Monday, 26 September 2022

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू



 पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

पात्र शिक्षक व पदवीधरांनी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत

- श्रीकांत देशपांडे.

            मुंबई, दि. 26 : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपाडे यांनी केले.

            राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरददळवी उपस्थित होते.

            श्री.देशपांडे म्हणाले की, राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

            शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.

             या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

            पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

वॉक फॉर ह्युमॅनिटी

 राज्यपालांच्या उपस्थितीत ‘वॉक फॉर ह्युमॅनिटी’ संपन्न

            मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'द वॉक फॉर ह्युमॅनिटी' हा समाजातील विविध उपेक्षित घटकांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.


            अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टतर्फे मातृशक्तीच्या सन्मानासाठी आयोजित या कार्यक्रमात कर्करोग पीडित, तृतीयपंथी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिला, दिव्यांग मुले, आदिवासी तसेच वेश्याव्यवसायातील महिला आदी सहभागी झाले होत्या.

            यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी, रमेश गोवाणी, मंजू लोढा, शायना एन.सी. प्रामुख्याने उपस्थित होत्या.


००००

Governor attends 'Walk for Humanity'

      Mumbai Dated 26 : Governor Bhagat Singh Koshyari attended a programme 'The Walk for Humanity' in support of various under previeaged sections of society held in Mumbai.

      The Walk for Humanity was organized by the Ankibai Ghamandiram Gowani Trust to support and build an inclusive society.

      Cancer patients, members of the transgender community, divyang children, acid attack victims, tribal women and sex workers participated in the walk

      Trustee Nidarshana Gowani, Ramesh Gowani, Manju Lodha, Shaina NC and others attend the program.


000

आदर्श

 विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 26 : देशाच्या फाळणीनंतर मुंबई येथे येऊन एक दमडीही हाती नसताना प्राचार्य के. ए.म कुंदनानी यांनी ध्येयाने प्रेरित होऊन नॅशनल कॉलेज सुरु केले व कालांतराने हैदराबाद सिंध बोर्डाच्या माध्यमातून विविध शिक्षण संस्था उभारल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी श्री. कुंदनानी यांच्याप्रमाणे जीवनात उच्च आदर्श पुढे ठेवून कार्य करावे व मातृभूमीची सेवा करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते आज हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्ड तसेच आर.डी. आणि एस.एच. नॅशनल कॉलेजचे संस्थापक विद्यासागर प्राचार्य के एम कुंदनानी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण वांद्रे मुंबई येथील संस्थेच्या परिसरात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            कार्यक्रमाला एचएसएनसी बोर्डाचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य डॉ. नेहा जगतियानी, विश्वस्त प्रतिनिधी वंदन अग्रवाल तसेच विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

            ‘सुरुवातीला अडचणी आल्या तरी देखील चांगल्या उद्दिष्टाने सुरु केलेले कार्य अंतिमतः पूर्णत्वाला जाते. प्राचार्य कुंदनानी व संस्थापक अध्यक्ष बॅरिस्टर होतचंद अडवाणी यांचे हेतू उदात्त होते. त्यांच्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी जीवनात शिक्षक व्हावे, उद्योजक व्हावे किंवा शेतकरी व्हावे, परंतु ध्येय मात्र चांगले ठेवावे’, असे राज्यपालांनी सांगितले. आपण लहानपणी साधू वासवानी यांच्या विचारांनी प्रेरित झालो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.

कॅपिटेशन फी घेतली नाही

            हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या कोणत्याही महाविद्यालयाने आजवर एक रुपया देखील कॅपिटेशन फी घेतली नाही असे सांगताना संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणावर भर दिला, असे एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. ही संस्था सिंधी अल्पसंख्यांक असली तरी देखील आज ८० टक्के विद्यार्थी बिगर सिंधी असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून पुढील चार वर्षात दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून साडेचार लक्ष विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे श्री. हिरानंदानी यांनी सांगितले.

            यावेळी आर डी नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नृत्य नाट्य सादर केले तसेच संस्थेचा इतिहास सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली.  

