Monday, 19 September 2022

लंपी रोग जनजागृती

 लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून  अफवा पसरवि-यावर कठोर कारवाई

-सचिंन्द्र प्रताप सिंह

मुंबईदि. १८ :    लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे.  लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

श्री.सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की,  लंपी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही.  या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) इ. चा वापर करून जनजागृती करावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांना दिल्या.

खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु.3 प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. सर्व खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविणेचे श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे. 

ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी

शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.  याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा  टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय  कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशाडासगोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी अशा सूचनाही यावेळी त्यांनी यावेळी दिल्या.


निती आयोग, राज्यस्तरीय संस्था

 मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची निती आयोगाच्या तज्ञ गटासमवेत बैठक  महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था

सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील;निती आयोगाने सहकार्य करावे

                                                 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि.१८: महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषीआरोग्यशिक्षण रोजगारपर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावेअसे आवाहन करतानाच देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा महत्वाचा वाटा असेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्या आयोगातील तज्ञांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या समवेतच्या तज्ञांनी महाराष्ट्रात विविध क्षेत्राच्या परिवर्तनासाठी आयोगामार्फत राज्याला कशाप्रकारे सहकार्य करण्यात येणार आहे याविषयी सादरीकरण केले.

राज्याचा विकास आणि सामान्यांच्या अपेक्षापूर्तीची सांगड घालावी

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेराज्यासाठी निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून राज्याचा सर्वागिण विकास आणि सामान्यांना शासनाकडून  असलेल्या अपेक्षांची पूर्ती यांची सांगड घालण्यात यावी. त्यासाठी निती आयोगाच्या अनुभवाचा फायदा राज्याला मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सेवायोजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि गतिमानपणे उपलब्ध व्हावा

            सामान्य नागरिकांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सेवायोजनांचा लाभ या अधिक पारदर्शक आणि गतिमानपणे उपलब्ध होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषीआरोग्यशिक्षणरोजगार निर्मितीपर्यावरणपायाभूत सुविधा आदी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यस्तरीय संस्थेस निती आयोगाकडून या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळावेअशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            कुशल मनुष्यबळपायाभूत सुविधांचे जाळे राज्यात आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अमंलबजावणीकरण्यावर आमचा भर असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी महाराष्ट्र मेहनत करण्यात कमी पडणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

        राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट २०२७ मध्ये गाठू शकतो

                                                उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणालेनिती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था राज्यात स्थापन करण्यासाठी वित्त विभागाने चांगली तयारी केली आहे. राज्याने २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहेमात्र आपण अधिक चांगले काम केलं तर २०२७ मध्येच हे उद्दिष्ट गाठू शकतोअसे त्यांनी सांगितले.

ॲसेट मॉनिटायजनेशन हा महत्वाचा मुद्दा निती आयोगाने मांडला असून त्या दृष्टीने राज्यात नव्याने साकारण्यात येत असलेला समृद्धी महामार्ग हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. ई मोबिलीटीच्या क्षेत्रात राज्याने पुढाकार घेतला असून पुढील तीन वर्षांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ब्लॉकचेनड्रोन यंत्रणेचा वापर महसुलकृषीआरोग्य विभागात वाढविणार

            ब्लॉकचेनड्रोन यंत्रणेचा वापर महसुलकृषीआरोग्य विभागात वाढविण्यावर भर असल्याचे सांगत राज्यातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषध पोहोचविण्याचा प्रयत्न राहीलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येणार असून पुढील सौरउर्जेच्या माध्यमातून तीन वर्षांत सुमारे चार हजार मेगा वॅट वीज कृषीपंपांना उपलब्ध करून देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी सादरीकण केले.

 

०००


दुर्गप्रेमी savardhan

 आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि.१८: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी  आंदोलन केले होते.

            मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या तरुणांशी संवाद साधून थेट आझाद मैदानात त्यांची भेट घेतली. त्यांचे निवेदन स्वीकारले. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईलअशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि राज्यभरातून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

 

००००

 

 

पला पळा लौकर


 

अग अवदसे


 

Sunday, 18 September 2022

शुभ रात्री


                लौकर झोपा, लौकर उठा,परत परत सांगू का,?

विश्र्वमैत्री दिवस

 राज्यपालमुख्यमंत्री यांच्या  उपस्थितीत विश्वमैत्री उत्सव व क्षमापना समारोह संपन्न .क्षमा करता व मागता अली पाहिजे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            मुंबई दि. 18: प्रभू श्रीराम क्षमा गुणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. जैन धर्मात क्षमा या गुणाला विशेष महत्व दिले आहे. मात्र क्षमा करण्यास त्याग व तपस्या हवी. गृहस्थाश्रमी लोकांनी अर्थार्जन करून समाजातील दीनदुःखी व उपक्षितांची मदत केली तरी देखील क्षमापर्व व विश्वमैत्री दिवस सफल होईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. 

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे बिर्ला मातोश्री सभागृह येथे आयोजित 'विश्वमैत्री दिवस व क्षमापनासमारोहात भाग घेतला तसेच श्री मुंबई जैन संघटनेच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित जैन तपस्वी रथयात्रा व धर्मसभा समारोहात जैन समाज बांधवांशी संवाद साधला.

            प्रभू श्रीराम हे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील होते. क्षमा हे वीराचे भूषण आहे. क्षमा करण्यासाठी मन मोठे लागतेअसे सांगून आपल्या देशातील संतांनी क्षमाशीलतेची परंपरा जिवंत ठेवली असे राज्यपालांनी सांगितले.

 

सृष्टीचे संवर्धन कसे करावे हे जैन समाजाकडून शिकण्यासारखे

                                                      - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

            जैन समाज उद्यमशील आहे. व्यापार उदीम करून नोकरी देणारा हा समाज आहे. मैत्री करताना प्रसंगी क्षमा मागण्याची जोड दिली तर समाजातील दंगे - धोपे संपतील हा विचार जैन समाज करतो. सृष्टीत प्रत्येक जीवाचे वेगळे महत्व आहेहे जैन समाजाने जाणले आहे. त्यामुळे सृष्टीचे संवर्धन कसे करावे हे जैन समाजाकडून शिकण्यासारखे आहेअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.    

            मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. व्यापार उदिमाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या दृष्टीने शासन व्यावसायिकांना पूर्ण सहयोग करेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या बैठकीच्या वेळी केंद्र शासन राज्याला विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आपल्याला दिलेतसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याच्या १२००० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते जैन समाज चातुर्मास पुस्तिका व शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विश्वमैत्री दिवस कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढाभारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश मेहताजैन आचार्य कीर्तीप्रभ सुरीश्वरजी महाराजसाध्वी सोमलता तसेच रमेश जैनबाबुलाल भन्साळीअतुल शहाराजपुरोहित व चारही जैन पंथांचे साधू - साध्वी उपस्थित होते. तर श्री मुंबई जैन संघटनेच्या रथयात्रा व धर्मसभा कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढाजैन संत गच्छाधिपतीनयपद्मसागर महाराज व इतर जैन तपस्वी उपस्थित होते. 

 

Featured post

Lakshvedhi