सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 8 October 2022
विनंती साखर सोडा*
*विनंती साखर सोडा*
डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.
"त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते."
*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*
(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*
(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*
(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.*
(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*
(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस (23) हानीकारक रसायने वापरली जातात.*
(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*
(१०) साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*
(११) साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.
(१२) साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*
*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹
*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*
नाशिकच्या अपघातग्रस्त
काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिकच्या अपघातग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर आणि विश्वास
बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत
जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार
दि.8, (जिमाका नाशिक): “काळजी करू नका, घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,” अशा दिलासादायक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला.
नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खाजगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सुहास कांदे, मुफ्ती मोहम्मद, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार रचना पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, डॉ.आवेश पलोड, आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत शासन या अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत आहे. जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी केली .
ही टीम देतेय उपचार
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांच्यासह चार अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक. शल्य चिकित्सक डॉ.भामरे यांच्या नियंत्रणाखाली 3 शल्य चिकित्सक डॉक्टरांचे पथक, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार त्यांच्या नियंत्रणाखाली 2 भूलतज्ज्ञ, 2 न्यायवैदिक तज्ज्ञ, 4 अपघात वैद्यकीय अधिकारी असे एकूण 19 वैद्यकीय पथकासह आपत्कालीन कक्षाच्या सर्व अधिकारी, कक्षाच्या मेट्रन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून एका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे.
या बस अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू, तर चार प्रवासी घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत. पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण, सुविधा हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा रुग्णालयात एकूण 31 जखमी प्रवासी उपचार घेत आहेत.
००००
नेत्र तज्ज्ञ
जर तुम्ही तुमच्या बायकोला डोळे दाखवू शकत नसाल तर मग आम्हाला दाखवा आम्ही सुचवू
नेत्र तज्ज्ञ .
😆😆😆😆😆😆
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा
पुणे, दि. 8- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट दिली. परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांसह केंद्राची त्यांनी पाहणी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील 800 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील 37 केंद्रांवर आज पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा प्रक्रियेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी देखील लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या वेळी अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना तसेच पुण्यातील काही परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली होती.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...










