Wednesday, 12 October 2022

नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा

 नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे

राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

            पुणेदि. 11 : लोकप्रतिनिधीप्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोतनागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावेअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरेविभागीय आयुक्त सौरभ रावमहाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदेराज्य सेवा हक्क आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णीमहाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रियमनपा आयुक्त विक्रम कुमारपुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ताजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

            श्री. कोश्यारी म्हणालेदेश स्वतंत्र झाला तेव्हा खूप मर्यादित सेवा दिल्या जात होत्या. पुढे जनतेचे कल्याण आणि समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यात भर पडत गेली. सनदी सेवांमध्ये उत्तीर्ण झालेले तरुण उमेदवार पब्लिक सर्व्हिस’ कमिशनमधून आले आहेअर्थात सेवा हेच शासनाचे मुख्य काम आहे हे लक्षात घ्यायला हवे.

            राज्यपाल पुढे म्हणालेजनतेला कशा प्रकारे दिलासा देता येईल हे पाहणे आपले काम आहे. जनतेच्या समस्यांसाठी अनेक आयोग निर्माण करण्यात आले असून या आयोगांनी चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याचे काम केल्यास जनतेचे कल्याण साधले जाईल. जनतेच्या कल्याणासाठी शासनप्रशासनामध्ये सुधारणा व संशोधन करावे लागेल. डिजिटायझेशनमध्ये देश अग्रेसर असून ते पुढे न्यायचे आहेअसेही श्री. कोश्यारी म्हणाले.

            लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत राज्यात तसेच पुणे विभागात आलेल्या अर्जांपैकी 95 टक्के अर्जांचा निपटारा झाला ही चांगली बाब आहे. अशा प्रकारे सेवा दिल्यास जनतेच्या विविध समस्यांचे समाधान होऊ शकते. आलेल्या अर्जांवर योग्य प्रकारे निर्णय घेऊन सेवा दिल्या गेल्यास अपीलांची संख्या आपोआप कमी होईलअसेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

            श्री. क्षत्रिय म्हणालेसेवा हक्क कायदा नागरिकांना अधिकारहक्क देणारा आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणारे दाखलेप्रमाणपत्रेजमीनपाणीवीज आदीसंबंधी सेवा सुलभतेनेवेळेत मिळाव्यात यासाठी हा कायदा उपयुक्त ठरला आहे. आयोगाने ऑनलाईन सेवांवर भर दिल्यामुळे जास्तीत जास्त सेवा गतीने देणे शक्य झाले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांच्या संख्येत वाढ झाल्यास नागरिकांना अजून गतीने सेवा मिळतील. नागरिकांच्या सोयीसाठी सेवा केंद्रांची यादीपत्ते प्रशासनाने जाहीर करावेतअसेही श्री. क्षत्रिय म्हणाले.

            प्रास्ताविकात श्री. शिंदे यांनी सेवा हक्क अधिनियमांतर्गत राज्यातविभागनिहाय तसेच पुणे विभागात  नागरिकांना पुरवण्यात आलेल्या सेवांचा संगणकीय सादरीकरणाने आढावा सादर केला. ते म्हणाले, ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ हे आयोगाचे घोषवाक्य असून त्यानुसार काम करत असताना ऑनलाईन सेवा पुरवण्यातून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे.

            अधिसूचित करण्यात आलेल्या ५०६ सेवांपैकी आतापर्यंत ३९२ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून भविष्यात सर्वच सेवा ऑनलाईन करणेआपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणेशासनाच्या सर्व सेवांचे आपले सरकार या एकल संकेतपीठावर एकत्रिकरण करणे आदींसाठी आयोग प्रयत्नशील आहे. महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून वयोवृद्ध तसेच आजारी नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

            आभारप्रदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणालेहे कार्यालय पुणे येथे योग्य व मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करुन दिले असून कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम प्रशासनाइतकाच पुणे विभागातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे. या कार्यालयामुळे प्रशासनाच्या कामावर चांगले संनियंत्रण राहील.

            यावेळी अत्यंत कमी वेळेत तसेच उत्कृष्ट अंतर्गत सजावट केलेले कार्यालय उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमास राज्य लोकसेवा हक्क आयोगमहसूल विभागाचे तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

सेवा हक्क कायदा आणि प्रशासनाची कामगिरी

            राज्यात हा कायदा अंमलात आल्यापासून प्राप्त १२ कोटी ६६ लाख ७६ हजार प्राप्त अर्जांपैकी ११ कोटी ९७ लाख सेवा मंजूर करुन पुरवण्यात आल्या आहेत. यावर्षी १ एप्रिलपासून राज्यात सर्वाधिक २५ लाख २४ हजार सेवांचे अर्ज पुणे विभागात दाखल झाले असून सर्वाधिक २३ लाख २२ हजार सेवा मंजूर करण्यात आल्या तर २१ लाख ७२ हजार सेवांचे वेळेवर वितरण करण्यात आले आहे.

पुणे विभागाची कामगिरी

            पुणे विभागात आपले सरकार पोर्टलवर ३७ विभागांच्या ३९२ सेवांबाबत ऑक्टोबर २०१५ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त २ कोटी ४३ लाख ९८ हजार अर्जापैकी २ कोटी ३१ लाख २ हजार अर्ज (९५ टक्के) निकाली काढण्यात आले आहेत. यावर्षी पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख ९६ हजारपैकी ८ लाख १८ हजार अर्जांचा निपटारा करण्यात आला. विभागात एकूण ९३ टक्के अर्जांसंदर्भातील सेवा वेळेवर देण्यात आल्या आहेत.

0000


 


कांदाचाळ साठवणूक

 कांदाचाळ साठवणूक मर्यादेत 50 मेट्रिक टनापर्यंत वाढ

- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

          मुंबई दि. 11 : राज्यात कांदाचाळीकरिता पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठीचे निर्देश फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

          मंत्री भुमरे म्हणाले, महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातील कांदा देश आणि विदेशातही निर्यात होतो. कांदा साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत कांदाचाळीस अनुदान दिले जाते हे अनुदान पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टन अशी मर्यादा होती. ती मर्यादा 25 मेट्रिक टनापासून 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे निर्देश फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी दिले.

         यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेआयुक्त धिरज कुमारफलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                    श्री. भुमरे म्हणालेआंबा पीक कोकण विभागामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किडींचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यापैकी फळमाशी ही आंबा फळांना नुकसान पोहचविणारी एक महत्त्वाची किड आहे. निर्यातीच्या दृष्टीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

       राज्यातील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांना अनुदान दिले जाते यामध्ये कांदाचाळशेडनेटहरितगृहविविध पिकांची काढणी पश्चात व्यवस्थापन या  बाबींचा समोवश होतो. या घटकांचा लाभ घेत असताना साहित्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे योजनेला अल्प प्रतिसाद मिळतो. म्हणूनच राज्य शासनातर्फे पूरक अनुदान देण्याच्या सूचना मंत्री श्री. भुमरे यांनी केल्या.

       राज्यात मोसंबी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहेत्यासाठीची दर्जेदार कलमे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्यातील सर्व रोपवाटिकेत मातृ वृक्ष तपासणी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश श्री. भुमरे यांनी यावेळी दिले.

         मंत्री श्री. भुमरे म्हणाले की,  पांडुरंग फुंडकर योजनेसाठी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच कृषी विभागाने यास व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. भुमरे यांनी सांगितले.

         यावेळी आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम घडी पत्रिका आणि भित्तीपत्रक विमोचन मंत्री श्री. भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 


 


ओळखा पाहू

  *मी ....................कर  कसा झालो ??*


*माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली...*


*मी खाली उतरून काय झालंय ते बघत होतो...*


*कारण सापडत नव्हतं.*


*मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता.*


*किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता.*


*मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो...*


*तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते?*


*तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो.*


😜😜


*त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले ...*


😊😊😊


🙏. 🙏

: *स्थळ अर्थातच* 😉


*आपटे काका :- अग, ए, पाहुणे येऊन अर्धा तास झाला , नुसती बोलत काय बसलीएस, त्याना कमीत कमी पाण्याचं तरी विचार ना….*


*आपटे काकू :- अरें हो , मी विसरलेच बघा….*

*(पाहुण्यांना)*


*"तुमच्याकडे पाणी सकाळी*

 *येतं की दुपारी येतं….?"*


😜😜


*हसा अणि दिवसातून येकदा तरी ग्रुप वर दिसा..*:           *काही पुरुषांना कामावरुन घरी जाताना मेसेजर डिलीट करुन जावं लागतं.*


*मी म्हणतो एवढी लफडी करायचीच कशाला!!*

🤣🤣🤣

खा आवला

 


रामभक्त गौरव सोहळ्या

 राई गावातील रामभक्त गौरव सोहळ्यास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

 

            ठाणेदि. 11 (जिमाका) : बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी सामाजिक जाणिव ठेवून लोकांच्या जीवनात बदल घडविण्याचे काम केलेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

            भाईंदर मधील राई गावात बालयोगी सदानंद महाराज आयोजित रामभक्त गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल राम नाईकबालयोगी श्री सदानंद महाराजआमदार प्रताप सरनाईकआमदार गीता जैननरेंद्र मेहताजिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसदानंद महाराज हे राज्याचे वैभव आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर करून जगभर पोचविण्याचे काम केले. ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा देशभर आयोजित करण्याचा संकल्प सदानंद महाराज यांनी केला आहे. बालयोगी सदानंद महाराजांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी गेल्यावर वेगळीच भावना व अनुभूती निर्माण होते. सदानंद महाराज हे सामाजिक सुधारणेचे अग्रदूत आहेत. परिवर्तन घडविण्याचे काम ते करत आहेत. बाबांमुळे व्यसनमुक्तीचे काम होत आहे. बाबांच्या दर्शनाने लोकांसाठीचांगले काम करण्याचे बळ मिळते. महाराष्ट्राला वारकरी परंपरेचा मोठा वारसा मिळाला आहे. विश्वशांतीमुळे मानवकल्याणाचा संदेश मिळतो आहे.


