Thursday, 13 October 2022

अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर.

 अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

             मुंबई, दि. 13 : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाततसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अश्यावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

            दिन्डोशीनगरगोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या ‘गऊ ग्राम महोत्सवा’चे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झालेत्यावेळी ते बोलत होते.

            महोत्सवाचे आयोजन 'गऊ भारत भारतीया गायीच्या संवर्धनाला समर्पित वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले.

            रासायनिक खतांऐवजी गायीचे शेण तसेच गोमूत्र यांचा वापर करून एक एकर पर्यंत शेती करण्याचा प्रयोग देशात यशस्वीरीत्या झाला असल्याचे नमूद करून लोकांनी गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी तसेच गौ आधारित उत्पादने वापरावीअसे आवाहन राज्यपालांनी केले.

            केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गाय महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

            गायीपासून मिळणारी केवळ दोन-चार उत्पादनेच अधिकांश लोकांना माहिती आहे असे सांगून गौउत्पादनांची मागणी निर्माण करून गो-पालक व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गऊ भारत भारतीचे संपादक तसेच महोत्सवाचे निमंत्रक पत्रकार संजय अमान’ यांनी यावेळी सांगितले.

            युवती व लहान मुलींनी यावेळी श्रीकृष्ण लीलांवर आधारित नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते गोसेवा कार्यास योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला महेंद्र काबरासंतोष शहाणेराम कुमार पालसंजय बलोदी 'प्रखर', हरीश बोराआदी उपस्थित होते. 

००००

 

Governor Koshyari appeals people to buy Cow based products to support

 cow based economy

 

            Mumbai Dated 13 : Stating that Indian culture attaches utmost importance to the cow in the journey of mankind from the cradle to the grave, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari appealed to the people to buy cow-based products to support cow-based economy.

            Governor Koshyari was speaking at the inauguration of the first week-long 'Gau Gram Mahotsav' - The Festival of Cows' at Sanmitra Maidan, MHB Colony, Goregaon (E) Mumbai on Wed (12 Oct).

            The Governor said it has been proved successfully that cow dung and cow urine can act as an organic substitute for chemical fertilizers for cultivation. He appealed to the people to support Goshalas and buy cow-based products.

            The festival has been organised by the newspaper 'Gau Bharat Bharati' with the objective of promoting Cow - based economy.

            Union Minister for Animal Husbandry and Fisheries Parshottam Rupala wished the organizers success through a video message.

            Convenor of the Festival Sanjay 'Amaan', Mahendra Kabra, Santosh Shahane, Ram Kumar Pal, Sanjay Balodi 'Prakhar', Harish Bora and others were present. A group of children presented a dance on the occasion.

0000

मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियां

 मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी.

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 13 : पालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे तसेच अतिरिक्त दराने पाणी पुरवठा करुन नागरिकांची लूट करणाऱ्या टँकर माफियांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.


            एल (पश्च‍िम), मुलुंड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले, स्थानिक लोकांच्या पाण्याची समस्या पालिकेने तातडीने सोडवावी तसेच पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या यंत्रणेने शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाणी टँकर पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी.


            पाणीप्रश्न, घरदुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, नादुरुस्त पथदिवे आदी 348 विविध विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले, तर 78 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.


            ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. 14 ऑक्टोबर रोजी एम ईस्ट वॉर्ड गोंवडी (पूर्व) येथे सकाळी 10 वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in, बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in या लिंकवरही ऑनलाइन तक्रार करता येतील.


*****



 


उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे

राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई, दि. 12 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय 27 जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

अ.क्रं

जिल्हा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव

1

अमरावती

एकविरा गणेशोत्सव मंडळ

2

औरंगाबाद

कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ

3

बीड

जय किसान गणेश मित्र मंडळ

4

भंडारा

आदर्श गणेश मंडळ

5

बुलढाणा

सहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली

6

चंद्रपूर

न्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड

7

धुळे

श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर

8

गडचिरोली

लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी

9

गोदिंया

नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी

10

हिंगोली

श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी

11

जळगांव

जागृती मित्र मंडळ, भडगांव

12

जालना

संत सावता गणेश मंडळ, परतूर

13

कोल्हापूर

श्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी

14

लातूर

बाप्पा गणेश मंडळ

15

मुंबई शहर

पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग

16

नागपूर

विजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा

17

नांदेड

अपरंपार गणेश मंडळ

18

नंदुरबार

क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ

19

नाशिक

अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर

20

उस्मानाबाद

बाल हनुमान गणेश मंडळ

21

पालघर

साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा

22

परभणी

स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा

23

पुणे

जयजवान मित्र मंडळ, नानापेठ

24

रायगड

संत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड

25

रत्नागिरी

पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड

26

सांगली

तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा

27

सातारा

सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली

28

सिंधुदुर्ग

वीज मनोरे व वाहिन्या

 वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

-------------

विविध वीज प्रकल्पांना गती येणार

            अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

            वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही.  केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारतांना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो.  मात्र, यासाठी सध्या असलेल्या शासनाच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.  सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकाना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा तीव्र विरोध होत आहे.  त्यामुळे पारेषण कंपन्याचे विविध प्रकल्प रखडले आहेत.  नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होवून वीज निर्मितीस मदत होईल.

            या सुधारित धोरणाप्रमाणे ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अति उच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठी पुढीलप्रमाणे मोबदला देण्यात येईल. 

            मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या क्षेत्रफळाचे रेडीरेकनर मधील किंवा मागील ३ वर्षातील झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या आधारे सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येईल.

            मनोऱ्यातून जाणाऱ्या वाहिन्यांच्या पट्ट्याखालील येणाऱ्या क्षेत्रासाठी अतिरिक्त १५ टक्के तसेच रेडीरेकनर किंवा सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या १५ टक्के असा एकूण ३० टक्के मोबदला दिला जाईल.

            अपवादात्मक परिस्थितीत योग्य मोबदला ठरविण्याचे अधिकार उप विभागीय मुल्यांकन समितीस राहतील. पारेषण वाहिनीच्या विहित मार्गात कोणतेही बांधकाम करण्यास मान्‍यता राहणार नाही.  पिकेफळझाडे किंवा इतर झाडांसाठीची नुकसान भरपाई संबंधित विभागाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे दिली जाईल.  हे धोरण मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला लागू राहील.

            मनोऱ्याने बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला थेट संबंधित शेतकरी तसेच जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.  हे धोरण संबंधित शासन निर्णय जाहीर झाल्यापासून काम सुरु असलेल्या व नवीन प्रस्तावित अशा सर्व अति उच्चदाब पारेषण वाहिनी प्रकल्पांना लागू राहील. मोबदला निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समिती असेल.

या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल.

रिटायर्ड ची मज्जाच बघा


                रिटायर्ड झाल्यावर मज्जा करू म्हणणारे

हेल्प

 


Featured post

Lakshvedhi