००००



 


Governor Koshyari unveils the bust of educationist Principal K.M. Kundnani


            Mumbai, 26th Sept : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari unveiled the bust of educationist and the founder secretary of the Hyderabad (Sind) National Collegiate Board and R D National College Vidyasagar Principal K M Kundnani in the premises of R D National College at Bandra Mumbai on Monday (26 Sept).


            Former president of HSNC Board Kishu Mansukhani, Provost of HSNC Cluster University Dr. Niranjan Hiranandani, Vice Chancellor of HSNC University Dr. Hemlata Bagla, Principal of R D National College Dr. Neha Jagtiani, principals of various HSNC Colleges, members of faculty and students of National College were present.


            Speaking on the occasion the Governor paid rich tributes to Vidyasagar Principal K M Kundnani. The Governor said Principal Kundnani started educational institutions in Mumbai despite losing everything in the aftermath of the partition of the country. He appealed to the students to set higher ambitions and observe moral and ethical values in whatever they do.



 मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे



पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

            मुंबई, दि. 26 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्वाचा  असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक  आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव आनंद लिमयेपोलीस महासंचालक रजनीश सेठबृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरप्रधान सचिव (सुरक्षा) संजय सक्सेनाप्रधान सचिव (अपिल आणि सुरक्षा) शाम तागडे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कुलवंत कुमार सरंगल, अमितकुमार सिंग, अर्चना त्यागी, सह पोलीस आयुक्त, मुंबई विश्वास नांगरे-पाटील, राजवर्धन, राजकुमार व्हटकर यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अपराध सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी पोलीसदलाचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा फेर प्रस्ताव केंद्रशासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या आकृतिबंध मंजुरीचे प्रस्ताव तातडीने 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. राज्यात नवीन पोलीस स्टेशन निर्मिती करण्यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा तसेच हा आराखडा तयार करतांना लोकसंख्या आणि तंत्रज्ञान हे आधारभूत मानण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी पोलीस स्पोर्टस् अकादमीचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करावा. तसेच पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली परवानगीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देऊन याबाबत उचित कार्यवाही करावी, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

             मुंबई मध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा टप्पा 1 पूर्ण झाला असून टप्पा 2 ची कार्यवाही सुरु आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्वं पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबरोबरच नवीन बोटी खरेदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच सागरी सुरक्षेकरिता जुन्या बोटींची दुरुस्ती आणि तांत्रिक पदे भरती करण्यासाठीचाही प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            राज्यात सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीचा प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी. नागरिकांना अनेक सेवा ऑनलाईन देण्यात येतात. सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा. सध्या असलेल्या अंमली पदार्थ विरोधी (नार्कोटिक) कायद्यात राज्य सरकारच्या सुधारणा प्रस्तावित करण्यासंदर्भात विभागाने अभ्यास करावा. मुंबईमध्ये प्रस्तावित डिटेंशन सेंटरचा प्रस्ताव तातडीने सादर करुन त्यास मंजुरी घ्यावी. तसेच राज्यामध्ये प्रशिक्षित असे श्वान पथक तयार करावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शक्ती कायदा, निर्भया पथक, लव जिहाद या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राजकीय, सामाजिक आंदोलनातील, कोरोना काळातील, गणपती व दहीहंडी उत्सव काळातील खटले मागे घेण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबाबतचे खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती देऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

            राज्यामध्ये नवीन कारागृह निर्मिती करण्याबरोबरच कारागृह विभागात सुधारणा करण्यात येणार आहेत. सध्या 1 हजार 641 बंदींना जामीन मंजूर असून त्यांना कारागृहातून सोडण्याची योग्य ती कार्यवाही करावी. यासाठी शासनाने सर्व कायदेशीर सहकार्य करावे तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यासंदर्भात सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

            राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी फेक माथाडी चळवळ फोफावत आहे. यामुळे माथाडी चळवळ बदनाम होत आहे. या फेक माथाडी तथा वसूली सम्राटांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला त्यांनी यावेळी दिले.

