सामान्य कुटुंबातील निखिल दुबे याने राष्ट्रीय स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात सुवर्णपदकाची केलेली कमाई ही निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याने भविष्यात ऑलम्पिकमध्ये सहभाग घ्यावा. त्याला कायम नोकरी कशी मिळेल, यासाठी केंद्र सरकार स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
कांदिवली पूर्व विधानसभेतील पोईसर विभागात राहणाऱ्या निखिल प्रेमनाथ दुबे याने गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 75 किलो वजनी गटात, बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्याचा आमदार भातखळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार भातखळकर म्हणाले, १९९४ नंतर प्रथमच महाराष्ट्राला निखिल दुबेच्या रूपाने सुवर्णपदक मिळाले आहे. ही गौरवास्पद बाब आहे. त्याची मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री यांच्याशी भेट घडवून देणार आहे. राज्य सरकारकडून त्याला आवश्यक असणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय केंद्र सरकार स्तरावरही प्रयत्न करून त्याला कायम नोकरी मिळाली पाहिजे, घर मिळाले पाहिजे यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. या सत्कार समारंभाला कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment