सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 16 September 2022
जन सुनावणी
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातसमुह नावात
दुरुस्तीसंदर्भात २७ सप्टेंबरला जनसुनावणी.
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २७ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे सकाळी ११ वाजता जातसमुहाचे नाव बदलाबाबत सुनावणी होणार आहे.
यावेळी तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरूस्ती करण्याबाबत, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया, गुरूडी, गरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरूड कापेवार, गुरूडा कापेवार इ. तसेच हलवाई या जातीसमुहाच्या नावात दुरुस्ती करण्यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कर्जरोखे
महाराष्ट्र शासन कर्जरोख्यांची 8.84 टक्के दराने 17 ऑक्टोबर रोजी परतफेड
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.84 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थो
सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.
तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.84 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.
भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.
रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव शैला ए यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
भरती कर्मचारी
सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारीपदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १६: कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी आहे.
या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य). शिक्षण - एस.एस.सी. उत्तीर्ण., एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण आणि टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य. वयोमर्यादा ३० ते ५० वर्ष, मानधन रू. १७ हजार ८२३ दरमहा. अर्जाचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर असून मुलाखत २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन मेजर जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यासाठी पत्रव्यवहार आणि संपर्काचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, एडब्लूडब्लूए डायमंड वसतीगृहाच्या पाठीमागे, कलीना मुंबई विद्यापीठ उत्तर गेट समोर, सांताक्रुझ पूर्व, मुंबई - ४०००५५ दूरध्वनी - ०२२-३५०८३७१७, ई-मेल zswo_mumbaiupnagar@
अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी सैनिक/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
००००
व्यापार उद्यम
व्यापारउद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी ना. नारायण राणे
राज्यातीलउद्योग क्षेत्राला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणार - ना उदय सामंत
महाराष्ट्र चेंबरच्यापदाधिकाऱ्यांसमवेत ८ दिवसात बैठक घेण्याचेअध्यक्ष ललित गांधी यांना ना. उदय सामंत यांचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपालाआलेले आहे. वैद्यकीय उत्पादनक्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे वमहासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातूनबघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकरणामुळे उत्पादनवाढते,उत्पादनवाढले की नफा वाढत जातो. आधुनिकीकरण ही काळाची गरजअसून स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा असे केंद्रीयसूक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले. तसेच महाराष्ट्र चेंबरनेराज्यामध्ये उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, सूक्ष्म लघु व मध्यमउद्योगांना मदत करावी, बंद व आजारी उद्योग व्यवस्थित सुरूहोण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व शासनाची मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे. सूक्ष्म लघु व मध्यमविभागाकडून महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल असे आश्वासनमहाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना ना. नारायण राणे यांनी दिले. राज्यातील व्यापार उद्योग कृषी क्षेत्राच्या विकासासाठीमहाराष्ट्र चेंबर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचेकौतूक ना. नारायणराणे यांनी याप्रसंगी केले. राज्यस्तरीय उद्योगपरिषदेमध्ये मुख्य पाहुणे भारत सरकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नाम.नारायण राणे यांनी भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीयअर्थव्यवस्थेचे इंजिन या विषयावर मार्गदर्शन केले.महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीराज्यातील उद्योगांना गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करतआहे. महाराष्ट्र चेंबर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उद्योजक वाढविण्याचे जे काम करतेते कौतुकास्पद आहे. व्यापार उद्योगाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्वसहकार्य व उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील. राज्यातील व्यापारउद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ८दिवसात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी महाराष्ट्रचेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले. मोठी गुंतवणूक वामोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन उद्योजकांना जास्तीत जास्तसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रातआणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री सामंत यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफकॉमर्स,इंडस्ट्रीअँण्ड अग्रिकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत मेक इन महाराष्ट्रमध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर उद्योग मंत्री सामंत यांनी मार्गदर्शन केले. एमआयडीसीचेमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनीही यावेळी विशेषमार्गदर्शन केले.केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेयांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या 94 व्या वार्षिक अहवालाचेअनावरण करण्यात आले. तसेच महिला उद्योजकता समितीचे धोरण व युथ विंग समिती वसूक्ष्म,लघुव मध्यम उद्योग समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ना. नारायणराणे व ना. उदय सामंत यांचा सत्कार केला व प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय उद्योगपरिषदेची सविस्तर माहिती दिली तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यांमध्ये महिलासमिती व युथ विंग आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग समिती यांच्यामार्फत महिला वतरुणांसाठी “उद्योगवृद्धीयात्रा” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील 36 जिल्ह्यात महिला क्लस्टर, कृषी क्लस्टर व उत्पादनआधारित क्लस्टर ची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले. भारत अमेरिकेदरम्यानव्यापार उद्योग वाढीसाठी इंडो यूएस डेव्हलपमेंट फोरमची स्थापना महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात आली असून परत अमेरिकेत गुळ व आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणारअसल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या विविध अडचणींची माहितीयाप्रसंगी दिली व राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी ला स्थगिती देण्यात यावी अशी मागणीअध्यक्ष ललित गांधी यांनी केली.याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललितगांधी, मुख्य पाहुणे भारत सरकारचेसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रीनाम. श्री. नारायण राणे व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री नाम.श्री. उदय सामंत, महाराष्ट्र सरकारचे पर्यटनव कौशल्य विकास मंत्री नाम. श्री. मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेशदाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ. शुभांगीतिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखरपुनाळेकर ,उपाध्यक्ष तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचेचेअरमन विजय कलंत्री महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगनउपस्थित होते.राज्यस्तरीय परिषदेत महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्यव राज्यभरातील व्यापारी उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.
भारत-इराण मैत्रीसंबंध
भारत-इराण मैत्रीसंबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी
कायदेमंडळांनी पुढाकार घ्यावा...
इराणच्या महिला संसद सदस्यांचा विधिमंडळात
उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते सन्मान
मुंबई, दिनांक 15 : भारत आणि इराण या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये कृषी, व्यापार, सुक्ष्म तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिकर्म या क्षेत्रामध्ये व्यापारवृध्दीसाठी अपार संधी आहेत. दोन्ही देशांच्या कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन हे संबंध आणखी दृढ करावेत अशी अपेक्षा इराण संसदेच्या सदस्या डॉ. फातेमा घसेमपूर आणि डॉ. मोसूमेह बहराम यांनी व्यक्त केली. इराण संसदेच्या शिष्टमंडळाने आज विधानमंडळाला सदिच्छा भेट दिली.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा इंग्रजी भाषेतील चरित्रग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या महिला सदस्यांसमवेत इराणचे भारतातील राजदूत डॉ. अली चेगेनी, मुंबईतील इराणचे उच्चायुक्त श्री. ए. एम. अलिखानी, इराणचे मुंबईतील व्यापार व वाणिज्य विभागाचे उच्चायुक्त श्री. सय्यद मोहम्मद मिराई आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत हे देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली योगदानाची माहिती दिली. महिला सबलीकरण आणि विकासासंदर्भात महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजना, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण, महिलांचा राजकीय सहभाग, महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांना उजाळा देत त्यांनी दोन्हीकडील लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या अभ्यासगटांच्या भेटी आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
इराणमध्ये महिलांना आम्ही केवळ कुटुंबातील महत्वाचा नव्हे तर अर्थकारणातील महत्वाचा घटक मानत आहोत. व्यापारउदीमामध्ये इराणमध्ये महिलांनी मोठी आघाडी घेतली आहे. दोन्ही देशातील महिलांच्या यशोगाथा प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे तसेच समाजमाध्यमांद्वारे मांडल्या जाव्यात ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, दोन्हीकडील कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा असे मत इराणच्या महिला संसद सदस्या तसेच वाणिज्यदूतांनी यावेळी व्यक्त केले.
*****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...










