Thursday, 6 October 2022

घरबांधणीसाठी कर्ज पोलिसांना

 पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज

 

            राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मे २०१९ पर्यंत घरबांधणी अग्रीम देण्यात आले आहे. त्यानंतर ७ जून २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडीत करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना देण्याचा निर्णय झाला होता. मात्रया घरबांधणी अग्रीमासाठी ७ हजार ९५० अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी २ हजार १२ कोटींची गरज भासणार आहे. मात्र इतकी मोठी रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने पूर्वी प्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला

पालकमंत्री मुंबई उपनगर भेट

 



पालकमंत्री आपल्या भेटीला'

 मुंबई उपनगर जिल्ह्यात 'पालकमंत्री आपल्या भेटीलाया उपक्रमास  एन वॉर्ड मधून

उद्यापासून सुरुवात : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबईदि.५: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा  नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी  ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत 'पालकमंत्री आपल्या भेटीलाहा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी  'एन वॉर्डमधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात  जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

            गुरुवार  दि. ०६/१०/२०२२ रोजी एन वॉर्ड, शुक्रवार दि.०७/१०/२०२२ रोजी आर साऊथ वॉर्ड येथेशनिवार दि.०८/१०/२०२२ रोजी के ईस्ट वॉर्ड, सोमवार दि.१०/१०/२०२२  रोजी आर सेंट्रल वॉर्ड, बुधवार दि.१२/१०/२०२२ रोजी एल वॉर्ड, गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी एस वॉर्ड, शुक्रवार दि.१४/१०/२०२२ रोजी  एम ईस्ट वॉर्ड, शनिवार दि.१५/१०/२०२२ एच वेस्ट वॉर्ड, सोमवार दि.१७/१०/२०२२ रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे, बुधवार, दि.१९/१०/२०२२ रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे, गुरुवार दि.२०/१०/२०२२ रोजी पी साऊथ वॉर्ड येथे, सोमवार दि.३१/१०/२०२२ रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे, बुधवार दि.०२/११/२०२२ रोजी के वेस्ट वॉर्ड येथे, गुरुवार दि.०३/११/२०२२ रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे, शुक्रवार दि.४/११/२०२२ रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. नियोजित दिवशी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम  वरील प्रमाणे सुरू होणार आहे.

             यावेळी  नागरिकांना  आपल्या समस्या पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सांगता येतील व ती समस्या सोडवण्यासाठी अर्ज ही देता येणार आहे. अर्जामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. थेट बाधित व्यक्ती अथवा समूहाकरिता / Directly Affected Person or Group, अर्जदाराचे नाव / Name :,मोबाईल क्रमांक / Mobile No., संपूर्ण पत्ता / Full Address :, ई-मेल आयडी / Email Id :, लोकसभा क्षेत्र / Loksabha Area, विधानसभा क्षेत्रसभा / Assembly Area, बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड / BMC Ward, निवडणूक वॉर्ड क्रमांक / Election Ward No, तक्रार - समस्या विभाग / Complaint Department : 17 A) जिल्हाधिकारी B) तहसीलदार C) बृहन्मुंबई महानगरपालिका D) पोलिस E) रेल्वे)आरोग्य G) SRAH) म्हाडा 1) स्वच्छता ) रेशनिंग K) महानगर गॅस L) अन्य लेखी समस्या / तक्रार  नागरिकांना सविस्तरपणे देता येईल.

       तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त  नागरिकांनी, 'पालकमंत्री आपल्या भेटीलाया उपक्रमामध्ये सहभागी  व्हावे.  यासाठी वरील नमुन्यांमध्ये अर्ज देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त ज्या नागरिकांच्या इतर काही लेखी समस्या असतील. त्याचे देखील निवेदन देता येईल, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

000


दिलखुलास

 दिलखुलासकार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रा. सुशिल शिंदे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 5: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुशिल शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर गुरुवार  दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            मुंबईच्या कांदिवली परिसरातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. शिंदे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या निमित्ताने श्री. शिंदे यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील योगदानाविषयी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती जाणून घेतली आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना उपयुक्त ठरली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

आपत्ती व्यवस्थापन

 आपत्ती व्यवस्थापनातील कामांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र,

राज्य सरकारच्या कंपन्यांना नेमणार.

            आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या कंपन्यांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीकडून प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून टर्न की तत्त्वावर नेमण्यात येईल. या कंपन्यांना नियुक्त करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती जाहिरात (Expression of Interest) देखील प्रसिद्ध करण्यात येईल. या कंपन्यांसमवेत सामजंस्य करार करण्यात येऊन त्यांना थेट नियुक्तीने कामे देण्यात येतील.

कोणत्याही आपत्तीस तोंड देतांना तसेच आपत्ती सौम्यीकरणासाठी ज्या उपाययोजना करण्यात येतात त्यातील कामांच्या अंमलबजावणीसाठी मदत पुनर्वसन विभागाकडे स्वत:ची यंत्रणा नाही. या कंपन्यांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील.


-----०-----

दिवाळी भेट शिधात्रिकाधारकांना

 शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

            दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.


            सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


-----०----


 




 



भिक्षुक को लपेटा

 एक फ्लैट में घंटी बजती है,

😁😁


और महिला जो घर में अकेली है.....

दरवाज़ा खोलती है...👸

😀😀


*भिक्षुक:-* माई, भिक्षा दे l 


😀😀


*महिला:-* ले लो, महाराज.....


*भिक्षुक:-* माई...

 ज़रा यह द्वार पार करके बाहर तो आना l

😛😛😛😛


वह द्वार पार करके बाहर आती है l


*भिक्षुक* (उसे पकड़ते हुए ) 😗

हा... हा... हा...

मैं भिक्षुक नहीं, रावण हूं !

😛😛


*महिला:-* हा... हा... हा...

मैं कहाँ सीता हूं,

कामवाली बाई हूँ l


😛😛😛


पिक्चर अभी बाकी है.......


*रावण* 😗 हा..हा..हा..

सीता जी का अपहरण करके आज तक पछता रहा हूं, 

तुम्हें ले जाऊंगा तो मंदोदरी खुश हो जायेगी । 

उसे भी कामवाली बाई की ही ज़रूरत है l


😛😛😛


*महिला* 😗 हा...हा... हा...

पगले, सीता को ढूंढने सिर्फ राम आऐ थे........


मुझे ढूँढने सारी सोसायटी आएगी l सभी के फ्लेट की दीवाली सफाई बाकी है !



DIWALI SPECIAL

😝😝😂😜😜

Featured post

Lakshvedhi