Wednesday, 28 September 2022

कार्यशाळा फॉर exporters

 निर्यातदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 28 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई शहर अतिरिक्त जिल्हाधिकारी  तथा या उपक्रमाचे अध्यक्ष रामदास खेडकर यांच्या हस्ते झाले.

            यावेळी अतिरिक्त उद्योग संचालक सुरेश लोंढेउद्योग सह संचालक काशिनाथ डेकाटे तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर उपस्थित होत्या.  महात्मा गांधी सभागृहराष्ट्रीय मिल मजदूर संघमजदूर मंजिलजी.डी. आंबेकर मार्गभोईवाडापरेलमुंबई येथे उद्यापर्यंत (29 सप्टेंबर)  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

            आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. त्याअनुषंगाने गुंतवणूक वृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन आहे.

          आज संपन्न झालेल्या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियमबँकेचा सहभागउद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहितीनिर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतूदी,  निर्यातक्षम उद्योजकनव उद्योजकऔद्योगिक संस्था व संघटनाऔद्योगिक समूहऔद्योगिक सवलतीकेंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारीजिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्यनिर्यात संबंधी कामकाज करणारे घटकसंशोधकबँकेचे प्रतिनिधी इत्यादींनी मार्गदर्शन केले.

            या दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील निर्यातदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

·       महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणारे राज्य आहे.

·       संपूर्ण देशातून होणाऱ्या निर्यातीत राज्याचा १७.३३ टक्के एवढा वाटा आहे.

·       सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुमारे ३२ लाख कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.

·       मुंबई उपनगरमुंबईपुणे या तीन जिल्ह्यांतून सर्वाधिक निर्यात होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi