Monday, 19 September 2022

सिंचन प्रकल्प

 रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 19 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीअशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे आता केंद्र सहाय्यीत सिंचन योजनांसह राज्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे.

            सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा महामंडळांकडून कृती आरखडा मागवावा. ज्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अशा प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरु करावी. रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देतांना प्रादेशिक समतोल राखला जाईलयाची काळजी घ्यावी. या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अधिवेशनात या सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. पुढील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना श्री.फडणवीस यांनी दिल्या.

            प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत कामांचा आढावा घेतांना या योजनेतील कामे प्रलंबित राहिल्याबद्दल माहिती जाणून घेतली. बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना पूर्ण केल्यास प्रादेशिक समतोल राखला जावू शकतो. प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया महत्वाची आहे. भूसंपादनासाठी खासगी स्त्रोतांचा उपयोग करण्याचा देखील पर्याय वापरावा. तसेच भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीची वेगळी मागणी करावी. त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात येईल. दोन्ही योजनेतील प्रकल्पांसाठी लवकरात लवकर भूसंपादन होईल, असे नियोजन करावे. भूसंपादनानंतर प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे होईल याकडेही लक्ष देण्याच्या सूचना श्री.फडणवीस यांनी दिल्या.

सिंचन प्रकल्पांसाठी मिनी वॅार रूम

            जलसंपदा विभागाच्या राज्यातील सर्व कामांना गती देण्यासाठी मिनी वॅार रूम सुरू करा. या वॅार रूमच्या माध्यमातून विविध विभागांचा समन्वय राखून सिंचन योजनेतील प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या कामांना गती द्यावी. या कामासाठी कालबद्ध कार्यक्रम आणि जबाबदारी निश्चित करा. सर्व पाटबंधारे विकास महामंडळांची एकत्रित बैठक घेवून रखडलेल्या प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत कार्यक्रम/दिनदर्शिका तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

पाणीपट्टी मोजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

            सिंचन प्रकल्पांतर्गत पाणीपट्टी वसुलीतून राज्याला मोठा महसूल प्राप्त होतो. अनेक ठिकाणी ज्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतोत्याप्रमाणात पाणीपट्टी प्राप्त होते. पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी  अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अचूक आकडेवारी समोर येईल यातून शासनाला पाणीपट्टीमुळे मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल. जलसंपदा विभागाच्या कामांशी सुसंगत असलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी परिषद आयोजित करु. जगभरातील तज्ज्ञांना निमंत्रित करण्याच्या सूचना श्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

            जलविद्युत प्रकल्पांबाबत श्री.फडणवीस म्हणालेसौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली.  कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील उपसा सिंचन योजनांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय मागील काळात घेण्यात आला होता. अशा पथदर्शी प्रकल्पांना चालना देण्याची गरज असून पहिल्या टप्प्यात ज्या उपसा सिंचन योजनांच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. अशा योजनांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या सूचना देखील श्री. फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या.

            या बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीसचिव विलास राजपूतसचिव राजन शहाउपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी श्री.राजपूत यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाची माहिती दिली.


 देण्याची गरज असून पहिल्या टप्प्यात ज्या उपसा सिंचन योजनांच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. अशा योजनांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या सूचना देखील श्री. फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या.

            या बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीसचिव विलास राजपूतसचिव राजन शहाउपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी श्री.राजपूत यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाची माहिती दिली.

०००००



हस्तकला मार्गदर्शन

 हस्तकला कौशल्य विकासासाठी राज्यातील महिलांना 



मिळणार रुमा देवी यांचे मार्गदर्शन

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            मुंबईदि. 19 : पारंपरिक हस्तकलावस्त्रोद्योगहातमागपारंपरिक कलाकुसरी आदींच्या माध्यमातून जवळपास ३० हजार महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रुमा देवी यांनी आज राज्याचे कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. श्रीमती रुमा देवी यांचे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात फार मोठे योगदान असून त्यांच्या अनुभवाचा राज्यात उपयोग करून घेतला जाईल. महिला बचतगटांचे सक्षमीकरणत्यांचा कौशल्य विकास यासाठी श्रीमती रुमा देवी यांच्यामार्फत विविध प्रशिक्षणे घेण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले जाईलअसे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

            श्रीमती रुमा देवी या बारमेर जिल्ह्यातील (राजस्थान) आहेत. त्यांनी सुरुवातीला बचतगटांच्या माध्यमातून काही महिलांना सोबत घेऊन पारंपरिक हस्तकलापारंपरिक वस्त्रोद्योग यांचा व्यवसाय सुरू केला. पुढील काळात या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. श्रीमती रुमा देवी यांच्या चळवळीशी सुमारे 30 हजार महिला जोडल्या गेल्या आहेतज्यांना शाश्वत रोजगार प्राप्त झाला आहे.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीग्रामीणआदिवासी महिलांच्या विकासासाठी श्रीमती रूमा देवी यांनी केलेले कार्य अद्भुत असे आहे. या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्रातही उपयोग करून घेण्यात येईल. येथे विविध प्रकारची कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणे आयोजित करणेमहिलांना मार्गदर्शन करणे यासाठी रूमा देवी यांचे सहकार्य घेण्यात येईल. लवकरच विभागामार्फत या संदर्भात निर्णय घेऊअसे मंत्री. श्री. लोढा यांनी सांगितले.

व्यसन मुक्ति

 राज्यातील शाळा महाविद्यालयाबाहेरील ई- सिगारेट,दारू, व पानगुटख्या पासून तरुणाईला वाचवा-  राज्यभरातून सरकारला ईमेल 

भीम आर्मीचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन 
मुंबई-१९-(प्रतिनिधी )-मुंबईसह राज्यातील शाळा व महाविद्यालयातील कुमारवयीन व तरुण विद्यार्थी विविध व्यसनात गुरफटत चालले असून देशाचे भविष्य असलेल्या या तरुणाईला वाचविण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयानजीक असणारी दारूविक्रीची व   पानगुटख्याची दुकाने तावरीत हटवावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे या मागणीसाठी  भीम आर्मी , रुग्णसेवक संघटना , एक्वही एक पेन अभियान , दारूबंदीवर काम करणाऱ्या अस्तित्व हि महिलांची  संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यासह  विविध पक्षसंघटनांनी व शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्या पोलीस  महासंचालकांकडे इमेल पाठवून केली आहे . 
      सिगारेट ओढणे, पानगुटखे खाणे,दारू पिणे आरोग्यास हानिकारक  आहे. यामुळे तुम्हाला कर्करोग ,लिव्हर खराब होणे   व ईतर गंभीर आजार होतात. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर असलेली धोक्याची सूचना वाचूनही सिगारेट ओढणारे पानगुटखे खाणारे  व दारू पिणारे पितातच.  शासनाने सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रार्थनास्थळे ,शाळा व महाविद्यालयीन परीसरापासून जवळपास १०० मीटरवर धुम्रपान पानगुटखे व दारूवर  बंदी घातली आहे. काही ठिकाणी स्मोकींग झोनदेखील  निर्माण करण्यात आले आहे. दुर्दैवाने या सिगारेटची जागा आता" ई-सिगारेटने" घेतली. वेब सिगरेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परीसरात या वेबची लाट आली आहे. ७५० रुपया पासून ५ हजार रुपयापर्यंत किंमत असलेली ही वेब सिगारेट  तसेच पानगुटखे मुंबईसह राज्यातील बहुतेक  शाळा व महाविद्यालया जवळच्या पानटपरीवर किंवा विशिष्ट  ठिकाणी मिळतात.शिवाय  विद्यार्थ्यांच्या जिवितास अपायकारक असणा-या दारूची दुकाने परमिटरूम  देखील १०० मीटरच्या आता अस्तित्वात आहेत .या गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने तरूण विद्यार्थी याकडे आकृष्ट होऊन व्यसनांच्या  आहारी जात असल्याची खंत भीम आर्मीचे अशोक कांबळे , अस्तित्व संघटनेच्या प्रेमलाताई सोनोने , रुग्णसेवाक संघटनेचे भीमेश मुतुला एक वही एक पेन अभियानचे सुमित दाभाडे ,व पीपल्स रिपब्लिक पार्टीचे राजेश जाधव यांनी आपल्या  ई -मेलद्वारे व्यक्त केली आहे . भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी आपल्या शिष्टमंडळासह  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे 
  शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पोलीस तक्रारी होत नाहीत व यामागे रॅकेट असल्यामुळे भीतीपोटी  वाच्यताही केली जात नाही.अशी अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात. भारतीय कायद्याने अशा प्रकारच्या सिगारेट पानगुटखे  वापरण्यावर व विक्रीवर बंदी आहे मात्र  असे असले तरी या व्यवसायात गुंतलेले लोक आपले सावज शाळा, महाविद्यालयाबाहेर असलेल्या पानपट्टीची दुकाने, व खाऊगल्लीत हेरतात. दुर्दैवाने तरुण पिडी  या व्यसनात गुरफटत आहेत.आपल्या देशाचे भविष्य असलेली ही तरूण पिढी वाचवायची असेल तर शासकीय परीपत्रकानुसार   शाळा व महाविद्यालयीन परीसरात तसेच आसपासच्या परिसरात असलेले तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोल विक्रीची दुकाने पानपट्टीचे अड्डे तसेच पानमसाला गुटखे व ईसिगारेटचे रॅकेट उध्वस्त करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी करावी अशी मागणी मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्री व  पोलीस महासंचालक    यांच्याकडे करण्यात आली आहे 


