्टअपसाठी गिरीधरन सेनेगाई (स्मार्टटेरा अर्बन वॉटर मॅनेजमेंट), निता सोनी (औमसॅट टेक्नॉलॉजीज), डॉ. प्रेरणा गोराडीया (एक्स्पोजोम), सचिन पाटील (कार्बन क्राफ्ट) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्टार्टअप यात्रेमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

याशिवाय कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नुकतीच महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा संपन्न झाली. यामधील उत्कृष्ठ स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी प्रशांत आखरे, आदित्य दिदवानिया, सरोजिनी फडतरे, शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी योगेश बियानी, प्रबोध महाजन, सिद्धी सावंत, गव्हर्नन्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सारंग वाकोडीकर, यश दारोलकर, पर्यावरण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी माधुरी कळंबते, ई-कॉमर्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी अमोल सोनार, रोबोटीक्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी मैथिली कांबळे, स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलीटी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी जयेश चौधरी, यश सावंत, काजल राजवैद्य, शाश्वतता क्षेत्रातील स्टार्टअपसाठी समिर बहलकर, पुष्यमित्र जोशी, प्रतिभा मुंडे, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपसाठी किशोरकुमार ठाकरे, डॉ. सुनिल साहुजी, सोहीली पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम विजेत्या तसेच सर्वोत्तम महिला स्टार्टअप्सना प्रत्येकी १ लाख रुपयांचे तर द्वीतीय विजेत्या स्टार्टअप्सना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

 

मॅरेथॉन शर्यत

गोरेगाव police station 
 

नंतर सांगतो


 

दिव्यां गाना मार्गदर्शनपर शिबिर

 विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून  मातृत्व अपंग सेवाभावी संस्था पेण यांच्या वतीने सदर संस्थेने दिव्यां गाना मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले होते.त्यामध्ये संस्थेने दिव्यांगाना स्वबळावर नोकरी प्राप्त करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.सदरची संस्था गेल्या ५ वर्षापासून दिव्यांगानसाठी अविरत पणे  कोणतेही शुल्क न घेता प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र रजि नं.०६|२०१७दि.०६|०१|२०१७.सर्व दिव्यांगाना अहवान करण्यात येते की, ज्या दिव्यांग बांधवांना नोकरीची गरज आहे.त्यांनी तात्काळ कागदपत्रांसह सबंधित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन ह.गायकवाड.यांच्याशी दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपर्क साधावा.

शैक्षणिक पात्रता:१० वी पास.

वयोमर्यादा:१८ ते ४५ वर्ष .

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

१.दिव्यांग सर्टिफिकेट ४०% च्या वर असणे आवश्यक आहे.

२.आधारकार्ड 

३.रेशनिंगकार्ड  

४.शाळेचे सर्टिफिकेट.

५.अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत:३०|१०|२०२२.

पुढील भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

१.सचिन गायकवाड:९९२३९६४२९९.

2.पूजा सुर्यवंशी:८१४९०९५४७४.

3.भक्ती राऊत:८०८७६८८२४१.

४.सिद्देश तांबेकर:८२६२०४७५४८.

अंधेरी पोटनिवडणूक विशेष

 अंधेरी पोटनिवडणूक विशेषदि. १५ ऑक्टो. २०२२

 

अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

 

            मुंबई उपनगरदि. १५ : भारत निवडणूक आयोगाने १६६ - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

            या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२-८८६-७१७ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५३६ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊसबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील.

            पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३५५-८७३-९२६ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५७३ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊसबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत जनतेला भेटतील.

            त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.सत्यजित मंडल  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५९१-३८३-९१५ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५६१ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊसबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतीलअशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.

            येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघात मतदान होत असून या भागातील सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि लोकशाही सुदृढ करावीअसे आवाहनही श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.

 

Featured post

Lakshvedhi