            या बैठकीत महिला सुरक्षापोलीस स्टेशन बांधकामपोलिसांसाठी घरेपोलीस गृह कर्ज योजना, पोलिसांच्या आस्थापना विषयक बाबीपोलीसांसाठी अद्ययावत वाहने, राज्य राखीव पोलीस दल, डायल 112अम्बीस प्रणालीसिसिटीएन्स प्रणाली टप्पा 2तुरुंग सेवा यांसह विविध विषयांचा आढावा उपमुख्यमंत्री यांनी घेतला. यावेळी सर्व पोलीस घटकांनी समन्वयाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस भरतीला प्राधान्य

            राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021 अखेर रिक्त होणाऱ्या 10 हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या 10 हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच अन्य रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

            गृहविभागाचे सादरीकरण अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांनी केले. तर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी सादरीकरण केले.

००००


शारदीय नवरात्र आणि आयुर्वेद*_

 *नवरात्र नेहमीचंच ! पण दृष्टिकोन वेगळा !!*

_*शारदीय नवरात्र आणि आयुर्वेद*_


_अश्विन महिन्यात साजर्‍या होणार्‍या, "या" शारदीय नवरात्रात दुर्गेच्या ९ रुपांचं पूजन केलं जातं._

या नवदुर्गांचा एक श्लोक आहे - 


_*प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।*_

*तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।*

_*पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च ।*_

*सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।*

_*नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।*_

*उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।*


या ९ दुर्गा म्हणजेच दुर्गेची ९ रूपे !

ही रूपे ९ औषधी वनस्पतींमध्ये विराजमान झालेली आहेत. *ज्याप्रमाणे ९ देवी आहेत, त्याप्रमाणेच या ९ वनस्पतींना वैद्यकीय उपचार पद्धतींच्या नवदुर्गा म्हटलं जातं.* _९ दुर्गांची उपासना मनुष्याची आध्यात्मिक उन्नती करतात; तर या औषधी वनस्पतींच्या रूपातील नवदुर्गा मनुष्याच्या शरीराचं समस्त व्याधींपासून रक्षण करतात._


*"मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धती"त सर्वप्रथम नवदुर्गांच्या या ९ औषधी स्वरुपांना स्थान दिलं गेलं.* _ब्रह्मदेवांनी हे ज्ञान "दुर्गाकवच" रुपात मार्कंडेय ऋषींना दिलं._ *सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय असणाऱ्या या औषधी वनस्पती मनुष्याचं रक्षण करतात.* म्हणजेच _एक प्रकारे या वनस्पती मनुष्यासाठी ''कवच''च आहेत, त्यामुळे यांना "दुर्गाकवच" म्हटलं जातं._ 


या औषधी वनस्पतींमुळे मनुष्य निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो. मार्कंडेय पुराणानुसार, या ९ औषधी वनस्पती निरनिराळ्या रोगांना बरं करत; रक्त शुद्ध करत; रक्ताभिसरण नीट करत; मनुष्याला बरं करतात. त्यामुळे *मनुष्याने या वनस्पतींची आराधना करीत यांचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.*


_*आता आयुर्वेदातील "या" नवदुर्गांबद्दल -*_


१. पहिली, *शैलपुत्री म्हणजेच हरड किंवा हिरडा ही वनस्पती* - 

पहिली दुर्गा शैलपुत्री आणि आयुर्वेदात तिचं रूप *हरड* या वनस्पतीत आहे. हिलाच *हिमावती* असंही म्हणतात. आयुर्वेदात हिचं स्थान महत्त्वाचं आहे, आणि ही वनस्पती ७ प्रकारची आहे. *हरीतिका किंवा हरी* ही भय किंवा भीती घालवते, *पथया* ही शरीराला हितकारक आहे, *कायस्थ* ही शरीराला सुदृढ करते, *अमृता* ही अमृतासमान म्हटलेली आहे, *हेमावती* ही हिमालयावर असणारी, *चेतकी* ही चित्त प्रसन्न करणारी, *श्रेयसी* यश देणारी, *शिवा* ही कल्याणकारक आहे. 

आता यातून शैलपुत्रीची आराधना कशी होईल, तर _*हिरडा ही वनस्पती औषध म्हणून उपयोगात आणून तुम्ही या दुर्गेची उपासना करू शकता.*_


२. दुसरी *ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी* - 

_ही वनस्पती आयुर्मान वाढवते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ही रक्तदोषांना संपवते आणि स्वर मधुर करते. म्हणूनच *ब्राह्मीला सरस्वतीही* म्हटलं जातं._ ही मन आणि मेंदूला मजबूत करण्याचं काम करते. जठर आणि लघवी संबंधित व्याधींना शरीरातून बाहेर टाकते. 


३. तिसरी *चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर किंवा चमसूर* - 

ही वनस्पती कोथिंबिरीसारखी असते. हिच्या पानांची भाजी करतात, जी खूप पौष्टिक असते. *ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला _चर्महंती_ असंही म्हणतात.* _शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरं करणारी अशी ही चंद्रिका वनस्पती आहे._


४. चौथी *कुष्मांडा म्हणजेच कोहळा* - 

कोहळ्यापासूनच पेठा ही मिठाई केली जाते. _*कोहळा शरीरातील बळ वाढवतो. वीर्य वाढवतो. रक्ताचे विकार बरे करतो. पोट साफ ठेवतो.*_ जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे, त्यांच्यासाठी कोहळा हा अमृतासमान आहे. कोहळा हा *शरीरातील दोषांना दूर करत हृदयरोग बरा करतो. पित्ताचा त्रास याने बरा होतो.*


५. पांचवी *स्कंदमाता म्हणजेच अळशी किंवा जवस* - 

वात, पित्त, कफ अशा व्याधींचा नाश अळशी करते. 


६. सहावी *कात्यायनी म्हणजेच अंबाडी* - 

अंबा,अंबिका,अंबालिका,माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी अंबाडी ओळखली जाते. *पित्त,कफ तसेच गळ्याचे आजार यांना बरी करते.*


७. सातवी *काळरात्री म्हणजेच नागदवण* -

_ही वनस्पती सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करते. मन आणि मेंदूचे विकार बरे करते. विजयश्री मिळवून देते._ या वनस्पतीची लागवड घरी करावी. _ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत घराला सौख्य मिळवून देते._ *ही सर्व प्रकारच्या विषावरही जालिम उपाय आहे.*


८. आठवी *महागौरी म्हणजेच तुळस* - 

तुळस ही एक सर्वांच्या ओळखीची औषधी वनस्पती आहे. ही प्रत्येक घरात लावली जाते. _तुळस सात प्रकारची असते - *पांढरी, काळी, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक, षटपत्र*._ _तुळशीचे हे सर्व प्रकार रक्त शुद्ध करतात. ही हृदय रोगावर हितकारक आहे._


९. नववी *सिद्धिदात्री म्हणजेच शतावरी* - 

हिला *नारायणी* असेही म्हणतात. _शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम अशी औषधी वनस्पती आहे. रक्तविकार तसेच वातपित्त शोधनाशक आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी वनस्पती आहे._ शतावरी वनस्पतीचे नियमानुसार सेवन केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात.


*या आहेत आयुर्वेदाच्या नवदुर्गा.* यांचं औषध म्हणून योग्य प्रमाणात सेवन केल्यास मनुष्य त्या आजारातून बरा होऊन: योग्य रक्ताभिसरण होत, संपूर्ण निरोगी होतो. _असं मार्कंडेय पुराण सांगतं._


_*या आयुर्वेदिक नवदुर्गांची आराधना म्हणजेच या वनस्पतींना औषध म्हणून स्विकारत त्यांचं सेवन करणे.*_


【अर्थातच, हे सगळं जाणकार तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करणे अपेक्षित आहे.】

काळभैरव नमः


 

नवरात्र माहिती पूजा, माहात्म्य

 *नवरात्र म्हणजे काय ? जरूर वाचा...*

मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत नवरात्री व्रता विषयी ! हि माहिती आज देत आहे कारण ज्यांना या व्रताची माहिती नसते त्यांच्या पर्यंत आजच्या दिवसात हि माहिती पोहचेल व भाग्यालीखीत परिवारातील प्रत्येकाला हे व्रत करता येईल म्हनुंच हा लेख आवडला तर आपल्या मित्रांना पण जरूर शेअर करा !


