Tuesday, 27 September 2022

ग्रामपंचयतींना मतदान

 ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजीआता 16 ऑक्टोबरला मतदान

 

            मुंबईदि. 26 (रानिआ) : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईलतर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईलअशी माहिती राज्य  निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

            राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.  नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतीलअसेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

नवरात्रीचे गिफ्ट घ्या नवऱ्याकडून

 


Monday, 26 September 2022

लेट्स go oooooo


 

नमो माये महामाये



 

कर्करुग्णांना निवारा

 कर्करुग्णांना निवारा देणाऱ्या नाना पालकर

रुग्ण सेवा सदनसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 26 : नाना पालकर स्मृती समिती आपल्या रुग्ण सेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत व नाममात्र शुल्क घेऊन निवाराअन्न व औषधोपचार देण्याचे सेवाभावी कार्य निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. मुंबई येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या नाना पालकर स्मृती समितीसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या व त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  

            परळ मुंबई येथील नाना पालकर स्मृती समितीच्या पुढाकाराने बोरिवली येथे 'डे केअर किमोथेरपीकेंद्र सुरू करण्यासंदर्भात नाना पालकर स्मृती समिती तसेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत आदान-प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ श्रीकांत बडवेटाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावलीप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे व नाना पालकर स्मृती समितीच्या सचिव डॉ. सुमेधा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

            नाना पालकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वेचले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले नाना पालकर रुग्ण सेवा सदन केवळ कर्करुग्णांनाच नाही तर इतर अनेक रुग्णांना तसेच त्यांच्या आप्तेष्टांना मदत करीत आहे असे राज्यपालांनी सांगितले.

            उत्तर प्रदेशात वाराणसी येथे देखील कर्करुग्णांच्या उपचाराची सोय आहे. परंतु 'टाटाया नावातच काही जादू आहेकी ज्यामुळे लोक देशभरातून टाटा स्मृती हॉस्पिटल येथे उपचारासाठी येतात, असे राज्यपालांनी सांगितले.  विज्ञानातील संशोधनामुळे एक दिवस प्रत्येक कर्करुग्ण बरा होईल असा आपणास विश्वास वाटतो असे राज्यपालांनी सांगितले.

"कर्करोग निदान करण्यासाठी लागणार वाढता खर्च चिंताजनक" : डॉ राहुल बाणावली

            देशातील लोकांचे सरासरी वय जसे वाढत आहे तसे कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून सन २०३५ पर्यंत देशात दरवर्षी २० लक्ष कर्करुग्णांचे निदान होईल, असे सांगताना कर्करुग्णांच्या उपचाराचा वाढत असलेला खर्च आणि रोगनिदान होईपर्यंत होणारा खर्च चिंताजनक असल्याचे टाटा स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राहुल बाणावली यांनी सांगितले.

            टाटा रुणालयात आजही उपचार परवडणाऱ्या किंमतीत होत असल्यामुळे देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले.  रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी मुंबईत निवाऱ्याची सोय होणे महत्वाचे असते, असे सांगून नाना पालकर संस्थेसारख्या किमान दहा सेवाभावी संस्थांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

            बोरिवली येथे २ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या केमोथेरपी केंद्रामुळे लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा मिळेल तसेच त्यामुळे पश्चिम उपनगरेविरारडहाणूपालघर येथील रुग्णांची सोय होईल असे नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव सुमेधा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.    

            सुरुवातीला राज्यपालांनी रुग्ण सेवा सदनाला भेट देऊन तेथील सेवाकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध विभागांना भेट दिली तसेच निवासी रुग्ण व नातलगांशी संवाद साधला.

०००००

 

Governor Koshyari applauds the work of Nana Palkar Smriti Samiti

 

            Mumbai Dated 26 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Rugna Seva Sadan run by the Nana Palkar Smriti Samiti at Parel in Mumbai and applauded its work of providing shelter to cancer patients and their relatives at affordable costs.

            A memorandum of understanding for starting a Day Care Chemotherapy clinic  at Borivali was signed between the Nana Palkar Smriti Samiti and the Tata Memorial Centre in presence of the Governor.

            Earlier the Governor visited the Rugna Seva Sadan run by the Samiti and interacted with patients and their relatives.

            President of Nana Palkar Smriti Samiti Dr Shrikant Badwe, Director of Tata Memorial Centre Dr. Shripad Banavali, well-known oncologist Dr. Shailesh Shrikhande and Secretary of Nana Palkar Smriti Samiti Dr. Sumedha Joshi were present.

निर्यातदार कार्यशाळा प्रदर्शन

 निर्यातदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आणि प्रदर्शन

            मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

            आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. त्यानुषंगाने गुंतवणुकवृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District one Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन असणार आहे.

            कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियम, बँकेचा सहभाग, उद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहिती, निर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतूदी, तज्ज्ञ निर्यातदारांचे अनुभव कथन तसेच सदर चर्चासत्रांकरिता निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक सवलती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

            या एक दिवसीय कार्यशाळा तसेच दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता दि. 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उपस्थित रहावे, असे जिल्ह्यातील निर्यातदारांना आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता मर्यादित आसन व्यवस्था असल्याने आपल्या उपस्थितीबाबत उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर, मुंबई, या कार्यालयाच्या ई-मेल आयडी didicmumbai@gmail.com तसेच या कार्यालयाच्या 022-25206199/25208182 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी, असे उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, मुंबई यांनी कळविले आहे.


000

कळंब देवी अक्षी

 *श्री कळंबादेवी/कालिका देवी मंदिर*अक्षी, ता. अलिबाग जिल्हा रायगड.

संकलन - सुधीर लिमये पेण 

अलिबागकडून नागावकडे जाताना अक्षी हे लहानसे गाव लागते. स्वछ समुद्रकिनारा, सुंदर वाड्या आणि तेराव्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख ही या गावाची काही वैशिष्ट्ये! या गावात दोन फार जुनी आणि महत्वाची मंदिरेही आहेत. त्यातील एक।म्हणजे श्री सोमेश्वर महादेव मंदिर व दुसरे श्री कालिका देवीचे मंदिर! 


अक्षी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ कालिका देवीचे सुंदर मंदिर आहे. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता ज्यामुळे या मंदिराचे रूप पूर्णपणे पालटून गेले आहे. मंदिराच्या आत प्रशस्त सभामंडप आहे व समोरच देवीच्या दोन मूर्ती आहेत. मंदिरासमोर दोन आधुनिक बनावटीच्या दीपमाळा आहेत ज्यांना लाल व पिवळ्या रंगाने रंगवलेले आहे. हे मंदिर दिसत जरी नवीन बनावटीचे असले तरी या मंदिराचा इतिहास कमीत कमी ९०० वर्षे पूर्वीचा आहे. 


अक्षी गावात शिलाहार कालीन एक व यादव कालीन एक असे दोन दगडी शिलालेख आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराजवळचा शिलालेख (गद्धेगळ) शके १२१३ म्हणजे सन १२९१ मधील आहे. यादव राजा रामचंद्रदेव याचा अधिकारी श्रीजाईदेव याचा मुलगा ईश्वरदेव क्षत्रिय याने या कालिका देवीच्या मंदिरातील ब्राह्मणास दान दिल्याचा मजकूर कोरून ठेवलेला आहे. या मंदिराच्या अलीकडे ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर शिलाहार राजा दुसरा केशीदेव याचा शके ११३१ म्हणजे सन १२०९ मधला दुसरा एक शिलालेख आहे. 


या शिलालेखातही या मंदिराबाबत नोंद आहे. शंकर गोपाळ तुळपुळे यांनी १९६३ मध्ये पुणे विद्यापीठात प्रकाशित केलेल्या *प्राचीन कोरीव लेख* या पुस्तकात या शिलालेखाचे वाचन पुढील प्रमाणे केले आहे. केशीदेव याचा महाप्रधान भइर्जु आणि प्रधान अधीर यांनी शक संवत ९३४ परिधावी संवत्सर, अधिक मास, द्वितीय पक्ष, शुक्रवारी या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कवली धान्य नेमून दिले. मो. ग. दीक्षित यांनी या शिलेखाचे वाचन करताना "नऊ कवली" असे वाचन न करता "भइर्जुतलातव्हानं उकरली" असे वाचतात. त्यामुळे या लेखाचा अर्थ बदलतो. या वचनाप्रमाणे देवीच्या सन्मानार्थ ---- उकरले (खोदले). दानविषयक भाग नष्ट झाल्याने नक्की काय खोदले याचा उलगडा होत नाही. पण त्यांनी धार्मिक कार्यासाठी पुष्करणी अथवा विहीर खोदली असावी. या मंदिराच्या बाजूला एक विहिरही आहे व सोमेश्वर मंदिरासमोर एक लहानशी पुष्करणी ही आहे. त्यामुळे या वाचनाला पुरावा मिळतो. शिवाय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांनीही "शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख" या पुस्तकात दीक्षितांचे वाचन अधिक योग्य वाटते असे नमूद केले आहे. अर्थ कोणताही खरा असला तरी देवीचा उल्लेख दोन्ही वाचनांमध्ये आहे त्यामुळे या देवीची स्थापना १२ किंवा १३ व्या शतकात नक्कीच झाली असावी. 

या मंदिराशेजारी असलेल्या छोट्या मंदिरात काही वर्षांपूर्वी खोदकाम करत असताना सापडलेल्या गजांतलक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. हे अतिशय दुर्मिळ शिल्प क्वचितच पहायला मिळते. अलिबागमध्ये वरसोलीतील बेलेश्वर व आवासमधील वक्रतुंड मंदिरासमोर हे गजांतलक्ष्मीचे शिल्प पाहता येते. 

संदर्भ:

१.प्राचीन कोरीव लेख - शं. गो. तुळपुळे (१९६३)

२. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट (१८८३)

३. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख - डॉ. वासुदेव विष्णू मिराशी (१९७४)

४. वारसा अतिताचा - पंकज समेळ (२०२१) 


©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे

Featured post

Lakshvedhi