सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 17 September 2022
हैदराबाद मुक्ति संग्राम
हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!या माहितीपटाचे उद्या समाजमाध्यमांवरून थेट प्रसारण
मुंबई, दि. 16 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून 17 सप्टेंबरला सायं 5.00 वाजता होणार आहे.
या माहितीपटाचे थेट प्रसारण पुढील लिंकवरुन पाहता येणार आहे.
यू ट्यूब - https://www.youtube.com/
फेसबुक - https://www.facebook.com/
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सवी शुभारंभ उद्या, दि. 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे प्रसारण होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखन अजित दळवी, विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आणि निवेदन विनय आपटे यांचे आहे.
हा माहितीपट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एक वर्ष आणि एक महिना आणि 2 दिवसाने उशिराने मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाड्याच्या सहभागाची तेजस्वी कहाणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण दक्षिण भारतातल्या हैद्राबाद संस्थानातील काळरात्र संपली नव्हती. हैद्राबादचा तत्कालीन निजाम मीर उस्मान अली याने भारतात सामील न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या इराद्याने येथील जनतेवर अत्याचार आणि मुस्कटदाबीचे षडयंत्र आरंभले होते. निजामाच्या या जुलूमशाहीचे काटेरी तख्त उधळून लावण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची माहिती चित्ररुपाने देण्यात आली आहे.
०००००पाठीचा कणा
पाठीच्या कण्याच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीयवैद्यकीय तज्ज्ञांमध्ये अधिक सहकार्याची गरज.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
मुंबई, दि. 16 : जीवनशैलीतील बदलांमुळे पाठीच्या कण्यांचे विकार वाढत आहेत. मात्र त्यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात नित्यनूतन संशोधन होत आहॆ. भारत पसंतीचे वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर पाठीच्या कण्याच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये सहकार्य वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
पाठीच्या कण्याच्या तज्ज्ञांच्या 'न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन' या संस्थेच्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे (NSSA Spine 2022) उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.16) मुंबई येथे झाले, त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
उद्घाटन समारंभाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. रमणी, अध्यक्ष व्हर्नोन वेल्हो, आयोजक सचिव डॉ सुमित पवार, न्यूरो सर्जन डॉ प्रकाश मोढा आदी उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते लीलावती हॉस्पिटल येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन प्रा. डॉ अतुल गोयल यांना डॉ पी एस रमणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर न्यूरो सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ इको सुबागिओ व डॉ ऑस्कर एल्विस यांना संस्थेचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते डॉ. पी. एस. रमणी लिखित श्रीमद भगवद गीतेवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पाठीच्या कण्याचे विकार वाढताहेत – डॉ. व्हर्नोन वेल्हो
जीवनशैलीतील बदलांमुळे तसेच सुस्त जीवनपद्धतीमुळे पाठीच्या कण्यांचे विकार वाढत आहेत. या विकारांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने डॉक्टरांचे कौशल्य वर्धन केले जात आहे तसेच पाठीच्या कण्याच्या विकारांकरिता सामायिक व्यवस्थापन पद्धती विकसित केली जात आहे. देशात तसेच राज्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गरिबांना देखील पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रिया करता येत आहेत, अशी माहिती डॉ.व्हर्नोन वेल्हो यांनी यावेळी दिली.
००००
Maharashtra Governor inaugurates SPINE 2022- International Conference of Spinal Surgeons
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the International Conference of Neuro Spinal Surgeons 'Spine 2022' in Mumbai on Friday (16th Sept).
The Conference has been organised by the Neuro Spinal Surgeons Association. Founder President of NSSA Dr P S Ramani, Organizing President Dr Vernon Velho, Organizing Secretary Dr Sumit Pawar and renowned Neurosurgeon Dr Prakash Modha were present.
The Governor presented the 'Dr P S Ramani Lifetime Achievement Award' to renowned Professor and Surgeon of NeuroScience Dr Atul Goel. Honorary Membership of the Association was given to two international experts Dr Eko Subagio and Dr Oscar Elves on the occasion. The Governor released Dr P S Ramani's book on Bhagwad Gita on the occasion.
Speaking on the occasion, the Governor expressed concern over the rising cases of Spinal disorders due to changes in lifestyle. He called upon international experts in the field to collaborate, learn and share their expertise to provide better and affordable care to patients.
००००
मराठवाडा
मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान असून त्याची महती जगभर पोहोचणे आवश्यक आहे. समाजातल्या सर्व घटकांनी निर्धार आणि एकजूटीने हा संग्राम लढल्यानेच मराठवाडा मुक्त होऊ शकला, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन निर्धाराने प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त थोर स्वातंत्र्यसेनानी श्री.स्वामी रामानंद तीर्थ स्मारक व सेवाभावी संस्था परभणी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समितीकडून शहरातील तापडिया नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह निशिकांत भालेराव, सुभाष जावळे, रामेश्वर शिंदे, अरूण मराठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठवाड्यात ज्याप्रमाणे रझाकारांनी अन्याय-अत्याचार केला त्याचप्रमाणे कर्नाटक, तेलंगणा राज्यातील जनताही निजामाच्या जुलमी राजवटीमुळे त्रस्त होती. तेथेही अनेकांनी बलिदान दिले. या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करुन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईमुळे देश एकसंघ ठेवण्यास मदत झाली. देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळाले असले तरी हैद्राबाद संस्थांनात मात्र शस्त्रांनी लढा जिंकावा लागला. अशाही परिस्थितीत येथील सेनानींनी अत्यंत संयमाने शस्त्रे वापरली. त्यामुळेच हा लढा ऐतिहासिक ठरला. या संग्रामाची महती देशभर पोहचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मराठवाड्याचा अनुषेश भरुन काढण्यासाठी राज्य सरकार निर्धाराने प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळविण्याच्या प्रयत्नातून त्यास निश्चितच मदत होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण उघडे, राधाबाई खंडागळे आणि प्रल्हादसिंग ठाकूर यांच्या पत्नी वत्सलाबाई, स्वामी रामानंद तीर्थ यांचे नातू शिरीष खेडगीकर यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्कार केला. औरंगाबादपासून हैद्राबादला नेण्यात येणारी मशाल मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते प्रज्वलित करण्यात आली.