नदी संवर्धन

 सांस्कृतिक विभाग नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार 

गांधी जयंती दिनी नदी महोत्सवाचा शुभारंभ.

            मुंबई, दि. १९ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून या अंतर्गत जनजागरण करण्यासाठी ‘नदी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ येत्या २ ऑक्टोबरपासून वर्धा येथे होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप वर्धा येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार पंकज भोयर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून याचवेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नदी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वर्धा मतदार संघाचे आमदार पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करताना जलबिरादरी संस्थेच्या विशेष नैपुण्याची मदत घेतली जाणार आहे. देश विदेशात जलतज्ज्ञ म्हणून परिचित असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांची मदत यासाठी घेतली जाणार असून शासनाचे जलसंपदा, जलसंधारण, वन इत्यादी विभाग यामध्ये जोडले जाणार आहेत. नदी संरक्षण आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग काम करणार असून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्रातील ७५ नद्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे नोडल अधिकारी संबंधित नदीच्या विकासासाठी, पुनरुज्जीवनासाठी काम करतील. नदी यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे आयुष्य चांगले कसे राहील, नदी ही अमृतवाहिनी कशी आहे, छोट्या नद्या पुनरुज्जीवित केल्या तर त्याचा कसा फायदा होईल यासर्वांची माहिती नदी यात्रेच्या दरम्यान देण्यात येईल.

            यावेळी राजेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात नदी महोत्सव आयोजित करणे, तसेच ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणे ही बाब अत्यंत आनंदाची आहे. राज्य शासनाच्या या मोहिमेत जलबिरादरीचा पूर्ण पाठिंबा असून आपल्या सर्वांसाठी नद्यांचे प्रदूषण थांबविणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे याला महत्व असणार आहे.

०००

स्वातंत्र्य अमृत महोत्सव

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीदिनी विविध उपक्रम

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सेवाग्राम येथून होणार ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 19 : जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच दिवशी 'हॅलो ऐवजी वंदे मातरम्' अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल; या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने वर्धा येथे आयोजित ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचा आढावा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सेवाग्राम, वर्धा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचा समारोप यावेळी होणार आहे .

            सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सेवाग्राम येथे आयोजित कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबतची बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस स्थानिक आमदार पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

            भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असून 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या महात्मा गांधी जयंतीला वर्धा सेवाग्राम येथून राज्य सरकारच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ !

            प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीनेच जनतेने यापुढे एकमेंकाशी संवाद साधताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. या अभियानाचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.



साखर निर्मिती

 साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसराराज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

            गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

            यंदाच्या हंगामासाठी उस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

            यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

            देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे.

            इथेनॉल निर्मितीत देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लीटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत (ओपन जनरल लायसन्स) गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

००००



 

Featured post

Lakshvedhi