१} नवरात्र म्हणजे काय ? त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात ?

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्या होणार्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव

चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात

त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.

२} नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा ? त्यासाठी काय काय करावे ?

नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवितो अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा. आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ? ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत. आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत. शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे. कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर बारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकविण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत. नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र यामार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदैवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडीत झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही. पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे.

 ३} वेदिका म्हणजे काय ?

वेदिका म्हणजे शेत. शेतीतील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभर लांबरूंदीचा सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदिच्या पाण्यात रंगवून घ्यावे. यामध्ये सप्त धान्य येतात. ( तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग) पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यामः”"वेदिकायैनमः”  म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी. ” सप्तधान्येभ्योनमः” असे म्हणून त्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्ये पेरावीमः”" पर्जन्यायनमः” म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरूण देवतेची स्थापना करावी. काही जण वरूण ( कलश ) मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावर काहीजण नारळ ठेवतात. तर काही जण ताम्हण ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दिपाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. त्यासाठी जडधातूची समई किंवा नंदादीप वापरावा.

भोदीप देवी रुपस्त्वं कर्मसाक्ष ह्यविघ्नकृत |

यावन्नवरात्रसामप्ति: स्थात्तावत्वं सुस्थिरोभव ||

अशी प्रार्थना करून दीप लावावा. यासाठी दोन समयांची योजना करावी. त्यामुळे एखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू रहाते. विड्याच्या पानावर कुंकूवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडावे व उपचार करावेत. सकाळ संध्यकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत. ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशिर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते. ललिता सहस्त्रनाम : हे वेदातील सत्याला उजागर करते. ह्या परादेवतेचे सगुण वर्णन करते आणि पुजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते. ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्व भक्तांच्या इच्छा पुरविल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ॐकाराचा उच्चार करावा. स्त्रीयांनी ॐकाराचा उच्चार न करता पठण करावे.

४} नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?

उपवास ह्याचा अर्थः ‘ उप ‘ म्हणजे जवळ, ‘ वास ‘ म्हणजे रहाणे. भगवंताच्या जवळ रहाणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्त्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे. नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्याव्यक्तीकडे येतात, तिने ते उपवास करावेत म्हणजेच त्या कुटूंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहीजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध रहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण रहावी हा उद्देश आहे. ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून, खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते. शरीर लवकर थकते. पोटात गेल्याबरोबर निद्रा येते. मग उपवास, आराधना होत नाही. म्हणून हलके, भाजके अन्न, दुध व फलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत जांभया, आळस येत राहतो. बर्याच

बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात. पण तांबूल रजोगुणी आहे. सत्त्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये. शरद ऋतुत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते. निसर्गात अनेक जिव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात. असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्त्विक आहाराचे सेवन रोगांचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते. ‘ जीवेत शरदः शतम | ‘ म्हणजे आपण शंभर शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली असते.

५} व्रताचे नियम काय आहेत ?

जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केशकर्तन करू नये. गादीवर झोपू नये. दुसर्याच्या घरी अंथरूणावर झोपू नये अथवा बसूही नये. पायात चप्पल घालू नये.