आमदार श्री.पवार यांनी लातुरला विभागीय आयुक्तालय निर्माण करण्यासह मराठवाड्यात क्रीडा विद्यापीठ, उद्योग, सभागृह, संगणकीकृत ग्रंथालयांची उभारणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर श्री.भालेराव यांनी आपल्या भाषणात मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. श्री. वाईकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास सुधीर बिंदू, जे. के. जाधव, पी. आर. देशमुख, आर. डी. मगर, यशवंत कसबे, मुहमद इलियास, सखाराम काळे पाटील, भूपाल अरपाल, गोविंद पवार, मोहन देशमुख आदींसह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
*****
विद्यापीठ
विद्यापीठाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उत्साहात
• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करणार.
औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष, मुत्सद्दी, धोरणी आणि रणधुरंदर होते. त्यासोबतच ते कुशल प्रशासक आणि श्रेष्ठ व्यवस्थापकही होते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या महाराजांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्या दृष्टीने विविध मागण्यांबाबत शासन निश्चितच सकारात्मक भूमिका घेणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, नारायण कुचे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव जयश्री सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपतींच्या काळातील गड - किल्ले, वारसा स्थळे जतन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या जतनासाठी शासन प्रयत्नशील आहे. मंत्रिमंडळ निर्मितीची संकल्पनाही महाराजांनीच सुंदर स्वरुपात साकारली. शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. भारतीय नौदलास प्रदान करण्यात आलेल्या नव्या ध्वजावर छत्रपतींच्या राजमुद्रेला स्थान देण्यात आले आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशी आहे. स्वराज्य, हक्क आणि आपल्या भाषा प्रांतासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला महाराजांकडूनच मिळाली आहे. असे सांगतांना छत्रपतींचे घराणे याच परिसरातील असल्याचा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. या पुतळ्याच्या निमित्ताने आपल्या युवा पिढीला मातृभक्ती, राष्ट्रभक्ती आणि मातृभूमीसाठी तन, मन अर्पण करण्याची ऊर्जा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठ परिसराचे पावित्र्य सर्वांनी जपावे, असे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले, या परिसरात मराठवाड्याच्या भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी आणि परिवर्तनशील विचारांचाही वारसा लाभला आहे. याच भूमीत बाबासाहेबांनी शैक्षणिक चळवळीचे रोपटे लावले आहे. त्यांच्याच कर्मभूमीत त्यांच्याच नावाने विभूषित झालेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा वटवृक्ष विस्तारला आहे. या विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीसाठी विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन महिन्यात शासनाने सुमारे 450 नवीन निर्णय घेतले असून अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यात प्राध्यापकांनाही न्याय मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराजांच्या पुतळ्याची उभारणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, या निमित्ताने मराठवाड्यासाठी दोन महत्त्वाचे संकल्प पूर्ण झाल्याचा मला विशेष आनंद होत आहे. यापूर्वी पैठणचे संतपीठ साकारले आणि आज या पुतळ्याची उभारणी झाली. महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने संस्कृती जपणारे राज्य आहे. ही प्रतिमा अशा कृतीतून साकारली जात आहे. विद्यापीठ जागतिक दर्जाचे होण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले तर डॉ. बाबासाहेबांच्या लेखणीने क्रांती घडवली. या दोन्ही महापुरुषांचे पुतळे विद्यापीठ परिसरात असणे ही विद्यापीठासाठी गौरवशाली बाब आहे. आजच्या काळात छत्रपती शिवरायांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील हा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगून पैठण येथील संत विद्यापीठ स्वायत्त असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कोविड काळात विद्यापीठाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुल, अध्यासन केंद्र संकुल, प्रवेशद्वार सुशोभिकरण, विद्यापीठ नामांतर लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्यांचे शहीद स्मारक, विद्यार्थी वसतिगृह आदी कामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी यासोबतच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती होण्याची अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली.
समाधान इंगळे आणि नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती करणारे नरेंद्र सोळुंके आणि उभारणीत योगदान देणारे अतुल निकम यांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
0000
स्वामी समर्थ पर्यावरण पूरक
👆 कुडाळ येथील स्वामी भक्ताने आपल्या घरी केळीच्या झाडापासून श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिकृती असलेले श्री सत्यनारायण पूजेचे नेत्रसुखद मखर बनविले ..... त्याचे छायांकित दर्शन !
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
