कॉन्टॅक्ट 9876824365
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 12 October 2022
महिषासुर मारा मनातला
_*नमस्कार,*_
बोलता बोलता दसरा ही संपला. आपल्या सणांची काही जण टिंगलटवाळी करतात पण त्यांतील गर्भित अर्थ समजला तर जीवनात पदोपदी येणाऱ्या अनुभवांमध्ये आपल्याला त्यातील झलक दिसते. अगदी आज सादर केलेल्या अलक मध्ये वानगीदाखल उदाहरणं दिली आहेत. वाचा व आनंद घ्या.
_-मेघःशाम सोनवणे. 9325927222_
--*🌼*--
_*आजचे महिषासुर ....*_
_लेखक -अनामिक._
स्वतःला ढिगभर साड्या असुनही दसऱ्यासाठी खास घेतलेली तीन हजाराची साडी कपाटात ठेवताना मनाशीच म्हंटल 'या अष्टमीला नको आता एखाद्या कुमारिकेला ड्रेस घेत बसायला, त्यापेक्षा घरात आहेत आपण वापरणार नाही असे रुमाल. त्यातच ओटी भरू. नाहीतरी कामवालीच्या पोरीला तर घेणार होतो, पण आता खर्च खुप झालाय घरातल्यांच्या कपड्यावर.
तेवढ्यात आवाज कामवलीचाच, "ताई, आज कामाचे पैसे द्या बरं का मला. निदान दोनशे तरी द्या. अहो गल्लीत एक लै गरिब कुटूंब आलंय. त्यांच्या पोरीची वटी भरते, एक फ्रॉक घेऊन देते तिला, दोनशे रुपये द्या लगेच."
हिने दिले पण हिला जाणवलं, मनातल्या स्वार्थाचा *महिषासुर* मारून गेली ती ......
💛💚💙
राजगिऱ्याचे लाडू अगदी घरच्यासारखे आहेत ना. बघू मेड कुठलं आहे ...अरे वा आपल्याच शहरातलं आहे, अगदी घरगुती दिसतंय, पत्ता पण दिला आहे. चला, नाहीतरी दोनशे लाडू उद्या दुकानातून घेणार होते अनाथाश्रमात दयायला, आता ह्या पत्त्यावर जाऊन बघू.
बेल दाबताच थरथरता आवाज आला "थांबा." गोऱ्यापान आजी बाहेर आल्या. "या इथेच तयार होतात लाडू. तशी सधन आहे मी, पण नवरा वारला, लेकी सुना त्यांच्या संसारात मग्न, मग मनातला
एकटेपणाचा *महिषासुर* त्रास देत होता. रिकाम्या डोक्यात छळ मांडायचा विचारांचे.
एक दिवस एक गरजू बाई आलीच दारात काम मागायला, आणि हे लाडू येतच होते, फक्त हातात बळ नव्हतं. मग सगळंच जुळून आलं. लोकांना खाण्यात आणि माझ्या विचारात पौष्टिकता आली आणि एकटेपणाच्या *महिषासुराचा* बिझी वेळेने वध केला नाही कां?
💙🤍💗
ती नवीनच हजर झाली नोकरीवर. अतिशय बदमाश मुलांचा वर्ग तिला मिळाला. वर्गातल्या भिंतीवरच्या गुटख्याच्या पिचकाऱ्या तिला बरंच काही सांगून गेल्या. ती दोन पोरंच सगळ्या वर्गाला त्रास देतात हे कळलं होतं तिला.
तिने जाहीर केलं "उद्या एक दिवसाची सहल जाणार, कुठे ते सस्पेन्स आहे."
ह्या पोरांना तर उधाणच आलं. सगळी जय्यत तयारी. फुल गुटखा पुड्या सोबत खिसे भरून. सगळे उत्साहात.
गाडी थांबली.. कॅन्सर हॉस्पिटलला... घशाचा, तोंडाचा, व्यसनी कॅन्सर. पेशंटला ह्यांनाच प्रश्न विचारायला लावले. सहल संपली. दुसऱ्या दिवशी भिंती स्वच्छ झालेल्या. आजही वीस वर्षानंतरही दोघे येऊन भेटतात, आपल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाची रूपरेषा मॅडमला सांगतात.
