Saturday, 8 October 2022

वडाची,आपट्या ची पाने,

 निर्जीव पान ची पूजा.  काल वडाने,आपट्याला विचारलं,

दुखतंय का रे जास्त..?

तुझ्याही फांद्या, तुझीही पानं,

माणसाने केली ना ध्वस्त...


वर्षातून एक दिवस,

म्हणे आपला असतो मान,

कुणी विचार करतो का,

आपल्यातही असतो प्राण...


त्यांचा उत्सव साजरा होतो,

आपली म्हणे होते पूजा,

त्यांना कुठे कळतेय मित्रा,

आपल्याला होणारी ईजा..


पूर्वी बांधायचे दोर वडाला,

आता फांद्या तोडून नेतात,

लचके तोडून त्याच वडाला,

काय तर म्हणे देव म्हणतात..


गरजेपेक्षा जास्त किती,

तोडतात फांद्या नी पाने,

निर्जीव झालेल्या पानांना,

मग म्हटलं जातं "सोने"


दुसऱ्याच दिवशी सोन्याचा,

फक्त पालापाचोळा होतो,

कालचा देव आज मात्र,

पायदळी तुडवला जातो...


कसली म्हणायची श्रद्धा ही,

कसली रे ही भक्ती,

स्वतःला नी निसर्गाला,

फसवायचीच ही युक्ती...


विरोध नाही आमचा कुठल्या,

चाली रीती प्रथांना,

पण बघवत नाही निसर्गाचा,

ऱ्हास उगा होताना


आपण कधी स्वतःला,

देव म्हणवून घेत नाही,

खूप आहेत दुःख आपली,

पण बोलता येत नाही...


आपण देतोय भरभरून,

त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं,

सण साजरे करावे पण,

आम्हालाही जगू द्यावं...


-एक वृक्ष

हमारी बेटी गाय है


 

अंधेरी पूर्व विधानसभा

 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक -  ३ नोव्हेंबरला मतदान

 

 

            मुंबईदि. 7 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या  एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवारदिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.

            निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 14 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार)मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार)मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.

            या पोटनिवडणुकीसाठी दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असून ही सामग्री उपलब्ध आहे.

            मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्रआधारकार्डमनरेगा जॉब कार्डबँक / पोस्ट ऑफिसचे फोटोसहीत पासबुकवाहन परवानापॅन कार्डनॅशनल पॉप्युलेशन रजिस्टार अंतर्गत रजिस्टर जनरल ऑफ इंडीया यांचे स्मार्ट कार्डभारतीय पासपोर्टफोटोसहीत निवृत्ती कागदपत्रेकेंद्र / राज्य / महामंडळ / मंडळ यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्रविधानमंडळ सदस्य / लोकसभा सदस्य यांना दिलेले ओळखपत्रकेंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण विभागाने दिलेले अंपगत्वाचे ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे अनिवार्य आहे.

            या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहेत्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रेदूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.

 

नाशिक नांदूरनाका अपघात

 नाशिक नांदूरनाका अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार.

मुंबई, दि. 8:- नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  

अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

परिवहन विभागाचा आढावा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा

एसटीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवरील बसगाड्या

संपकाळात बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

            मुंबईदि. ७-  एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे,  त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यानएसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले.

            परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली.  मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तववित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिकपरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नेपरिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते.

११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना

            संपकाळात सुमारे दहा हजाराहून अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होतेत्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होतीया कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

इलेक्ट्रिकसीएनजीवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार

            लोकसंख्येचा भार वाढला त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील त्यातून प्रवाशांना आरामदायीपर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घेता येईलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ५४ लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास

            सामाजिक बांधिलकी म्हणून विविध  घटकांना एसटीच्या २१ सवलती दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहेसरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत ५४ लाख ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले.

मालवाहतूक सेवेतून १०७.८० कोटींचे उत्पन्न

            एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे १०७.८० कोटींचे उत्पन्न मिळाले असून या सेवेद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्न धान्याची वाहतूक करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डीबीओएलटी’ तत्वावर बसपोर्टचा होणार विकास

            एस.टी. महामंडळाच्या सुमारे ८१२ ठिकाणी १४२३.९० हेक्टरच्या जागा असून त्यातील ५ शहरातील १८ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा डीबीओएलटी (डिझाईन-बिल्ड- ऑपरेट-लीज-ट्रान्सफर) तत्वावर विकसित करण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे ३ हजार ८०० कोटीपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे. हे करताना त्या जागा केवळ व्यावसायिक वापरासाठी विकसित न करता निवासी- वाणिज्य या संमिश्र वापरासाठी करा आणि तसा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा

            महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षणवाहनांची स्थितीवाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

००००००

मीरा-भाईंदर महापालिका

 मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचेकाँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.

            मुंबई, दि. ७ : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे विरहीत असावेत यासाठी एमएमआरडीएने रस्त्यांची तपासणी करावी. अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि हलक्या वाहनांची वर्दळ असलेले रस्ते यूटीडब्ल्यू तंत्राने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


            मंत्रालयात झालेल्या बैठकीत मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रविण दराडे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते.

            स्वच्छ भारत अभियानात १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या गटामध्ये मीरा भाईंदर महापालिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्री. ढोले यांचे अभिनंदन केले.

            यावेळी भाईंदर उत्तन रस्ता टप्पा एक व दोनचे मंजूर झालेले व अंमलबजावणीसाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेकडे देणे, उत्तन येथे बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणे, सिमेंट कॉक्रीट रस्त्याची कामे पुर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने मंजूर केलेल्या कर्ज निधीचे हप्ते महानगरपालिकेस वितरीत करणे, घोडबंदर शिवसृष्टी प्रकल्पाचे काम मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देणे, अमृत टप्पा दोन मधून मिरा - भाईंदर शहरातील सर्व तलाव विकसीत व सुशोभित करण्यासाठी निधी उपलब्ध करणे, मिरा - भाईंदर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम व स्पोटर्स कॉम्प्लेक्स बांधण्यास मंजुरी आणि निधी उपलब्ध करणे. भाईंदर पूर्व ते घोडबंदर चौपाटी विकसीत करणे, मॅन्ग्रोव्हज् पार्क बांधणे, उत्तन येथे मासळी मार्केट बांधणे, फिश प्रोसेसिंग युनिट व फिशरीहब प्रकल्पासाठी प्रकल्पास मान्यता देणे आदी बाबत चर्चा करण्यात आली.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुला

 प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद  प्रभू, लीना प्रभूराजू रावल तसेच संकुलाचे पदाधिकारी यांच्यासह, प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते. प्रारंभी डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, डॉ.रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनेक होतकरू खेळाडू निर्माण झाले ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा व राज्याचा नावलौकिक वाढविला. क्रीडा संकुलातून असे महान खेळाडू तयार होत आहेत. या खेळाडूंना या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभले आहे.

            विमानतळाशेजारील मेट्रो स्थानकास डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याची अपेक्षा यावेळी प्रभू कुटुंबियांनी व्यक्त केली. त्यांचे कार्य स्मरणात राहावे, यासाठी या मेट्रो स्थानकास प्रभूंचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिसरातील पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी विविध क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंना गौरविण्यात आले.

Featured post

Lakshvedhi