People don't change when you tell them better option, they change only when they realise that there is no other option.
Good day
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
People don't change when you tell them better option, they change only when they realise that there is no other option.
Good day
*"वेळेला " कुणी मदतीला येईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आलेल्या "परिस्थितीशी" स्वतः दोन हात केलेले कधीही चांगलंच...!!*शुभ सकाळ*🌹🙏
किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास
येत्या दीड वर्षात पूर्ण करणार
- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 13 : मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या 18 महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासामध्ये मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या इतर सागरी सस्तन प्राण्यांच्या नोंदी करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीतील करण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या या पहिल्या अभ्यासात मुंबई महानगरातील साधारण ७० किमी (उत्तर - दक्षिण) किनारपट्टीचा समावेश करण्यात येणार आहे.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेला हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट १५, २०२० मध्ये घोषित केलेल्या Project Dolphin या दूरदर्शी उपक्रमाला अनुसरून असून त्यामुळे देशातील नद्या व खाड्यांमधील डॉल्फिनच्या संरक्षण व संवर्धनात मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हा प्रकल्प सुरु होणार असून कांदळवन प्रतिष्ठान आणि कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन (CCF) स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सदर प्रकल्पाचे अभ्यास क्षेत्र उत्तरेकडील वैतरणा नदीच्या मुखापासून सुरू होऊन दक्षिणेकडील ठाणे खाडी तसेच बृहन्मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतचा पश्चिम समुद्र किनारा व्यापेल. या क्षेत्रामध्ये बॅक बे, हाजी अली आणि माहीम खाडी यांसारख्या अनेक खाड्या तसेच एमएमआर क्षेत्रामधील मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वैतरणा या पाच नदीच्या मुखांचा समावेश असेल, जे डॉल्फिन आणि पॉरपॉइज या दोन प्रमुख प्रजातींच्या अधिवासाचा अभ्यास करतील.
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी घेतली वनमंत्री यांची सदिच्छा भेट.राहीबाई यांनी जैविक शेतीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविले
- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 13 : देशभरात बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. राहीबाई यांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद असून त्यांनी जैविक शेतीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविले असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्रीमती पोपेरे या गावरान वाण जपत त्याच्या बिया संकलित करण्याचे काम करत आहेत. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून देशी पिके पिकविणाऱ्या पोपेरे यांनी अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून जैविक शेतीला चालना दिली आहे.
या सदिच्छा भेटीवेळी ममता भांगरे, योगेश नवले आणि डॉ. राजश्री जोशी उपस्थित होते.
जैवविविधता विषयावर कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र चद्रपूर येथे सुरु करणार
- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 13 : राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून यासंदर्भात जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जैवविविधतेचे संवर्धन करणे हे अत्यंत आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्वांसाठी एक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येईल. या केंद्रामध्ये वर्षांतील 365 दिवस जैवविविधता जपण्यावर प्रशिक्षण देण्यात येईल. राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, कृषी तज्ज्ञ यांच्यासह याविषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल.
जैवविविधता विषयावर क्यूआर कॉफी टेबल बुक
जैवविविधता म्हणजे नेमके काय, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता तसेच या क्षेत्रात तज्ज्ञ लोकांनी केलेले काम लोकांसमोर आणण्यासाठी छोटेखानी क्यूआर कॉफी टेबल बुक तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे. जैवविविधता मंडळाने एक स्वतंत्र ॲप तयार करुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना यामध्ये जोडून घ्यावे. तसेच जिल्हा नियोजन समिती निधीमध्ये जैवविविधतेसाठी काही निधी देता येतो का याची माहिती घ्यावी. राज्य शासनामार्फत विविध विभागांमध्ये पदभरती करण्यात येणार असून वन विभाग आणि जैवविविधता मंडळाकडे आवश्यक पदभरती याबाबत माहिती त्वरित देण्यात यावी, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
जैवविविधतेवर मराठीत साहित्य उपलब्ध करा
जैवविविधता मंडळामार्फत तयार करण्यात आलेले 1 ते 3 खंड त्वरित मराठीत करण्यात यावेत जेणेकरुन ते अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेत असल्यामुळे पोहोचण्यास मदत होईल. पहिली ते दहावीपर्यंतच्या पाठयपुस्तकात पर्यावरण, जैवविविधता यावर पाठ असेल याची खात्री करुन घेण्यात यावी अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. मानव विकास निर्देशांकामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर भर देण्यात येतो. गडचिरोली आणि नंदुरबार यासारख्या ठिकाणी रानभाज्या आणि दुर्मिळ प्रजाती मुबलक सापडतात अशा वेळी येथील स्थानिक बाबींना बाजारपेठ कशी मिळेल तसेच मोठमोठ्या बाजारांबरोबर ऑनलाईन करार कसे करता येतील याकडे लक्ष देण्यात यावे. दरवर्षी रानभाज्या महोत्सव आयोजित करुन या रानभाज्यांना चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी आणि यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रसिध्द शेफ यांचीही मदत घेण्यात यावी, असेही वनमंत्री यावेळी म्हणाले.
या बैठकीदरम्यान महाराष्ट्र जेन बँक प्रोगॅम फ्रेशवॉटर बायोडायर्व्हसिटी, स्थानिक पिकांमधील विविधता पिक वाणांची सूची, कृषी जैवविविधता संवर्धन व्यवस्थापन आण्णि पुनरुज्जीवन : दृष्टीकोन व मार्गदर्शक तत्वे, बियाणे बँकाची उभारणी आणि व्यवस्थापन, जनुकांचे वारसदार, जनावरांसाठी चाऱ्यांचा प्रश्न कसा सोडवाल, महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच जैवविविधता मंडळामार्फत जैवविविधता या विषयावर 37 लघुपट युटयूबवर प्रदर्शित करण्यात आले.
या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानोटिया, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्षे. ही. पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जैवविविधता मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण श्रीवास्तव, पद्मश्री राहीबाई पोपेरे, बीएआयएफचे विश्वस्त गिरीश सोहनी, डॉ. राजश्री जोशी, ममता भांगरे, योगेश नवले, यांच्यासह जैवविविधतेवर काम करणारे अभ्यासक उपस्थित होते.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 13 : आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य - सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले, असे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ५५ व्या युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते वयाची ७५ वर्षे तसेच चित्रपट - रंगभूमीवरील ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी - सराफ यांचेसह सत्कार करण्यात आला.
देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. आगामी काळ देशासाठी तसेच अशोक सराफ यांचेसाठी देखील अमृत काळ ठरेल अशी आशा व्यक्त करताना युवकांनी अशोक सराफ यांच्या अद्भुत कार्यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन राज्यपालांनी केले.
लोकांचे प्रेम हीच ऊर्जा : अशोक सराफ
मुंबई विद्यापीठाच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आपण भारावलो. लोकांचे प्रेम हीच ऊर्जा आहे, असे सांगताना 'तुम्ही लोकांनी मला इथपर्यंत आणून ठेवलं' अशी भावना सराफ यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी -सराफ, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक तसेच युवा महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी कलाकार उपस्थित होते. निलेश सावे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुनील पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
००००
Maharashtra Governor inaugurates 55th Youth Festival; felicitates Ashok Saraf on completion of 75
Maharashtra Governor and Chancellor of University Bhagat Singh Koshyari inaugurated the 55th Inter University Youth Festival of theatre, music and dance being hosted by the University of Mumbai at the Cawasji Jehangir Convocation Hall in Mumbai on Tue (13 Sept).
The Governor also felicitated popular film personality Ashok Saraf on the latter's completion of 50 years in film and theater and 75 years of age.
Officiating Vice Chancellor of the University of Mumbai Dr Digambar Shirke, actress Nivedita Joshi- Saraf, Deans of various faculties, teachers and student artists participating in the Youth Festival were present.
पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता देण्यासाठी
मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती
पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश
मुंबई, दि. 13 : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) च्या पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गासह इतर प्रकल्पांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, श्रीरंग बारणे, ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, मुख्य सल्लागार सत्यप्रकाश, मुख्यमंत्री सचिवालयाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग या २३५ कि.मी. प्रकल्पाचा लाभ पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला होणार असून देशातील सर्वात किफायतशीर अतिजलद मार्ग म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. १६ हजार ३९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात महाराष्ट्र शासनाचा ३ हजार २७३ कोटी रुपयांचा हिस्सा आहे. या खर्चाला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असून सर्व आवश्यक त्या परवानग्या या प्रकल्पाला मिळाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरु करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केल्या.
पुणे-नाशिक रेल्वे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठक सुरु असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि ‘महारेल’च्या प्रकल्पांची माहिती दिली. पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवर कार्यवाही करण्यात येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
इगतपुरी-मनमाड प्रस्तावित रेल्वे मार्ग कसाऱ्यापर्यंत वाढवा
इगतपुरी-मनमाड तिसरा, चौथा रेल्वे मार्ग कसाऱ्यापर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘महारेल’ ला दिल्या. तसेच इगतपुरी- मनमाड तिसरा व चौथा मार्ग (१२४ कि.मी.), सल्वा-बुटीबोरी कॉर्ड लाईन (५१ कि.मी.), औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग (८८ कि.मी.), रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग (३२ कि.मी.), गडचांदूर- मुकुटबन-आदिलाबाद रेल्वे मार्ग (७० कि.मी.) या प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे प्राप्त झाले आहेत, लवकरच बैठक घेऊन प्राधान्याने हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत नवीन केबल स्टेड उड्डाणपूलांची उभारणी सुरु
मुंबई महानगरात रेल्वे मार्गांवर असलेल्या जुन्या उड्डाणपूलांच्या जागी नवीन केबल स्टेड उड्डाणपूल ‘महारेल’ कडून उभारण्यात येत आहे. या उड्डाणपूलांचे काम अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ते अधिक आकर्षक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर दादर टिळक उड्डाणपूल, बेलासिस उड्डाणपूल, मध्य रेल्वे मार्गावर रे रोड, घाटकोपर, ऑलिव्हंट, गार्डन, भायखळा, ऑर्थर रोड, करी रोड, माटुंगा लेबर कॅम्पजवळ (भुयारी मार्ग) येथे तर पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर लोअर परळ येथे हे नवीन केबल स्टेड उड्डाणपूल उभारले जात आहेत.