लोकमतचामोस्ट पावरफुल

 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लोकमतचामोस्ट पावरफुल पॅालिटिशियनचा पुरस्कार

            मुंबई, दि. 11 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट पावरफुल पॅालिटिशियन चा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला.

            एनएससीआयच्या सभागृहात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, ज्येष्ठ विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री ॲड आशिष शेलार, चेअरमन विजय दर्डा, अभिनेता नाना पाटेकर, अमृता फडणवीस, अभिनेता रणविर सिंग, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कृषी, उद्योग, समाजसेवा, प्रशासकीय सेवा, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चा मोस्ट इम्पॅक्टफुल पॅालिटिशियन पुरस्कार डॅा. जितेंद्र आव्हाड, उत्कृष्ट अभिनेत्री कियारा अडवाणी, उत्कृष्ट अभिनेता रणविर सिंग, व्हिजनरी इंडस्ट्रीयलिस्ट एन चंद्रशेखरन यांना प्रदान करण्यात आला.


            या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य आणि देशाच्या सद्यस्थितीच्या सामाजिक आणि प्रशासकीय घडामोडींबाबत विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि चेअरमन विजय दर्डा यांनी घेतली.


००००



 



संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.

 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर सुरू

स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन गावे होणार चकाचक

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

 

            मुंबईदि. 11 : ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमानजीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून आजपासून (दिनांक ११ ऑक्टोबर) या अभियानाची सुरुवात होत असून येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

            या अभियान / कार्यक्रमामध्ये निर्माण होणाऱ्या स्वच्छतेसंबंधी मत्तागावांमध्ये तयार होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधानागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिर्वतन व गावांगावांतून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेवूनत्यांच्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीतालुके व जिल्ह्यांत स्वच्छतेच्या विविध पैलूंतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबवून व त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करूनस्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरिताराज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

            तसेचराज्यात केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ ही योजना राबविण्यात येत आहे. संपूर्ण ग्रामीण स्वच्छता शाश्वत पद्धतीने टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गतग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकामघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनगोबरधनमैला गाळ व्यवस्थापनप्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनअशा प्रकारे राज्यामध्ये सुरू असणारी ही सर्व कामे पुर्ण करूनराज्यास हागणदारी मुक्त (ODF PLUS) म्हणून घोषित करावयाचे आहे. या सर्व कामांना गतिमान करण्यासाठीग्रामस्थांनी व अधिकाऱ्यांनी या कामात दिलेल्या सहभागाला प्रोत्साहित करण्यासाठीसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील स्पर्धेत यथोचित बदल करूनदिनांक ७ ऑक्टोबर२०२२ च्या शासन निर्णयान्वये नव्याने एकत्रित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सन २०२२-२३ चे अभियान आजपासून सुरु करण्यात आले आहे.

            संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातूनमहाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर करुनग्रामपंचायतीत समाविष्ट गावांतील वैयक्तिक शौचालयेत्यांचा वापरमागणीहागणदारीमुक्त तपासणीचा अहवाल त्यानुषंगाने दुरूस्त करावयाची शौचालयेएक खड्डा ते दोन खड्डा करावयाची शौचालयेगावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याकरीता करावयाची कार्यवाही व पूर्तता याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखूनदिनांक १५ नोव्हेंबर२०२२ पर्यंत ही कार्यवाही करावयाची आहेअसे त्यांनी सांगितले.

            या अभियानांतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा व विविध स्तरावर संबंधित ग्रामपंचायतींना द्यावयाचे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार:

जिल्हा परिषद गट प्रथम रू.६०,०००रु.जिल्हास्तर प्रथम रू. ६ लक्षद्वितीय रू. ४ लक्षतृतीय रू. ३ लक्ष.  विभागस्तर प्रथम रू.१२ लक्षद्वितीय रू. ९ लक्षतृतीय रू. ७ लक्ष राज्यस्तर प्रथमरू.५० लक्षद्वितीय रू. ३५ लक्ष तृतीय रू. ३० लक्ष.

याशिवाय जिल्हा विभाग व राज्य स्तरावर प्रथमव्दितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या ग्रामपंचायती वगळूनजिल्हाविभाग व राज्य स्तरावर संबंधित ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार ही देण्यात येणार आहेत.

विशेष पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे नाव स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरासांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन. जिल्हा स्तर ५०,००० रु.विभागस्तर ७५,००० रु. राज्य स्तर ३,००,००० रु.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन.  जिल्हा स्तर ५०,००० रु.विभागस्तर ७५,००० रु. राज्य स्तर ३,००,००० रु.

स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापन. जिल्हा स्तर ५०,००० रु.विभागस्तर ७५,००० रु. राज्यस्तर ३,००,००० रु.

            याशिवायवेगवेगळ्या महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील कामगिरीकरीता ग्रामपंचायतग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांनासुध्दा अनेक पुरस्कार या स्पर्धेत देण्यात येणार आहे.

            स्वच्छतेच्या या महायज्ञात नागरिककर्मचारीअधिकारी तसेचलोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग देवूनसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

0000

 

 

Featured post

Lakshvedhi