Thursday, 13 October 2022

जगभ्रमंती मोहिम

 रमिला लटपटे यांच्या जगभ्रमंती मोहिमेला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 13 : - दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. एक मराठमोळी तरूणी जगभ्रमंतीचे साहस करणार आहेतिची ही जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रोत्साहन ठरेलअशा शब्दांत त्यांचे कौतुकही केले.

            वर्षा शासकीय निवासस्थानी श्रीमती रमिला यांनी भेट घेऊनमुख्यमंत्र्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली. श्रीमती लटपटे या चिंचवड (पुणे) येथील आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात. त्यांनी रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार त्या ९ मार्च २०२३ पासून गेट-वे-ऑफ इंडियापासून त्यांच्या भ्रमंतीला प्रारंभ करणार आहेत. सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास त्या मोटरसायकलवरून पारंपरिक वेशभूषेत करणार आहेत. या प्रवासात जगभरातील चाळीस देशांना भेट देतील.

            श्रीमती लटपटे यांच्या या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्यांच्या या मोहिमेसाठी निधी संकलनातही योगदान दिले. यावेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.


https://in.docs.wps.com/l/sIHn5-4qkAfHGn5oG?sa=03&st=0,

गौ उत्पादने





 

अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर.

 अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

             मुंबई, दि. 13 : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाततसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अश्यावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

            दिन्डोशीनगरगोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या ‘गऊ ग्राम महोत्सवा’चे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झालेत्यावेळी ते बोलत होते.

            महोत्सवाचे आयोजन 'गऊ भारत भारतीया गायीच्या संवर्धनाला समर्पित वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले.

            रासायनिक खतांऐवजी गायीचे शेण तसेच गोमूत्र यांचा वापर करून एक एकर पर्यंत शेती करण्याचा प्रयोग देशात यशस्वीरीत्या झाला असल्याचे नमूद करून लोकांनी गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी तसेच गौ आधारित उत्पादने वापरावीअसे आवाहन राज्यपालांनी केले.

            केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गाय महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

            गायीपासून मिळणारी केवळ दोन-चार उत्पादनेच अधिकांश लोकांना माहिती आहे असे सांगून गौउत्पादनांची मागणी निर्माण करून गो-पालक व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गऊ भारत भारतीचे संपादक तसेच महोत्सवाचे निमंत्रक पत्रकार संजय अमान’ यांनी यावेळी सांगितले.

            युवती व लहान मुलींनी यावेळी श्रीकृष्ण लीलांवर आधारित नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते गोसेवा कार्यास योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला महेंद्र काबरासंतोष शहाणेराम कुमार पालसंजय बलोदी 'प्रखर', हरीश बोराआदी उपस्थित होते. 

००००

 

Governor Koshyari appeals people to buy Cow based products to support

 cow based economy

 

            Mumbai Dated 13 : Stating that Indian culture attaches utmost importance to the cow in the journey of mankind from the cradle to the grave, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari appealed to the people to buy cow-based products to support cow-based economy.

            Governor Koshyari was speaking at the inauguration of the first week-long 'Gau Gram Mahotsav' - The Festival of Cows' at Sanmitra Maidan, MHB Colony, Goregaon (E) Mumbai on Wed (12 Oct).

            The Governor said it has been proved successfully that cow dung and cow urine can act as an organic substitute for chemical fertilizers for cultivation. He appealed to the people to support Goshalas and buy cow-based products.

            The festival has been organised by the newspaper 'Gau Bharat Bharati' with the objective of promoting Cow - based economy.

            Union Minister for Animal Husbandry and Fisheries Parshottam Rupala wished the organizers success through a video message.

            Convenor of the Festival Sanjay 'Amaan', Mahendra Kabra, Santosh Shahane, Ram Kumar Pal, Sanjay Balodi 'Prakhar', Harish Bora and others were present. A group of children presented a dance on the occasion.

0000

मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियां

 मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी.

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 13 : पालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे तसेच अतिरिक्त दराने पाणी पुरवठा करुन नागरिकांची लूट करणाऱ्या टँकर माफियांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.


            एल (पश्च‍िम), मुलुंड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले, स्थानिक लोकांच्या पाण्याची समस्या पालिकेने तातडीने सोडवावी तसेच पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या यंत्रणेने शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाणी टँकर पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी.


            पाणीप्रश्न, घरदुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, नादुरुस्त पथदिवे आदी 348 विविध विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले, तर 78 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.


            ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. 14 ऑक्टोबर रोजी एम ईस्ट वॉर्ड गोंवडी (पूर्व) येथे सकाळी 10 वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in, बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in या लिंकवरही ऑनलाइन तक्रार करता येतील.


*****



Featured post

Lakshvedhi