Saturday, 24 September 2022

मराठी भाषेचे सौंदर्य पहा

 मराठी भाषेचे सौंदर्य पहा


इलेक्ट्रिकच्या  दुकानवाल्याने 

फलकावर लिहिलं होतं..

"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣


इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं 

वाचून माझं मन भरून आलं ..

"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..😀


चहाच्या टपरीवर असाच फलक होता..

"मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो.."🤣


एका उपाहारगृहाच्या  फलकावर 

वेगळाच मजकूर होता  ..

"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या.." 🤪


पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..

"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं" ..🤣


फळं विकणाऱ्या माणसाने 

तर कमालच केली. ..

"तुम्ही फक्त पैसे देण्याचे कर्म करा, फळं आम्ही देऊ ".. 🤣


घड्याळाच्या दुकानदाराने अजब 

मजकूर लिहिला होता  ..

"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."🤣


ज्योतिषाने फलक लावला होता 

आणि त्यावर लिहिलं होतं.....😅

"या आणि फक्त १००

 रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."🤣


*आणी आमच्या ग्रुपवर लिहीले होते* 🖋️🖋️🖋️🖋️


*इथे दररोज येऊन तर बघा*

*सर्व अडचणी विसरून जाल*


😃🌹☕

हा रुसवा सोड, ना अबोला,पित्याची साद


 

सवेरा









 

जय हनुमान

 *|| जय श्रीराम ||*

*श्री हनुमान चालीसा महात्म्य*

===========================


श्री हनुमान चालीसा रोज भक्तीभावाने पठण केल्यास,

*मनुष्य कोणत्याही प्रकारचे संकट, आजार, कर्ज, कौटुंबिक कलह, तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या यांतून खात्रीशीरपणे मुक्त होतो..*

*आणि त्याला व परिवाराला उत्तम आरोग्य, कौटुंबिक सौख्य, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, किर्ती, आनंद, समाधान इत्यादी गोष्टी अगदी सहजपणे प्राप्त होतात व तो दिर्घायुषी होतो..*

*आणि त्याची उत्तमातल्या उत्तम भौतिक प्रगतीसोबतच, अनंत अशी आध्यात्मिक प्रगती होते...*



*॥ श्री हनुमान चालीसा ॥*


*॥ दोहा॥*

श्रीगुरु चरन सरोज रज

निज मनु मुकुरु सुधारि ।

बरनउँ रघुबर बिमल जसु

जो दायकु फल चारि ॥


बुद्धिहीन तनु जानिके

सुमिरौं पवन-कुमार ।

बल बुधि बिद्या देहु मोहिं

हरहु कलेस बिकार ॥


*॥ चौपाई ॥*

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१


राम दूत अतुलित बल धामा ।

अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥२


महाबीर बिक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥३


कंचन बरन बिराज सुबेसा ।

कानन कुण्डल कुँचित केसा ॥४


हाथ बज्र अरु ध्वजा बिराजै ।

काँधे मूँज जनेउ साजै ॥५


शंकर सुवन केसरी नंदन ।

तेज प्रताप महा जगवंदन ॥६


बिद्यावान गुनी अति चातुर ।

राम काज करिबे को आतुर ॥७


प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।

राम लखन सीता मन बसिया ॥८


सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।

बिकट रूप धरि लंक जरावा ॥९


भीम रूप धरि असुर सँहारे ।

रामचन्द्र के काज सँवारे ॥१०


लाय सजीवन लखन जियाए ।

श्री रघुबीर हरषि उर लाये ॥११


रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२


सहस बदन तुम्हरो जस गावैं ।

अस कहि श्रीपति कण्ठ लगावैं ॥१३


सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।

नारद सारद सहित अहीसा ॥१४


जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।

कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५


तुम उपकार सुग्रीवहिं कीह्ना ।

राम मिलाय राज पद दीह्ना ॥१६


तुम्हरो मंत्र बिभीषण माना ।

लंकेश्वर भए सब जग जाना ॥१७


जुग सहस्त्र जोजन पर भानु ।

लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८


प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।

जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९


दुर्गम काज जगत के जेते ।

सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०


राम दुआरे तुम रखवारे ।

होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१


सब सुख लहै तुम्हारी सरना ।

तुम रक्षक काहू को डरना ॥२२


आपन तेज सम्हारो आपै ।

तीनों लोक हाँक तै काँपै ॥२३


भूत पिशाच निकट नहिं आवै ।

महावीर जब नाम सुनावै ॥२४


नासै रोग हरै सब पीरा ।

जपत निरंतर हनुमत बीरा ॥२५


संकट तै हनुमान छुडावै ।

मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६


सब पर राम तपस्वी राजा ।

तिनके काज सकल तुम साजा ॥२७


और मनोरथ जो कोई लावै ।

सोई अमित जीवन फल पावै ॥२८


चारों जुग परताप तुम्हारा ।

है परसिद्ध जगत उजियारा ॥२९


साधु सन्त के तुम रखवारे ।

असुर निकंदन राम दुलारे ॥३०


अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।

अस बर दीन जानकी माता ॥३१


राम रसायन तुम्हरे पासा ।

सदा रहो रघुपति के दासा ॥३२


तुम्हरे भजन राम को पावै ।

जनम जनम के दुख बिसरावै ॥३३


अंतकाल रघुवरपुर जाई ।

जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४


और देवता चित्त ना धरई ।

हनुमत सेइ सर्ब सुख करई ॥३५


संकट कटै मिटै सब पीरा ।

जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥३६


जै जै जै हनुमान गोसाईं ।

कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७


जो सत बार पाठ कर कोई ।

छूटहि बंदि महा सुख होई ॥३८


जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।

होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९


तुलसीदास सदा हरि चेरा ।

कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०


*॥ दोहा ॥*

पवन तनय संकट हरन,

मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित,

हृदय बसहु सुर भूप ॥


*|| जय बजरंग बली | जय हनुमान ||*

*|| श्रीराम जयराम जय जय राम ||*


धन्य धन्य हो

 पुणे जिल्ह्यातील वाबळे वाडी येथील ही जिल्हा परिषद शाळा....

