Tuesday, 11 October 2022

भवताल

 भवताल कट्टा ५२

विषय :

सडे-पठारांच्या फुलण्याची गोष्ट !

एरवी वैराण-ओसाड वाटणारे, पण पावसाळ्यात कमालीचे फुलणारे भूभाग म्हणजे सडे किंवा पठारे! हे खरे तर महाराष्ट्राला लाभलेले वैभवच. सड्यांवर भरणारा जीवांचा उत्सव, त्यातील विविधतेची उधळण, या जीवांचे जगावेगळे जगणे-वागणे, तिथली खडतर परिस्थिती, पाणी अशा ज्ञान-अज्ञात गोष्टींवर लख्ख प्रकाश टाकणारा कट्टा...

सहभाग :

महाराष्ट्रातील सड्यांचे विविध अभ्यासक

शुक्रवार, १४ ऑक्टोबर २०२२

सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी :

झूम लिंक :  

https://bit.ly/3rQlGSo

Meeting ID: 891 4243 2891

Passcode: 339479

किंवा

(भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह)

पेजची लिंक :

https://facebook.com/bhavatal/


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


कन्या लाडाची


 

प्रेरणा

 ✍️

*जीवनात आपला कोणीही कितीही तिरस्कार केला तरी, आपण आपला प्रामाणिकपणा व उत्तम विचार सोडू नये,*

*कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं.*

        *🙏😊 🌹🙏*

बायको च कायको


 

अध्यापकांचे मानधन

 राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. 11 : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल  घेऊन दिवाळीपूर्वी  दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी  मिळेल याकडे लक्ष द्यावेअसेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

आरोग्यावरील खर्च

 आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची गरज

- सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 11 : सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहेअसे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

            मुंबई मराठी पत्रकार संघसार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

            मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळेआरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. धनंजय चाकूरकरपत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकरकार्यवाह संदीप चव्हाणकार्यकारिणी सदस्य राजेंद्र हुंजे, प्रा. एम.बी. टकले आदी उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

            मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत म्हणालेराज्याच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य यावर जास्त खर्च करण्याची आवश्यकता आहे. कारण या दोन गोष्टीचा सामान्य नागरिकांशी खूप निकटचा संबंध आहे. तसेच या दोन्ही गोष्टी विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या बाबींवर होणारा खर्च वाढायला हवा. राज्य शासनाच्या वतीने त्याबाबत उपाययोजना करण्यात येतील.

            आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहेअसे मंत्री श्री. सावंत यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे 70 लाख महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील साडेतीन कोटी महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहेअसे त्यांनी सांगितले. 

            सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी तर आभार स्वाती घोसाळकर यांनी मानले.

            यावेळी डॉ. कपिल पाटीलडॉ. मीना अगरवालडॉ. गिरीश चौधरी डॉ. अर्चना देवडीमाधवी रावळशलाका गावडेनिलिमा नगराळे आदींचा सत्कार करण्यात आला.

प्रकल्पग्रस्त साठी सदनिका

 प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका मिळणार

आदित्य ठाकरेंचा निर्णय रदबादल

मुंबई, दि. 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी)

          महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पबाधितांच्या संदर्भात घेतलेला अत्यंत अडनीडा निर्णय रदबादल करण्याची भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांची मागणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मान्य केली आहे. त्यामुळे मालाडच्या प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


          आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार अतुल भातखळकर यांनी मालाडच्या प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका देण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली. यावेळी पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भातखळकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रकल्पबाधितांना न्याय दिला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मालाडमधील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये सदनिका देण्याचा आणि तेथील प्रकल्पग्रस्तांना मालाडमध्ये सदनिका देण्याचा निर्णय झाला होता. प्रकल्पबाधितांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. मविआच्या काळात ही मागणी भातखळकर यांनी सातत्याने लावून धरली तरीही प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला नाही. मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रकल्पबाधितांसाठी उपलब्ध सदनिकांपैकी ७५ टक्के सदनिका आता स्थानिक प्रकल्पबाधितांना उपलब्ध होणार आहे.


          मालाडच्या प्रकल्पबाधितांच्या वतीने भातखळकर यांनी लोढा यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बराच काळ हवालदिल झालेल्या मालाडच्या रहीवाशांना न्याय मिळाला आहे.      


                              

Featured post

Lakshvedhi