Wednesday, 14 September 2022

सुंदर बाई, मुंबई

 मुंबईच्या सुशोभीकरणाची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

रस्ते दुभाजकवाहतूक बेटंस्कायवॉकपदपथ यांना मिळणार झळाळी

 

            मुंबईदि. 13 : मुंबईचे सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटंदुभाजकपदपथस्कायवॉकसमुद्र किनारेउद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुशोभीकरणाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सादरीकरण केले. खासदार राहुल शेवाळेएमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासबेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रामुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेपी. वेलारासूसंजीवकुमारआशिष शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

            मुंबई महापालिकेच्या हद्दीत २०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये सुमारे ९९० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. २०९ किमीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून ४५० किमी लांबीच्या रस्त्यांचे पूर्नपृष्टिकरण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण करा. खड्डे पडणार नाही याची दक्षता घ्यावीअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            मुंबई शहरातील ३०० किमी लांबीच्या विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोकळ्या जागेत फुल झाडांची लागवड करणेबोधचिन्हेसिग्नल यांचा कलात्मकरित्या सजावट करणे अशी कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहरपश्चिम व पूर्व उपनगरातील दुभाजकांचा समावेश आहे.

            पदपथांचे सुशोभीकरण करताना वर्दळीच्या ठिकाणची आणि रेल्वेस्थानकांजवळील पदपथांचे सुशोभीकरण करावे,अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली. सुमारे १७० किमी लांबीच्या पदपथांवर प्रकाश योजना व सजावट केली जाणार आहे.

            पुलांखालील मोकळ्या जागेचा वापर करण्यात यावा. त्याठिकाणी स्वच्छता ठेवावी. रंगरंगोटी करण्यात यावीअसेही श्री. शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील २५ महत्त्वाच्या पुलांची रोषणाई केली जाणार आहे. १८ स्कायवॉकना रोषणाई केली जाणार असून विविध आकाराचे स्ट्रीट फर्निचर देखील महत्त्वाच्या पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात ६१ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

            जुहूगिरगाव चौपाटीअक्सावर्सोवादादरमाहीमगोराई या सात समुद्र किनाऱ्यावर त्रिमितीय प्रतिमाकलाकृतीशिल्प साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्यानांमध्ये प्रकाशित कारंजेपदपथ करण्यात येणार आहे. उद्याने पर्यटन स्थळे बनू शकतील यासाठी ग्लो उद्यान संकल्पना राबविली जाणार आहे.

            वांद्रे किल्लावरळी किल्लागेट वे ऑफ इंडियाएशियाटिक वाचनालयमाझगांव उद्यानअफगाण चर्च याठिकाणी प्रकाश योजनेच्या माध्यमातून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यावेळी मियावाकी तंत्रज्ञानगेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण याबाबत आढावा घेण्यात आला. मुंबईत २६ ठिकाणी धारावीच्या धर्तीवर तीनमजली स्वच्छतागृह करण्यात येणार असून अत्याधुनिक बस थांबे करण्यात येणार आहेत.


मोफत सेवा आरोग्य

 मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखानाच्या माध्यमातून२ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा

पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

            मुंबई, दि. 13 : सामान्य मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.

L

            सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. झोपडपट्टीभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी तसेच मॅमोग्राफीसाठी देखील मोबाईल व्हॅन सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहे. सध्या ५० ठिकाणी या क्लिनिकचे काम पूर्ण झाले असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत २२७ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३४ पॉलिक्लिनिक असणार आहेत. त्याद्वारे विशेषज्ञांची सेवा मिळणार आहे. पोर्टाकॅबिन आणि पक्के बांधकाम अशा दोन स्वरूपात हे क्लिनिक चालविण्यात येणार आहे.

            साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येकरीता एक याप्रमाणे हे क्लिनिक सुरू करण्यात येईल. सकाळी सात ते दुपारी दोन, दुपारी तीन ते रात्री दहा अशी रुग्णाच्या सोयीनुसार दोन सत्रात या दवाखान्याची वेळ असणार आहे. या दवाखान्यात एक एम बी बी एस डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल. पॉलीक्लिनिक महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असेल. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी करण्यात आहे. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण केले.

००००



 



Sports planning

 


देव तारी

 _*९/११ च्या हल्ल्या नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर कार्यालय मधील माणस सुखरुप असण्यामागची छोटी, छोटी कारण... 🤔😌*_

कारणा वाचून काहीच घडत नसतं.

९/११ च्या हल्ल्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर मधे कार्यालय असलेल्या एका कंपनीने त्या दिवशीच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे अनुभव मनमोकळेपणाने कथन करता यावे यासाठी एक कार्यक्रम आयोजीत केला होता. 