श्री. दत्तात्रय वारे सर आहेत मुख्याध्यापक...

झेड पी शाळा...

आणि इतकी आधुनिक..?

बँक ऑफ न्यूयॉर्क ने येथे अर्थसहाय्य केलेय..

एक द्रष्टा शिक्षक व गावकरी यांनी  ठरवले तर काय करू शकतात , ते घरातील सर्वांनी  सदर व्हिडिओ आवर्जून  प्रत्यक्ष बघा.👌🏼🙏🏼


Friday, 23 September 2022

आष्टी अहमदनगर रेल्वे मार्ग

 नवीन आष्टी - अहमदनगर रेल्वे मार्ग

दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

• नवीन मार्गाचे उद्घाटन, डेमू सेवेचा प्रारंभ

• बीडवासियांच्या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा पूर्ण.

            बीड, दि. 23 (जि. मा. का.) : नवीन आष्टी - अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर शासन भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


            अहमदनगर – बीड - परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी - अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते.


            प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, सुरेश धस, आष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


            दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहे, याचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज गोपीनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड- नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर - बीड - परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, हा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाही, तर माणसे, नातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.


            राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


            दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत असल्याचा आपणास आनंद असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी - अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उदघाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.


            आपण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा दर तीन महिन्याला आढावा घेत होतो. यासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र व राज्य शासनाने दिला. राज्याचा भागीदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनाने घेतला, असे स्पष्ट करुन श्री. फडणवीस म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कृष्णा - मराठवाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देऊन भरीव निधी दिला जाईल. शिवाय मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी समुद्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


            अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती सर्वांच्या साक्षीने आज होत असल्याचे सांगून रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, मराठवाड्यातील बीडव्यतिरिक्त अन्य जिल्हे रेल्वेने जोडले गेले होते. पहिल्या टप्प्यातील रेल्वेने आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासह सर्वांच्या मनातील स्वप्नपूर्तीची सुरुवात होत आहे. या मुख्य प्रकल्पासाठी 96 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. बीडपर्यंतचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


            अहमदनगर - परळी रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी देण्यात आली असून, 2014 पासून रेल्वे कामांना गती मिळाली आहे. 400 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून त्यापैकी 120 गाड्या लातूरच्या कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.


            बीड आणि अहमदनगर जिल्हा रेल्वेने जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त करून मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, सहकारी कारखानदारी सुरू ठेवण्यात बीड जिल्ह्याचे योगदान आहे. या रेल्वेमुळे बीड हा राज्यातील एक अग्रगण्य जिल्हा होईल. या रेल्वेला परळीपर्यंत नेण्याची जबाबदारी रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे यांची असल्याची अपेक्षा आहे. रेल्वेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल तसेच पुरेसा निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांचे आभार मानले.


            खा. प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोगतात बीडवासियांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


            उपस्थित मान्यवरांनी यावेळी रेल्वे संघर्ष समितीतील लढा दिलेल्यांचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करुन रेल्वे स्थानकाची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते न्यू आष्टी अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रेल्वे मार्गाची माहिती देणारी लघुफित यावेळी दाखवण्यात आली.


            माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार भीमराव धोंडे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी प्रास्ताविक तर आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.


नवीन आष्टी - अहमदनगर नवीन मार्गाविषयी...


 • 66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन हा अहमदनगर – बीड - परळी वैजनाथ या 261 कि.मी. नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समसमान म्हणजे प्रत्येकी 50 टक्के खर्चाचा वाटा आहे.


 • डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी - अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना सुलभ ठरेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक - आर्थिक विकासाला चालना मिळेल.


 • डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता आठवड्यात दररोज धावणार आहे.


 • कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.


00000



ज्येष्ठ नागरिक

 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करा

- सचिव सुमंत भांगे.

            मुंबई, दि.23 : ज्येष्ठ नागरिक दिन राज्यात 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त क्षेत्रीय अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने तालुका व जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन समन्वयाने आणि काटेकोरपणे करावे, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले.

      ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत सचिव सुमंत भांगे बोलत होते. या बैठकीला समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जनसेवा फाऊंडेशन पुणेचे डॉ.विनोद शहा, हेल्पेज इंडिया मुंबईचे प्रकाश बोरगांवकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अण्णासाहेब टेकाळे, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सलमा खान यावेळी उपस्थित होते.

      सचिव श्री.भांगे म्हणाले, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांची जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सहायक आयुक्तांनी कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करावी. लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच शालेय विद्यालयांमध्ये देखील या कार्यक्रमांची माहिती व्हावी यासाठी सर्वांना सोबत घेवून कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा. शाळा महाविद्यालयांना कार्यक्रमात सहभागी करून शालेय स्तरावरही याबाबतीत जनजागृती करा, अशा सूचना श्री.भांगे यांनी केल्या.

            यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच समाज कल्याण विभागाकडून आयोजित असणाऱ्या कार्यक्रमांनाही ज्येष्ठ नागरिक संघटना सर्वतोपरी मदत करतील अशी ग्वाही यावेळी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांनी दिली.

००००



Featured post

Lakshvedhi