तिला मनोमन वाटतं, पुस्तकी ज्ञान तर देणं कर्तव्यच होतं माझं, पण तरुण पिढीतील हा व्यसनी *महिषासुर* मारणं
जास्त गरजेच होतं, नाही कां.
🤍💙💚
"आई गं, तेंव्हा जुन्या काळी असतील राक्षस, म्हणून देवीने मारलं त्याला. आता कुठे गं राक्षस ? मग कशाला हे सगळं करतो आपण."
"अगदी खरं मनु तुझं म्हणणं. पण रोज आपण देवीला तुझ्या आवडीचे पेढे आणले. ते तुला लगेच खायला मिळत होते का ?
नाही ना, त्यावेळी तुझ्यातला हावरट राक्षस मारला जात होता. तू धीटाईने सुरात आरती म्हणत होतीस, मग तुझ्यातला, स्टेजवर भीती निर्माण करणारा राक्षस देखील मारला गेला.
तिची पूजा, तिला हार, फुलं, रांगोळी, सगळं उत्साहाने करताना आपल्यातला आळशी राक्षस पण मारल्याचं गेला ना..."
मनु म्हणाली, "अगं बाई, आई, बाबाला पण रोज एक तास आरतीला द्यावा लागला, मग त्याचाही मोबाईलबाबा हा राक्षस थोडे दिवसतरी पळाला ना."
आई हसत म्हणाली. "अग बाई, खरंच कि..."
❤️🧡💛
माझ्याशिवाय घरात काही नीट होणार नाही, बघा तुम्ही." असं म्हणणाऱ्या छायाताई
पडल्या पाय घसरून ऐन दुसऱ्या माळेला. सगळं सुनबाईवर आलं. निमूटपणे आरडाओरडा न करता तिने सगळं नवरात्र व्यवस्थित केलं.
छायाताई नवऱ्याला म्हणाल्या, "आपला उगाच भ्रम असतो नाही का. 'माझ्या शिवाय काही होत नाही' खरंतर आपण निमित्त, करताकरविता तोच ना."
नवऱ्याला एवढया वर्षांनी तिच्यातील अहंकाराचा *महिषासुर* मेलेला दिसला ...
वाचकहो, असे अनेक *महिषासुर* स्वभावातून, सवयीतुन दिसत असतात जे वाईट असतात. त्यांचा बिमोड, त्यांचे वैचारिक दहन झाले पाहिजे.
_*लेखक -अनामिक.*_
(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखकास सादर समर्पित. शेअर करतांना कुठलाही बदल न करता शेअर करा ही विनंती. अशा सकारात्मक संदेश असलेल्या कथा वाचण्यासाठी माझ्या *9325927222* या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा. -मेघःशाम सोनवणे.)
आजच्या या अलक *शलाका जठार श्रीरामपूर/पुणे* यांच्या सौजन्याने.
बचत gat
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे प्रदर्शनाचे आयोजन करावे
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 11 : मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. तसेच महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅदमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा आज आणि दि. १२ ऑक्टोबर रोजी मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार तमीळ सेलवन, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे स्टॉल लावल्यास नागरिकांना देखील किफायतशीर किंमतीत वस्तू उपलब्ध होतील. मुंबई शहरातील बचत गटांसाठी दिवाळीपूर्वी हा मेळावा आयोजित केल्यामुळे, बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होईल. आज महिलांना कर्ज देताना बँकासुद्धा पुढे येत आहेत. कारण महिला बचत गटांना दिलेले कर्ज महिला 100 टक्के परतफेड करतात त्याचबरोबर महिला बचत गटाचा उद्योग वाढवण्याबरोबर आपल्या कुटुंबाला देखील बचत गटाच्या माध्यमातून हातभार लावत असतात. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. माविममार्फत उत्पादित वस्तूंचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग यावर भर देण्यात यावा.
