Friday, 14 October 2022

पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर.

 राज्यात वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार

            मुंबईदि. 13 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार असून ते राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था व शासनाच्या समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार असल्याची माहिती, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे  राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालय  'पर्यटन नवा विचार, नवी दिशाअंतर्गत आणि दै. मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे  सचिव सौरभ विजयमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन उपक्रम राबवण्यासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची एक समिती नेमण्यात येईल. या समितीमार्फत राज्यभरात पर्यटन विषयक उपक्रम राबवण्यात येतील. महिलांना पर्यटन उद्योग क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी पर्यटन गाईड किंवा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवावेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातूनही पर्यटन विषयक कौशल्य वृद्धीसाठी आपल्या सर्वांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. आज पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रम राबवून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन करता येईल. पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तसेच स्वयंसेवी  संस्थांनी देखील आपल्या सूचना मांडाव्यात. शासन व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. या संवादातून महाराष्ट्र पर्यटन क्षेत्र देशातच नव्हे तर राज्यातही आपले स्थान निर्माण करेल. छत्रपती शिवरायांची पावन भूमी असलेले महाराष्ट्राची माहिती पर्यटकांना होण्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर  महाराष्ट्रातही रायगड किल्ला येथे महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे यासाठी सूचना कराव्यात. राज्यातील १५ महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शौचालय तसेच मुलभूत सोयी देखील करण्यात येतील असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.

             या कार्यक्रमात शिल्पा बोरकर यांनी पर्यटन विषयक शैक्षणिक संस्थाओंकार ओक याने साहसी पर्यटनमिलिंद चाळके यांनी कृषी पर्यटनकॅरॅव्हन पर्यटन सचिन पांचाळऐतिहासिक पर्यटन अस्लम सय्यदशाश्वत पर्यटन महेश म्हणगोरेट्रेल संस्था रिद्धी जोशीवेलनेस टुरिझम ऑपरेटर उमेश उणिकृष्णनमेडिकल टूरिझम मिहीर व्होरावाईल्ड लाईफ टुरिझम लोकेश तारदलकरटूरिझम असोसिएशन जय भाटियाटुरिझम कन्सल्टंट मकरंद केसरकरकंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकरअमोल जमदरेगिआयटी टूर ऑपरेटर अमर महाजन यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रातील अडचणीआव्हान आणि समस्या यावर सादरीकरण करून पर्यटन क्षेत्रात आवश्यक बदल याबाबत मते मांडली. राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात बाजी मारणाऱ्या महाराष्ट्रातील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दै.तरूण भारतचे संपादक श्री. शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

             या परिषदेत शैक्षणिक संस्था – विद्यापीठे आणि खाजगी महाविद्यालयेकारवान टूर ऑपरेटर., साहसी टूर ऑपरेटरकृषी टूर ऑपरेटर, वन्यजीव टूर ऑपरेटर, शाश्वत टूर ऑपरेटरहेरिटेज टूर ऑपरेटरपर्यटन संघटनाट्रॅव्हल स्टार्ट-अप, कंटेंट क्रिएटर्सट्रेल संयोजक (वारसा/वन्यजीव/पाकशास्त्र), सहायक सेवा प्रदाते, समूह समावेशी टूर ऑपरेटर यांनी सहभाग घेतला होता.

मतिमंद मुलीला मिळाला

 महिला व बालविकास विभागाच्या तत्परतेने

मतिमंद मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

फेसबुकवरील तक्रारीची तत्काळ दखल

 

            मुंबई, दि. 13 :महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ मतिमंद मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहेहे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली आहे.

            दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय मतिमंद मुलगी रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला. तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाच्या समाज माध्यम प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. श्रीमती अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर. विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या निवासाची व्यवस्था केली.

प्रतिक्रिया 1

            महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या समाज माध्यम टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

- राहुल जाधवपुणे.

प्रतिक्रिया 2

            एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.

            - रुबल अग्रवालएकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक

मी उठलो तुम्ही पण उठा

 


औष्या है

 🍀🍀🌷🌷🌷🌷🌷🍀🍀


       *"आयुष्य" तसं खुप शांत असतं.., पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या.., निर्माण झालेल्या "गरजा" आणि "अपेक्षा" मात्र दंगल घडवित असतात...!!!*


    🌺🌺 *सुप्रभात* 🌺🌺

जिंदगी

 *आपण शब्दांना*

*स्पर्श करु शकत नाही.*

*पण*

*मनाला*

*स्पर्श करण्याची ताकद*

*असणारे शब्द वापरुन इतरांना आपलंस नक्कीच करु शकतो.....!!!*


   🌹 *शुभ सकाळ* 🌹

Thursday, 13 October 2022

बेरोजगारांना रोजगार

 राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. १३ : कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्याकॉर्पोरेट संस्थाउद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२  मध्ये १३ हजार ०२४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महास्वयं वेबपोर्टलऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्याकॉर्पोरेट संस्थाउद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतोअसे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षणकौशल्येअनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्याउद्योजककॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते’.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

            विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९८ हजार ४०७ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहेअसे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

            मंत्री श्री. लोढा म्हणालेमाहे सप्टेंबर २०२२ मध्ये विभागाकडे ३६ हजार ६३४ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ४ हजार ५६८नाशिक विभागात ४ हजार ४०६पुणे विभागात १५ हजार ५९०औरंगाबाद विभागात ७ हजार ६४५अमरावती विभागात २ हजार ०२८ तर नागपूर विभागात २ हजार ३९७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

            सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ०२४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार ३४६नाशिक विभागात १ हजार ४७४पुणे विभागात ३ हजार ७१३औरंगाबाद विभागात सर्वाधिक ३ हजार ७३३अमरावती विभागात ९८० तर नागपूर विभागात ७७८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित महारोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

            नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावीअसे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

कोविडमुळे अनाथ विद्यार्थी

 कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या

पूर्णशुल्क माफी निर्णयाची अंमलबजावणी करावी

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

 

            मुंबई दि. 13 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडीलपालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

             विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नयेकिंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी  विद्यापीठअनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi