Thursday, 15 September 2022

उद्योग सुविधा प्रोत्साहन

 उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहन

देण्यासाठी राज्य शासन तत्पर

उद्योगमंत्री उदय सामंत

‘बॉयलर इंडिया 2022’ चे उद्घाटन

·        16 सप्टेंबरपर्यंत चालणार प्रदर्शन

·        बाष्पके क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचे कार्यशाळेत मार्गदर्शन

·        प्रदर्शनात दहा देशातील 280 हून अधिक उद्योजकांचा समावेश

·        नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रदर्शनात समावेश

 

            ठाणेदि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिकस्तरावरील ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शनचर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईलअसे प्रतिपादन उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.

            वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शनचर्चासत्र भरविण्यात आले आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरेआमदार महेश बालदीआमदार रमेश पाटीलकामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघलविभागीय आयुक्त तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकरकामगार आयुक्त सुरेश जाधवबाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकरअदानी पॉवरचे थर्मल हेड चैतन्य प्रसाद साहूथायसन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भाटिया आदी यावेळी उपस्थित होते.

            या प्रदर्शनात जर्मनीस्विझरलँडइंग्लंड या देशांसह दहा देशातील सुमारे 280 उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रेसाहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञानघडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बॉयलर क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले कीबाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदलया क्षेत्रासंबंधीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. कामगार व उद्योग विभाग एकत्र येऊन उद्योगांना चांगल्या सुविधा देऊ. सध्या असलेल्या व नवीन उद्योगांनाही इतर राज्यांपेक्षा वीज पुरवठाजमीन व इतर प्रोत्साहनपर सुविधा महाराष्ट्र शासन देईल. राज्यात नवनवीन उद्योग येण्यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून वेदांतापेक्षाही मोठा उद्योग राज्यात आणण्यात येईलअसे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

            राज्यातील सर्व प्रकल्पांना इतर राज्यांपेक्षाही चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करत आहे. बॉयलर उद्योग वाढीसाठीही राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण मदत देण्यात येईल. तसेच या क्षेत्रासाठीही प्रोत्साहनपर पॅकेज देण्यासाठीही प्रयत्न करूअसेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभागाचे योगदान – कामगार मंत्री सुरेश खाडे

            कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले कीउद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभताकामगारांची सुरक्षितता व कामगार हित या त्रिसूत्रीची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग व कामगार विभाग हे एकत्र काम करत आहेत. बॉयलर हा सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीमध्ये हातभार लागेलयासाठी बाष्पके निर्माते व वापरकर्त्यांनी प्रयत्न करावेत.

            व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत (ईज ऑफ डुइंग बिझनेस) राज्यातील 392 सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यापैकी 41 सेवा या कामगार विभागाशी संबंधित आहेत. त्यातही बॉयलर विभागाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. व्यवसाय सुलभीकरणामध्ये कामगार विभागाने मूलभूत व महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याअंतर्गत एक खिडकी योजना राबवून एकाच अर्जावर सर्व परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी  मंत्री श्री. सामंतश्री. खाडे यांनीही प्रदर्शनस्थळातील विविध स्टॉलना भेटी देऊन माहिती घेतली. प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रदर्शन व चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. श्री. अंतापूरकर यांनी प्रास्ताविकात बाष्पके संचालनालयाची माहिती व चर्चासत्राविषयी माहिती दिली.यावेळी उद्योग प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर बाष्पके उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.




मानधन अंगणवाडी

 अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

              मुंबईदि. 14 : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

           मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत  महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा  बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनएकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवालउपसचिव वि. रा. ठाकुरमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटीलदिलीप उटाणेआरमाइर इराणीअतुल दिघेराजेश सिंगसंगीता कांबळेदत्ता देशमुख यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीराज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत.अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ तसेच विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे.मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे याबाबतीत विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेऊअसेही त्यांनी सांगितले.


वाटच लावली

 


मदत शेतकरी करता

 शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठीवाढीव दराने 98 कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते निर्देश. मदत शेतकरी 

       मुंबई,दि.14 : राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्यानुसार शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्या बाधीत शेतक-यांना 98 कोटी 58 लाख रूपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पेक्षा वाढीव दराने मदत वितरीत करण्यात येणार आहे.

          या आपत्तीमुळे 1 लाख 18 हजार 996 इतके शेतकरी बाधीत झाले आहेत. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 98 कोटी 58 लाख रुपयांची मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचे आदेश नुकतेच मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आले आहेत.

        नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरुन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मदतीत वाढ करून प्रति तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

            शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने 14 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केला आहे.                                                         


 

फूल है बहरोका

 


पर्यटन उपक्रम

 पर्यटन वाढीसंदर्भात शासनाकडून विविध उपक्रम.

            मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक राज्यात मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांच्याशी चर्चा केली.

            आज मंत्रालयातील दालनात रशियाचे महावाणिज्य दूत व त्यांचे शिष्टमंडळ यांनी मंत्री श्री. लोढा यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

         उपकौन्सुल जनरल ओलेगा डीरेरा, ओलेगा मेलनीको, मॉस्को पर्यटन समितीचे उपाध्यक्ष अलीना अरतुयुन्वा, मॉस्को आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे बुलेट निरकोवान,तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे प्रमुख अना फोनाकोव्हा यावेळी उपस्थित होते.

         मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन वाढीस चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. पर्यटन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवून पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.       

            रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांनी यावेळी मॉस्को पर्यटन विभागाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम तसेच पर्यटन सुविधांबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी केले.    

लंपी आजार गुरांचा

 राज्यातील 22 जिल्ह्यातील बाधित गाव परिसरातसात लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण

- सचिंद्र प्रताप सिंह.

            मुंबई, दि. 14 : राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १४ सप्टेंबर २०२२ अखेर एकूण ४७० गावांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. लंपी नियंत्रणासाठी राज्यातील 22 जिल्ह्यातील बाधित गावांच्या परिसरातील 2 हजार 535 गावांमध्ये 7 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

            श्री सिंह म्हणाले, जळगाव २४, अहमदनगर १७, धुळे १, अकोला ५, पुणे ८, सातारा २, बुलडाणा ३, अमरावती ३ व वाशिम १ अशा ६४ बाधित जनावरे यामुळे दगावली.

१७५६ पशुधन उपचाराने बरे झाले

            पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लंपी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आले आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २५३५ गावातील एकूण ६,९७,९४९ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे व पुढील लसीकरण सुरू आहे. बाधित गावांतील एकूण ३५१९ बाधित पशुधनापैकी एकूण १७५६ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

लसमात्रा मोठ्या प्रमाणात उपलब्ध; बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण

            लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी १६.४९ लाख लसमात्रा राज्यात उपलब्ध आहेत. १४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त ५ लाख लसमात्रा राज्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. आणखी ५० लाख लसमात्रा आठवडा भरात प्राप्त होत आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याचे श्री सिंह यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi