*ज्याच्या जीवनात संघर्ष आहे,*
*दररोज काहीतरी अडचणी आहेत,*
*दररोज कोणीतरी निंदक आहे,*
*दररोज कोणाचातरी विरोध आहे,*
*त्यानं समजाव आपला रस्ता योग्य आहे.*
*🙏🏻🙏🏻शुभ प्रभात🙏🏻🙏🏻*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*ज्याच्या जीवनात संघर्ष आहे,*
*दररोज काहीतरी अडचणी आहेत,*
*दररोज कोणीतरी निंदक आहे,*
*दररोज कोणाचातरी विरोध आहे,*
*त्यानं समजाव आपला रस्ता योग्य आहे.*
*🙏🏻🙏🏻शुभ प्रभात🙏🏻🙏🏻*
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र
------
शुल्क व करपरतावा माफीचा लाभ वाढवावा अशी विनंती
मुंबई, दि. 15 : काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्वारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियूष गोयल यांना केली आहे.
या संदर्भामध्ये दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणतात की, कांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन 2021-22 मध्ये 136.70 लाख मे.ट. झाले जे की त्यापूर्वीच्या वर्षीपेक्षा 20 लाख मे.टनाने जास्त होते. एकंदरच बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले. एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात होते मात्र, तेथील आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्याकडील शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणे शक्य होत नाही.
केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत (Remission of Duties and Taxes on Export Products- RoDTEP) 2 टक्के ऐवजी 10 टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा अशी राज्य सरकारची विनंती देखील नाकारली आहे. आपल्या मंत्रालयाने या योजनेत 10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायद्याच होईल. त्याचप्रमाणे सध्या नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे ती आणखी 2 लाख मे.टनाने वाढवावी, अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने यापूर्वीच 2.38 लाख मे.टन कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून मध्ये केली आहे. आणखी 2 लाख मे.टन खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दिलखुलास’ कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त
दीपेंद्र सिंह कुशवाह यांची मुलाखत.
मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवरून शुक्रवार दि. 16 सप्टेंबर व शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत मराठवाडा मुक्ती दिन तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्याबाबतची सविस्तर माहिती श्री.कुशवाह यांनी दिली आहे. तसेच युवकांनी या महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात केले आहे.