Saturday, 15 October 2022

विधानसभा निवडणुकीबाबत.

 अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल,प्रवीण कोया आणि सत्यजित मंडल यांनी घेतला कामांचा आढावा


मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत तिन्ही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केले समाधान व्यक्त !


            मुंबई उपनगर, दि. 15:- अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे करण्यात येत असलेली कार्यवाही समाधानकारक असल्याचे मत केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेश‌ देवल यांनी व्यक्त केले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक समन्वय अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी प्रवीण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी सत्यजित मंडल उपस्थित होते.


            मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाहींची माहिती या बैठकीदरम्यान निवडणूक निरीक्षकांना दिली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अजित साखरे आणि निवडणूक विषयक कार्यदायित्वे सोपविण्यात आलेले समन्वय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वतीने निवडणूक निरीक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी 'अंधेरी पूर्व' पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती मान्यवर निवडणूक निरीक्षकांना दिली. यामध्ये प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था, अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांच्या विषयीची संक्षिप्त माहिती, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबतची माहिती, प्रसिद्धी व प्रचार विषयक बाबी, निवडणूक कर्तव्य सोपविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणांचा तपशील आदी माहितीचा समावेश होता.


            बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यदायित्वाची आणि करण्यात आलेल्या कामांची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. तसेच याबाबत निवडणूक निरीक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी समाधानकारक उत्तरे देत माहिती दिली.


            भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार येत्या ३ नोव्हेंबर रोजी '१६६ - अंधेरी पूर्व विधानसभा' मतदार संघाची पोटनिवडणूक असून या निवडणुकीत मतदान करण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या जनजागृती कार्यक्रमांची माहिती देखील निवडणूक निरीक्षकांनी आवर्जून घेतली व त्याबाबत देखील समाधान व्यक्त केले.


            या बैठकीच्या अखेरीस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मान्यवर केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे आभार मानले. तसेच या निमित्ताने त्यांनी अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांना येत्या दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निवडणुकीदरम्यान मतदान अवश्य करण्याचे व आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देखील पुन्हा 

शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली

 आपण सर्वांनी मिळून स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी आग्रही राहूया

                                     पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

                शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली" उपक्रमास बांद्रा पश्चिम येथून सुरूवात

 

            मुंबई,दि.१५: मुंबईतील नागरिकांना स्वच्छतेच्या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळाव्यात यासाठी आपण सर्वांनी मिळून आग्रही असले पाहिजे. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली" हा उपक्रम संपूर्ण मुंबई उपनगरात डिसेंबर २०२२ पर्यंत राबवणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

             बांद्रा पश्चिम मुंबईगोविंद पाटील रोड खार सार्वजनिक शौचालय येथे शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली" उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी माजी मंत्री ॲड.आशिष शेलारउपायुक्त रणजीत ढाकणेवॉर्ड ऑफिसर विनायक विसपुतेजिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडेयासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले,मुंबई उपनगर येथील संपूर्ण जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतारंगरंगोटीदुरुस्ती करणेआवश्यकता भासेल तिथे ड्रेनेज पाइप लाईन बदलणेशौचालयातील आसन क्षमता  वाढवणे,शौचालय जर  खराब असेल तर त्याची पुनर्बांधणी करणे असा उपक्रम दीपावलीच्या दरम्यान आपण राबवणार आहोत. आज  या उपक्रमाची आपण बांद्रा पश्चिम येथून सुरुवात केलेली आहेदिवाळी पुर्वी नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शौचालयांकरिता विज बिल आकारणी करताना व्यावसायिक दराने न आकारता घरगुती कनेक्शनच्या दराने विज बिल आकारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना प्रशासनाला केली. नागरिकांनीही या उपक्रमासाठी सहकार्य करावे. काही सूचना असतील तर जरूर कराव्यात  असे मंत्री श्री.लोढा म्हणाले.

            यावेळी माजी मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वॉर्ड ऑफिसर विनायक विसपुते यांनी केले.

000

 


कान्हा घेवून जय vani

 ही वासरे नसून पुनगूर नावाची गाय आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात या गाई सापडतात. एक ते दीड लिटर रोज दूध देतात.एका गाईची किंमत पाच लाखांहून अधिक आहे. असं मानलं जातं कि या गाईच्या दुधात सोन्याचा अंश असतो. तिरूपती बालाजीला या गाईच्या दुधाचा रोज दुग्धाभिषेक केला जातो  असे म्हटले जाते.


Kana घेवून जाय वनी, वेणू घेवून जाय


 

गेले ते क्षण गेले



सुवर्ण पदक बॉक्सिंग खेळाडू सत्कार

 सामान्य कुटुंबातील निखिल दुबे याने राष्ट्रीय स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात सुवर्णपदकाची केलेली कमाई ही निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याने भविष्यात ऑलम्पिकमध्ये सहभाग घ्यावा. त्याला कायम नोकरी कशी मिळेलयासाठी केंद्र सरकार स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

          कांदिवली पूर्व विधानसभेतील पोईसर विभागात राहणाऱ्या निखिल प्रेमनाथ दुबे याने गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 75 किलो वजनी गटात,  बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्याचा आमदार भातखळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार भातखळकर म्हणाले१९९४ नंतर प्रथमच महाराष्ट्राला निखिल दुबेच्या रूपाने सुवर्णपदक मिळाले आहे. ही गौरवास्पद बाब आहे. त्याची मुख्यमंत्रीउपमुख्यामंत्री यांच्याशी भेट घडवून देणार आहे. राज्य सरकारकडून त्याला आवश्यक असणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय केंद्र सरकार स्तरावरही प्रयत्न करून त्याला कायम नोकरी मिळाली पाहिजेघर मिळाले पाहिजे यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. या सत्कार समारंभाला कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपाचे पदाधिकारीकार्यकर्तेनागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

                              

दिव्यांगासाठी एक खिडकी योजना

 दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

            मुंबईदि. 10 : दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ  महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

            बोरविली पश्चिम  येथील  आर सेंट्रल  व आर नॉर्थ वॉर्ड येथे 'पालकमंत्री आपल्या दारीया उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टीआमदार प्रविण दरेकर, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        मंत्री श्री. लोढा म्हणाले, दिव्यांगासाठी  केंद्र, राज्य तसेच महापालिकेच्या विविध योजना राबविण्यात येतात अशा वेळी, नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जावे लागू नये, यासाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या हेतूने ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.

            यावेळी ३६९ विविध विषयांवर नागरिकांनी आपले तक्रार अर्ज दिले. तर १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

            'पालकमंत्री आपल्या भेटीलाया उपक्रमांतर्गत दि. १२ ऑक्टोबर रोजी एल वॉर्ड - कुर्ला पश्चिम येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही आपली तक्रार नोंदविता येईल.

०००००

संध्या गरवारे/विसंअ/10.10.22

Featured post

Lakshvedhi