Sunday, 25 September 2022

बदल गरजेचा आहे.

 🌀🌀🌀🌀💥🌀🏵🌀💥🌀🌀🌀🌀

               *🔸तृप्त पितर...!🔸*


*"हॅलो बाबा.. विकास बोलतोय.. आज रात्री ८ वाजता तुम्ही आणि आई तयार राहा.. आपण बाहेर जातोय आज जेवायला. मी ऑफिस मधून निघताना तुम्हाला कॉल करतो.. दोघेही तयार राहा.."-विकासने फोन ठेवला.*


*पण विकासाच्या बाबांच्या लक्षात येईना की, आज अचानक हा बाहेर जेवायला जायचा बेत विकासने काय म्हणून ठरवला असेल ? विकासचे आई बाबा दोघेही त्यांनी सांगितलेल्या वेळेला तयार होतेच. विकासने त्या दोघांनाही पिक-अप केलं, आणि एका आलिशान हॉटेल मध्ये घेऊन गेला.*


*"आई.. बाबा.. आज तुम्ही तुमच्या आवडीचं जे काही हवं ते मागवायचं.. आणि हो.. किमतीचा "कॉलम" अजिबात बघायचा नाही.. एवढे वर्ष खूप मन मारलंत.. आज मात्र तसं अजिबात चालणार नाही.. बिन्धास तुम्हाला जे हवं ते मागवा... आई तू पण ग.." विकास बोलत होता..*


*"अरे पण काय झालंय काय अचानक... काय प्रमोशन वगैरे झालंय का ? आज राजा एवढा उदार का बरं झालाय ?" - विकासाच्या आईला देखील कळेना आज नक्की काय झालंय काय.*


*"ते नंतर सांगतो.. घरी गेल्यावर.. आता फक्त जेवण.. तुमच्या आवडीचं .. नंतर बाबाना आवडतं ते खास कोकोनट आईस्क्रीम.." विकास भलताच खुशीत होता हे उघड होतं.. जेवणं झाली... आईस्क्रीम झालं.. मंडळी घरी आली.. हात पाय तोंड धुवून तिघेही एकत्र बसले.. विकास आता त्याच्या खुशीत असण्याचं नेमकं कारण सांगणार होता.*


*"आई बाबा.. आता सांगतो की, मी तुम्हाला आज बाहेर का घेऊन गेलो ते.. त्याचं झालं असं की, मागच्या महिन्यात, ऐन गणपती यायच्या आधी, माझ्या एका मित्राचे वडील गेले.. हार्ट अटॅक ने.. हा माझा मित्र त्याच्या वडिलांशी तसं फार काही चांगले संबंध ठेवून नव्हता.. आता मला म्हणतो कसा.. की, 'वडील गेले.. आता पितृ पक्ष चालू झालाय.. वडिलांच्या नावचं 'पान' ठेवतो..'*


*तेव्हा माझ्या मनात आलं, वडील जिवंत असताना कधी हा माझा मित्र त्यांच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलला नाही.. त्यांना काय हवं नको कधी विचारलं नाही.. कधी प्रेमाने त्यांची चौकशी केली नाही.. आज बाप मेल्यावर त्यांच्या नावाने हा पान वाढायचा फार्स कशासाठी मग ?* 


*त्यांच्या नावाने आता देवळं-मंदिरांमध्ये देणग्या देत फिरतोय.. तुम्हाला माहित आहे की, मला ह्या असल्या कुठल्याही गोष्टी कधीच पटल्या नाहीत.. कावळ्याने चोच लावल्यावर आत्मा तृप्त झाला म्हणे.. आपल्या पोराने आपल्याशी चार प्रेमाचे शब्द बोलावेत ह्यासाठी जो बाप आसुसत होता.. तो आता कावळ्याच्या एका चोच लावल्याने तृप्त कसा काय होणारे ?*


*आज मला हे जाणवलं की, घरात आई-वडील दोघेही ठणठणीत असणं हीच मुळात किती आनंदाची गोष्ट आहे.. आई.. बाबा.. तुम्ही जोपर्यंत आहात माझ्या आयुष्यात तो पर्यंत सगळी मजा आहे हो.. तुमच्या पश्चात मी कावळ्याला पान वाढणं वगैरे हे असले काहीही प्रकार करणार नाहीये.. पण आज तुम्ही दोघेही ठणठणीत आहात.. तुम्हाला खाण्या-पिण्याचं कसलंही बंधन सुदैवाने नाहीये.. म्हणून आज तुम्हाला मी जेवायला घेऊन गेलो.. आई-वडील दोघेही त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवतात हाच माझ्यासाठी "पितृपक्ष" आहे..."*


*विकास बोलायचा थांबला.. तो कमालीचा गहिवरला होता.. अर्थात विकासाचे आई-बाबांना सुद्धा कमालीचं भरून आलं होतं..*


*विकासने आई-बाबांना घट्ट मिठी मारली... आपला मुलगा आता खऱ्या अर्थाने मोठा झाला, ह्याचा आनंद आई-बाबांसाठी काही वेगळाच असतो नाही ? विकासाचे सगळे पितर मात्र, आज खऱ्या अर्थाने तृप्त झाले होते.*

🌀🌀🌀🌀💥🌀🏵🌀💥🌀🌀🌀🌀

Happy daughters day

 





Jai हनुमान


 

पूर्वजा करिता शुभेच्या


 

माथाडी भूषण पुरस्कार

 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील;

स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणेदि. 25 : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचात्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडीट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कारमाथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकामगार मंत्री सुरेश खाडेआमदार प्रवीण दरेकरआमदार निरंजन डावखरेआमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार गणेश नाईकआमदार मंदा म्हात्रेआमदार महेश शिंदेमाजी आमदार नरेंद्र पाटीलमाजी खासदार संजीव नाईकमाजी आमदार संदीप नाईकमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आदी उपस्थित होते.

             कष्टकरीमेहनती माथाडी बांधवाचे नेते म्हणजे आपले स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करतोअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  अण्णासाहेब पाटील यांचे सामाजिकराजकीय व कामगार क्षेत्रातील योगदान मोलाचे आणि आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. स्व. अण्णासाहेब यांनी मराठा समाजातील तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरदृष्टीने अनेक योजनाप्रकल्पांची मांडणी केली.

            माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करु. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे.
स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे. महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल
असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया आणि 75 हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

            नवी मुंबईतील माथाडी तसेच भूमीपुत्रांना न्याय देण्यात येईल, नवी मुंबईतील प्रकल्पांना चालना देण्यात येईल तसेच राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनही आपल्यामागे खंबीरपणे उभे आहेअसेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमागील 2014 ते 2016 च्या काळात माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. अनेक प्रश्न सोडविले. या काळात स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात 50 हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली.

माथाडी कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविणे कठीण होते. पण जास्तीचा एफएसआय देऊन तो प्रश्न मार्गी लावला. यापुढील काळातही यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न निश्चितपणे सोडविल्याशिवाय राहणार नाही.  नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविणार आहे. माथाडी कामगारांच्या चळवळीमागे आपण भक्कमपणे उभे आहोत. माथाडी कामगार संघटनांमध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

            हे सरकार सर्वसामान्यांचे निर्णय घेणारे सरकार आहे. मुख्यमंत्री महोदय हे काल नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी दोन तास पायी चालत होते. हे जनतेच्या मनात कोरले जातेअसेही श्री. फडणवीस म्हणाले.

            कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले कीकोरोना काळात माथाडी कामगारांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेऊ. माथाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

            माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये माथाडी कामगारांच्या समस्या मांडल्या. माथाडी कामगारांना वडाळा ट्रक टर्मिनल येथील घरांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच नाशिक येथील लेव्हीचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

            प्रारंभी मान्यवरांनी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माथाडी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

00000

 


पंडित दीनदयाळ उपाध्याय

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

        मुंबईदि. 25:- 'अंत्योदयसंकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी 'अंत्योदयदिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

            नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 'पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करूयाहेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन ', असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

00000


विचार

 *कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसारुन द्यायचं...! बंधने नात्यांची नसतात, संवेदनांची असतात...! सुख म्हणजे तेच असतं...!!!*

 *तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून*

*भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही*

*तसेचं आयुष्याचे आहे सुखदुःखाचे चटके* 

*जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत*

*आयुष्य खुलत नाही..!*

 ________❤️_______

        

Featured post

Lakshvedhi