दिल्ली येथे भरवण्यात येणारे महिला बचत गटांचे प्रदर्शन तसेच ‘सरस’ सारख्या प्रदर्शनांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची ही चळवळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले
बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळून देणार
- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, सध्या कोरोना नंतर मोठ्या उत्साहात सर्व सण साजरे केले जात आहेत. शहरातील बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन दिवसीय दिवाळी मेळावा आयोजित केला आहे. मुंबई शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच महिला बचत गट यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यान देखील ठेवले आहेत. महिला बचत गटांना राज्य, केंद्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना एकत्रितपणे राबवून त्यांचा लाभ महिला बचत गटांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या साहित्याची ऑनलाईन साहित्य विक्री व्हावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. महिला बचत गटांचे उत्पन्न तिप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप
रुपाली माने यांच्या सिद्धीविनायक महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून रुपये १० लाख, अपर्णा कोरडे यांच्या हयात महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून रुपये ७ लाख, बसलिम गम्मा मेकरी यांना आशू महिला बचत गटाला एचडी एफसी बँकेकडून ९ लाख रुपये गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
महिला उद्योजकांना व्यावसायिक किटचे वाटप
श्रद्धा महिला बचत गटाच्या कविता कांबळे यांना ब्युटी पार्लर साहित्य, संकल्प महिला बचत गटाच्या मनाली सावंत यांना शिलाई मशीन, पंचशील बचत गटाच्या वनिता सुखदान यांनी किचन सेट अप चे वितरण करण्यात आले.
यशस्वी महिला उद्योजकांची माहिती
स्पार्कल महिला बचत गटाच्या स्नेहा भालेराव, इलेक्ट्रोफाइल रिसायकलिन व्यवसाय, मदर सेंट मेरी महिला बचत गटाच्या जयश्री भंडारी, अंगणवाडी पोषण आहार व कटरिंग, भिमाई महिला बचत गट श्रीमती कमल सोनवणे, मसाला व्यवसाय यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
बचत गट स्टॉल ला मान्यवरांनी दिली भेट
माविम मार्फत ९० स्टॉल लावण्यात आले आहेत. दिवाळी सणा निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कंदील त्यात बांबूचे कंदिल, घरगुती फराळ, बांबूच्या परड्या, वारली पेंटिंगचे दिवे, विशिष्ट प्रकारचे तोरण, घरगुती ज्वेलरी, काथ्यापासून बनवलेली उत्पादने यांचा समावेश आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शनाला भेट देऊन तेथील बचत गटांसमवेत संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल यांनी केले. आभार माविमाच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळ सराफ यांनी मानले. सूत्रसंचालन चैताली कानेटकर यांनी केले.
कांदाचाळ साठवणूक मर्यादेत
कांदाचाळ साठवणूक मर्यादेत 50 मेट्रिक टनापर्यंत वाढ
- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
मुंबई दि. 11 : राज्यात कांदाचाळीकरिता पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठीचे निर्देश फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री भुमरे म्हणाले, महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातील कांदा देश आणि विदेशातही निर्यात होतो. कांदा साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत कांदाचाळीस अनुदान दिले जाते हे अनुदान पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टन अशी मर्यादा होती. ती मर्यादा 25 मेट्रिक टनापासून 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे निर्देश फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी दिले.
यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुमरे म्हणाले, आंबा पीक कोकण विभागामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किडींचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यापैकी फळमाशी ही आंबा फळांना नुकसान पोहचविणारी एक महत्त्वाची किड आहे. निर्यातीच्या दृष्टीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
राज्यातील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांना अनुदान दिले जाते यामध्ये कांदाचाळ, शेडनेट, हरितगृह, विविध पिकांची काढणी पश्चात व्यवस्थापन या बाबींचा समोवश होतो. या घटकांचा लाभ घेत असताना साहित्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे योजनेला अल्प प्रतिसाद मिळतो. म्हणूनच राज्य शासनातर्फे पूरक अनुदान देण्याच्या सूचना मंत्री श्री. भुमरे यांनी केल्या.
राज्यात मोसंबी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे, त्यासाठीची दर्जेदार कलमे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्यातील सर्व रोपवाटिकेत मातृ वृक्ष तपासणी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश श्री. भुमरे यांनी यावेळी दिले.
मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पांडुरंग फुंडकर योजनेसाठी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच कृषी विभागाने यास व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. भुमरे यांनी सांगितले.
यावेळी आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम घडी पत्रिका आणि भित्तीपत्रक विमोचन मंत्री श्री. भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला.
००००
राजू धोत्रे/विसंअ/
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