पण आजकाल हे शक्य होत नाही. मनशांत ठेवावे. परान्न घेवू नये. उगाच चिडचिड करू नये. व्रत करतानाच ते समजावून घेवून करावे. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे. स्वत:ला काय झेपणार आहे हे पहावे म्हणजे थोडक्यात स्वतःच्य शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडतेय असे आहे तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे, त्याला सतत

प्रार्थना करावी, ‘ हे देवा, हे माझ्याकडून करवून घे ‘ व्रताचा अर्थ समजावून घेवून व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही. ” हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे. ” अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच होते. नवरात्रात जर सूतक आले किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसर्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौच

आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नेवेद्य दुसर्याकडून दाखवून घेवून त्याचे लगेचच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नेवेद्य दाखवु नये. कुमारीपूजा : नवरात्रात कुमारीपूजा हा महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज एक प्रमाणे नऊ दिवस कुमारीकांची पूजा असते. न जमल्यास एक दिवस तरी कुमारीका पूजन करावे. दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीला ‘ कुमारीका ‘ म्हणतात. दहावर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरूवात करतो, म्हणून दहाव्या वर्षानंतर कुमारीका नाही. दोन वर्षाची ‘ कुमारी ‘, तीन वर्षाची ‘ त्रिमूर्ती ‘, चार वर्षाची ‘ कल्याणी ‘, पाच वर्षाची ‘ रोहिणी ‘, सहा वर्षांची ‘ कालिका ‘, सात वर्षांची ‘ चंडिका ‘, आठ वर्षांची ‘ शांभवी ‘, नऊ वर्षांची ‘ दुर्गा ‘, व दहा वर्षांची ‘ सुभद्रा ‘ अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेवून तिला आवाहन करावे व तिची पूजा करावी.

६} दुर्गा-सप्तशती :

दुर्गासप्तशती मध्ये अनेक स्तुतीपर श्लोक आहेत की, ज्याद्वारे भगवतीला आठविले जाते. विश्वाचे कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यात आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रज्ञाजागृत होते. सौंदर्य-लहरी : हे शक्तीस्वरूप ज्ञानावर रचलेले आहे. सौंदर्य-लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत. भक्तीयुक्त अंतःकरणाने लोक ते म्हणू शकतात.

देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणे हा अतिशय आनंददायक अवर्णनीय अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत, किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हणले पाहिजेत. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात, देवालयात पहाटे असे श्लोक म्हणले जायचे. तसेच दुपारी आणि संध्याकाळी ही म्हणले जात.

नवरात्रात दररोज विशिष्ठ संख्येने सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकाने स्वतः किंवा उपाध्यायांकडून करवून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केली आहे. ‘ हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस

की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहिसे

होते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दान

देतेस, तू दारिद्र्य आणि दु:ख दूर करतेस ‘

इत्यादी स्तुतीपर प्रार्थना आहे.

 हे पाठ कुळाचे कल्याणच करतात.


७} मालाबंधन म्हणजे काय?


नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुसर्या व तिसर्या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीन दिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुले ह्यांची माळ करावी. दीपप्रज्वलन : म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे. यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही. दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा, तिची प्रार्थना करावी, क्षमा याचना करावी.

८} फुलोरा म्हणजे काय ? 

नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात. हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का? ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेने अर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.

९} होम

नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे, दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीच आपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”, तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी” ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोप आहे. इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.


१० } देवीच्या-सेवा कोणत्या?

श्रीसुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत. आणि खालील सेवा कराव्यात !

अ} कुंकूमार्चन सेवा

देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे, त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्य देते. कुंकूमार्चन श्रीयंत्रावर करतात.

ब} तांबूल प्रदान सेवा

देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, खीर, पुरी, तळलेले पदार्थ तिला प्रिय आहेत. नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मुळ शक्ती एकत्र येवून, ही आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माण झाली. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी दौहित्री पाडवा असतो. त्या दिवशी मातामह श्राद्ध असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत

( आईचे वडील ) आणि आजोबांना जावून एक वर्ष झाले असेल अशा तीन वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास ( आईच्या मृत वडीलांस ) आजोबास तर्पण करता येते.

