Wednesday, 28 September 2022

वस्तुसंग्रहालय

 आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            मंत्रालयात राज्य वस्तुसंग्रहालय साकारण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, आर्किटेक्ट राहुल गोरे,बतुल राज मेहता, डॉ. कुरूष दलाल, मारिया तालिब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, अनेक राज्यांनी आपली राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण केली असून आपल्या या संग्रहालयात आपल्या राज्याचा इतिहास, कला आणि संस्कृती दर्शविली आहे. महाराष्ट्रातही राज्य संग्रहालय निर्माण करताना महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहास आणि प्रगती प्रतिबिंबित करण्यात येईल.


            अश्मयुगापासुन ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासाठी संचालनालयामार्फत कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी. तसेच देशातील सर्वोत्तम वस्तूसंग्रहालये यांची पाहणी आणि अभ्यास तातडीने करण्यात यावा अशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. आवश्यकता वाटल्यास आपण सुद्धा बिहार येथील वस्तूसंग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे भेट देणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            या संकल्पिक वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्वाचे कालखंड-अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ, मराठा व ब्रिटिश कालखंड, महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने उभारणार असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण करताना सल्लागार समिती स्थापना करण्यात आली आहे. या सदर समितीमध्ये पुरातत्त्वशास्त्र, वस्तुसंग्रहालय शास्त्र, इतिहास, संस्कृती, कला, विज्ञान, प्रशासन, वास्तु व स्थापत्यशास्त्र, इ. विषयातील १८ तज्ज्ञ संदस्यांचा समावेश आहे.



जय महाराष्ट्रआरोग्य मंत्री

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात आरोग्य मंत्री

डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवारदि. 29 सप्टेंबर 2022 रोजी  सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या उपाययोजना‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’आरोग्य विभागाची नोकर भरती याबाबत विस्तृत माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत  यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान संपूर्ण राज्यात सुरु आहे. या अभियानाचा सर्व माताभगिनींनी लाभ घ्यावाअसे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000000

कार्यशाळा फॉर exporters

 निर्यातदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 28 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई शहर अतिरिक्त जिल्हाधिकारी  तथा या उपक्रमाचे अध्यक्ष रामदास खेडकर यांच्या हस्ते झाले.

            यावेळी अतिरिक्त उद्योग संचालक सुरेश लोंढेउद्योग सह संचालक काशिनाथ डेकाटे तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर उपस्थित होत्या.  महात्मा गांधी सभागृहराष्ट्रीय मिल मजदूर संघमजदूर मंजिलजी.डी. आंबेकर मार्गभोईवाडापरेलमुंबई येथे उद्यापर्यंत (29 सप्टेंबर)  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

            आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. त्याअनुषंगाने गुंतवणूक वृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन आहे.

          आज संपन्न झालेल्या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियमबँकेचा सहभागउद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहितीनिर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतूदी,  निर्यातक्षम उद्योजकनव उद्योजकऔद्योगिक संस्था व संघटनाऔद्योगिक समूहऔद्योगिक सवलतीकेंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारीजिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्यनिर्यात संबंधी कामकाज करणारे घटकसंशोधकबँकेचे प्रतिनिधी इत्यादींनी मार्गदर्शन केले.

            या दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील निर्यातदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

·       महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणारे राज्य आहे.

·       संपूर्ण देशातून होणाऱ्या निर्यातीत राज्याचा १७.३३ टक्के एवढा वाटा आहे.

·       सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुमारे ३२ लाख कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.

·       मुंबई उपनगरमुंबईपुणे या तीन जिल्ह्यांतून सर्वाधिक निर्यात होते.


बाहेर पिऊ नका..🥃

 बाहेर पिऊ नका..🥃

आपल्या वागण्यावरूनही लोकं ओळखतात.


मी-- सकाळी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी बसमध्ये चढलो...तर


कंडक्टरने हसत सुहास्य वदनाने मला विचारले... 'साहेब, काल रात्री तुम्ही ठिक-ठाक घरी पोहचले होतेत ना ?


मी (आश्चर्याने) का? काल रात्री मला काय झाले होते ...?


कंडक्टर: काल तुम्ही नशेत होतात.


मी (रागाने): तुम्हाला कसं काय कळलं?


कंडक्टर: कसं आहे साहेब, काल रात्री जेव्हा तुम्ही बसमध्ये बसला होतात, 

तेव्हा एक मॅडम बसमध्ये चढल्या होत्या आणि तुम्ही उठुन आपली सिट त्यांना ऑफर केली होतीत...


मी: मग त्याच्यात विशेष काय झालं, हा आदर प्रत्येकाने करायलाच हवा, ह्यात मी नशेत असण्याचा काय संबंध?


महिलेला सिट ऑफर करणं गुन्हा आहे का?


कंडक्टर : साहेब गुन्हा तर नक्कीच नाही..

.

पण त्यावेळी बस पूर्ण रिकामी होती..

.

आणि पुढचा सगळा प्रवास तुम्ही उभे राहूनच केलात.

😜😝

महाज्योतीओबोसीविद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

 महाज्योती’ च्या माध्यमातून ओबोसीविद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार

- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

            मुंबईदि. २७ : विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी आणि उमेदवार यांच्यासाठी ‘महाज्योती’ ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार  असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

            ‘महाज्योती’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री. सावे बोलत होते. या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगेसंचालक डॉ. सिद्धार्थ गायकवाडमुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल वासनिककंपनी सेक्रेटरी अविनाश गंधेवार उपस्थित होते.

            पीएच डी. करणाऱ्या उमेदवारांना अवॉर्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी रु.३१ हजारतसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तर पुढील तीन वर्षांसाठी रु.३५ हजार तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एम. फिल. उमेदवारांना एम. फिल ते पीएच.डी. असे एकत्रित (Integrated) देण्याबाबत बार्टीपुणेच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

            एम. फिल. उमेदवारांना रु.३१ हजारघरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णयही घेण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेसाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन     रु.१३ हजार आणि रुपये १८ हजार आकस्मिक एकवेळ खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला.

            राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि  मुलाखतीस पात्र उमेदवारांना रु.२५ हजार  एकवेळ अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना रु.१० हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जागा

 पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जागा हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर करावे.

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

धुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत गावासंदर्भात बैठक

            मुंबई, दि. 27 :- जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात भूसंपादनासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात बैठक झाली.

            यावेळी आमदार मंजुळा गावित, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात भूसंपादनासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

----000--


 



 

वन कर्मचाऱ्यांना

 वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ

-  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 27 : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की,देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्यजीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. नागरी संपत्तींचे आणि मनुष्यांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना राज्य शासनातर्फे विविध लाभ देण्यात येतात. त्याप्रमाणे वनांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनादेखील मिळावेत ही वन कर्मचाऱ्यांची मागणी काही वर्षे प्रलंबित होती. वन कर्मचाऱ्यांनाही अनेक धोक्यांना तोंड द्यावे लागते. वणवे विझवतानाशिकार रोखतानावनांतील वृक्षचोरी वा अन्य प्रकारची चोरी रोखतानाजखमी किंवा मानवी वस्तीत शिरलेले वन्य प्राणी वाचविताना वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींना वन कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी अनेकदा वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो किंवा त्यांना गंभीर जखमी होऊन कायमचे दिव्यांगत्व येण्याचा धोका असतो.

            वन विभागाच्या प्रस्तावानुसार वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास 25 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान मार्गे वहन करण्याचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

            कर्तव्य बजावताना वन कर्मचारी जर कायमचा दिव्यांग झाला तर त्या वन कर्मचाऱ्यास श्रेणी प्रमाणे  3 लाख 60 हजार ते 3 लाख रुपये इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्याचा उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल.

            मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे वन कर्मचाऱ्यांना आता भरीव लाभ मिळणार आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य वाढेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/27.9.22

 

Featured post

Lakshvedhi