Friday, 7 October 2022

दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक डॉ. विनया जंगले यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासकपशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले  यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शनिवार दि. 8 ऑक्टोबर आणि सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासकपशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणअन्नसाखळी यासारख्या विविध विषयांवर दिलखुलास कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. प्राणी संग्रहालयराष्ट्रीय उद्यानअभयारण्ये, वन्यजीव आणि मानवाच्या सहजीवनाबद्दलही त्यांनी माहिती सांगितली आहे.  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

लम्पी बाधित जनावराचा मृत्यू

 लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्याससर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

- सचिंद्र प्रताप सिंह

 

            मुंबई, दि. 7 : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा (जनावराचा) मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

            श्री. सिंह म्हणालेपशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

            दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जास्तीत जास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. सिंह म्हणाले, लम्पी आजाराच्या विषाणूच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होणार आहे, तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणाकरणानंतरचे ७१४२१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था (National Institute Of Veterinary Epidemiology And Disease Informatics (NIVEDI) येथे पाठविण्यात येत आहेत.

            शासन अधिसूचना दि. ३०.९.२०२२ अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिली असल्याचे श्री.  सिंह यांनी सांगितले.

             राज्यामध्ये दि. ०७.१०.२०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी एकूण ३३ हजार ६७५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 115.18 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून अकोलाजळगांवकोल्हापूरसांगलीवाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 82.32 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे. 

0000000

अभियांत्रिकी अभ्यासक्रम

 पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा १५ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ८५ टक्के

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. ७ : शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील तीन वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के होत असलेली वाढ यावर्षी १५ टक्के झाली आहे. या प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आता ८५ टक्के झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०१८ - १९ मध्ये ४१ टक्के होती, ही संख्या २०१९ - २० मध्ये ५० टक्के तर २०२०-२१ मध्ये ६० टक्के आणि २०२१-२२ मध्ये ७० टक्के होती. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षांत ही संख्या ८५ टक्के एवढी विक्रमी झाली आहे. पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्थांनी व अध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे सांगून पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवावा, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे. 

            तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत आहे. शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांचा ओघ या क्षेत्राकडे वाढला आहे.

            शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता एकूण प्रवेशक्षमता सुमारे १ लाख आहे. पदविका अभ्यासक्रमांसाठी एकूण ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. विभागनिहाय विचार केल्यास अमरावती विभाग ९१ टक्के, औरंगाबाद विभाग ८६ टक्के, मुंबई विभाग ८२ टक्के, नागपुर विभाग ६८ टक्के, नाशिक विभाग ७८ टक्के व पुणे विभाग ९० टक्के असे प्रवेश झाले आहेत. तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या सहकार्याने रोजगार देणारे क्षेत्र म्हणून हे विकसित करावे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.



माऊली


 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

 महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : ना. प्रमोद सावंत

--------------------------------

इन्व्हेस्ट गोवा परिषदेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर सामंजस्य करार

--------------------------------

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर' व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

इन्व्हेस्ट गोवा या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी, गोवा चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष राल्फ डिसूजा यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या व सामंजस्य करारांचे आदान प्रदान केले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ,गोव्याचे उद्योग मंत्री मावीन गोदीना, गोव्याचे पर्यटन व आयटी उद्योग मंत्री रोहन खुंटे, इन्व्हेस्ट गोवा परिषदेचे निमंत्रक मांगिरिश रायकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आदी विविध राज्यातून मोठ्या संख्येने उद्योजक व गुंतवणूकदार या परिषदेस उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या शतक महोत्सवी शिखर संस्थेतर्फे चेंबरच्या कार्यक्षेत्रातील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज तर्फे बरोबर सामंजस्य करार करून दोन्ही राज्यातील उद्योग वाढीसाठी विविध स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती देऊन ललित गांधी यांनी गोवा येथे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने सुविधा केंद्र व कौशल प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. माजी मंत्री सुरेश प्रभू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गोव्याच्या नवीन उद्योग धोरणाच्या पुस्तिकेचे याप्रसंगी अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या उद्योगाच्या व नवीन गुंतवणुकीच्या विविध संधींचा एक अहवाल ललित गांधी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत सादर केला. तसेच 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग परिषद आयोजित केल्याची माहिती देऊन गोवा सरकारला त्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. गोव्याचे मुख्यमंत्री नामदार डॉ. प्रमोद सावंत यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केल्याचे सांगितले.

मुंबईत संपन्न होणाऱ्या या व्यापार उद्योग परिषदेस देशातील उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आमंत्रण ललित गांधी यांनी उपस्थित त्यांना याप्रसंगी दिले.

माऊली


 

दिव्यांग कल्याण ध्वजनिधी

 राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी



संकलन मोहिमेचा शुभारंभ

 

            मुंबई, दि. 7 : नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित, बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत आहे. नॅब संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

            नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) राजभवन येथे करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            नॅब’ संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या विद्यार्थीनी वसतिगृहातील दृष्टीबाधित विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी शासनाकडून मिळत असलेले योगदान संस्थेतील सर्व मुलींना मिळावे तसेच संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या बी. एड. अभ्यासक्रमाला पुनश्च विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळावी, अशी अपेक्षा नॅब महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केली.

            कार्यक्रमाला नॅब महाराष्ट्रचे मानद सचिव गोपी मयूरकोषाध्यक्ष विनोद जाजूदिव्यांग उद्योजक भावेश भाटियानॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवारमंगला कलंत्री आदी उपस्थित होते.

००००

 

Governor launches Flag Fund Collection Drive for Divyang welfare

 

      Mumbai, 7th Oct : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari launched the Flag Day Fund Collection Drive for the welfare of Visually Impaired Divyangs at Raj Bhavan Mumbai on Friday (7 Oct).

            The Flag Day programme was organised by the Maharashtra Chapter of the National Association for the Blind, an organisation working for the education, training and rehabilitation of the visually impaired Divyang persons and children.

            Applauding the good work done by NAB Maharashtra, the Governor assured that he will take up all pending issues of NAB with the government.

            President of NAB Maharashtra Rameshwar Kalantri briefed the Governor about the various problems faced by NAB for the education of visually impaired girls and the training of persons with multiple disabilities.

            Honorary General Secretary of NAB Gopi Mayur, treasurer CA Vinod Jaju, Joint Secretary and Divyang entrepreneur Bhavesh Bhatia, Mukteshwar Munshettiwar, Mangala Kalantri and others were present.

0000

Featured post

Lakshvedhi