व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून ब्राह्मण भोजन करवून श्राद्ध विधीही करता येतो. मात्र वडील गेल्यावर दौहित्र करता येत नाही. नवरात्रात एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यास पुढिल वर्षी नवरात्र करायचे नाही असा चुकीचा समज आहे. प्रथम वर्षाची निषिद्धे जरूर पाळावीत. उत्सव महोत्सवपूर्वक साजते करण्याऍवजी धार्मिक

विधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे हा चितपावन कोकणस्थ लोकांचा विधी असतो. हा कुळधर्मापैकी एक विधी आहे. त्यावेळीही शक्ती देवतेला आवाहन करून अग्नी प्रज्वलित होतोच. ती देवता तेथे उपस्थित असते. नवमीला शस्त्रपूजन असते. याचे ऍतिहासिक महत्त्व आहे. विजया दशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो. यावेळी देवीस पंचामृत महाभिषेक करावा.

क} सरस्वती-पूजन सेवा

सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या देवतांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे. शारदा किंवा सरस्वती या देवात ‘ रिध्दी सिद्धी ‘ म्हणून मानलेल्या आहेत. गणपती त्यांच्याकडून कार्य करवून घेतो. षष्ठी सप्तमिला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो. ती हंसारूढ असल्याने ‘ हंसासारखी सर्वत्र विहार करते पण हंसाला नीरक्षीर विवेक असल्याने ती त्याचा वाहन म्हणून स्विकार करते. नवनव्या प्रांतात जावून नविन नविन प्रज्ञा ती आत्मसात करते.

ड} महालक्ष्मी-पूजन :

अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. ते परमेश्वराचेच रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थ एका व्यक्तीकडे लक्ष्य देणारी म्हणजे तीचे भगवंताकडे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीचा वास आहे. त्याठिकाणी कुंकूमार्चन करून श्रीसुक्ताची आवर्तने करतात. जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऍश्वर्य व ज्ञान या स्वरूपात सौभाग्य प्रदान करते. दुर्गा-महाकाली : हे शक्तीचे रूप आहे. तिचे रूप अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठीच हे उग्र रूप तिने धारण केलय. आठ हात, गळ्यात रुद्र माळा, तोडलेल्या हातांचा मेखला असे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की, कोणत्याही दिशेने संकटे आली तरी ती थोपवू शकते.

जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूप दाखवितात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात. तिच्या पूजा स्थानावर जावून तिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती देते.

११} उत्थापन :

आपआपल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात. या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. म्हणजे महिशासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो. गोडधोड करतो. एकमेकांच्या घरी जावून अभिष्टचिंतन करतो.

सोनेप्रदान :

पराक्रम करायला गेलेल्या देवींचे भक्तगण या दिवशी विजय मिळवून येतात पण अशी गोष्ट सांगतात, विद्यारण्य स्वामिंनी गायत्री देवीची उपासना केली ती बारा वर्षांच्या नंतर त्यांना दसर्याच्या दिवशी प्रसन्न झाली. तिने सोन्या मोत्याचा वर्षाव केला त्यामध्ये आपट्याची पाने होती. हल्लीच्या कालामानानुसार सुवर्णदान देणे शक्य नाही, पण आपट्याची पाने मात्र देतात. हे सुवर्ण, पराक्रम करून आणल्याने, लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते.

जप :

नवरात्रामध्ये ” जय जगदंब, श्री जगदंब ” असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी, ‘ हे देवी, तू बुद्धी रूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर. 卐

आपण जी व्रते आचरतो, ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आचरतो. त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. ही व्रते आचरल्यानंतर सर्व कर्मे श्रीकृष्णार्पण करावीत म्हणजे त्यातील दोषांचे परिमार्जन होते. यावेळेस भगवंत आपली परीक्षा पहात असतो. त्यामुळे व्रतारंभ करताना परमेश्वराची शरणागत भावनेने प्रार्थना करावी व शक्तीची प्रार्थना करावी. मन स्थिर ठेवून शांत रहावे. शेवटी अपराधांची क्षमा मागून व्रत सांगता करावी 



*श्री गोवर्धन जोशी गुरुजी*

Featured post

Lakshvedhi