ती माणस सुखरुप असण्यामागची छोटी, छोटी कारण स्तिमीत करणारी होती. 

* चिरंजीवांचा बालवाडीतील पहिला दिवस असल्यामुळे त्या कंपनीचा प्रमुख त्या दिवशी उशिरा आला होता.

* एका रस्ते अपघातामुळे झालेल्या प्रदीर्घ ट्रॅफिक जाम मधे अडकून एक जण उशिरा आला होता.

* एका महाशयांची नेहमिची बस चुकली होती.

* कार्यालयात यायला निघाले, आणि कार स्टार्टच होईना, असे एकाच्या बाबतीत घडले.

* एक सदगृहस्थ इमारतीत प्रवेश करतानाच फोनची बेल वाजली. बोलण्यासाठी बाहेर थांबले, त्यामुळे त्यांना उशिर झाला.

* एक सकाळी सकाळीच बाप झाला त्यामुळे ऑफिस ला निघालाच नाही.

* एकाला त्यादिवशी लवकर टॅक्सीच मिळाली नाही.

* सगळ्यात मजेदार वाटावी अशी गोष्ट म्हणजे एकाने त्या दिवशी नवीन कोरे बुट पायात घातले. 

 त्याच्या एका पायाला नवीन बुट चावला म्हणून तो बॅंड एड पट्टी घ्यायला औषधांच्या दुकानात थांबला आणि म्हणून तो आज जीवंत होता. 

तेव्हापासून जेव्हा मी रहदारीत अडकतो ;

माझी लिफ्टची फेरी चुकते ;

फोन घेण्यात माझा वेळ जातो ;

आणि अशा अनेक गोष्टी जेव्हा मला संताप अनावर होतो, मी अस्वस्थ होत असतो तेव्हा मी एकच विचार करतो ..!!

*"बेटा, तु या क्षणी जिथे असायला हवा त्या योग्य जागीच आहेस...."*

ह्या नंतर कधी एखाद्या सकाळी तुमच्या तयारीत घोळ झाला असेल, 

मुल शाळेचा गणवेश घालायला त्रास देत असतील,

 वेळेवर कारची किल्ली सापडत नसेल,

 रस्त्यात सगळे सिग्नल लाल दिसत असतील....

तर रागावू नका, 

त्रागा करु नका...!!!


एक गोष्ट कायमची ध्यानात ठेवा....!


*तुम्ही योग्य वेळी या योग्य जागी आहात.*


सुखरूप घरी परत आल्यावर देवाचे आभार माना . 

कायस्वरूपी कृतज्ञता बाळगा!!!


                    🙏🏻 😌 🙏

Tuesday, 13 September 2022

शक्तिदाता बुध्दी दाता darshnam

 *इतका मोठा गणपती अख्या महाराष्ट्रात नाही!!! कुठलीही फालतुगिरीनाही,DJ नाही,अचकट विचकट गाणी डान्स नाही!!! अत्यंत भाक्तीभावाने परिपूर्ण अशी मिरवणूक... बोध घ्यावा अशी  मिरवणूक तामीळनाडू (साऊथ)येथील आहे...🙏🏻🌸👇🏻🌸👇🏻🌸👇🏻


Sadvichar









 

लम्पी रोग नियंत्रणासाठी

 लम्पी रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध;

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी

- सचिंद्र प्रताप सिंह

            मुंबई, दि. 12 : लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागाशी संवाद साधताना ते बोलत होते.


            पशुसंवर्धन आयुक्त श्री.सिंह यांनी सांगितले, लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटककांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यामुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगळण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.  


टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा


            पशुपालकांना आवाहन करताना श्री. सिंह यांनी सांगितले की, लम्‍पी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.


            श्री. सिंह यांनी सांगितले की, खाजगी पशु वैद्यकीय डॉक्टर हे लम्‍पी बाधित पशुधनासाठी महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत आहेत तर एल एस डी निर्धारित उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व तालुका लघुपशुचिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी बाधित पशुसाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत याबाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या जिल्हा उपायुक्त किंवा खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच लम्‍पी चर्मरोगाची लक्षणे दिल्यास दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावेत.

दहा लक्ष लस मात्रा; अधिक गतीने लसीकरण करावे

            राज्यात लम्‍पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात बाधित क्षेत्रात 5 किमी परिघातील गायींना लसीकरण करण्यासाठी 10 लाख लस मात्रांची खेप प्राप्त झाली आहे. अधिक गतीने लसीकरण करावे व रोग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावे, अशा सूचना यंत्रणांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लम्‍पी रोगाची लक्षणे

            श्री. सिंह यांनी आजाराच्या लक्षणांविषयी सांगितले की, प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, लसिकाग्रंथींना सूज येते, सुरुवातीस ताप येतो, दूध उत्पादन कमी होते, चारा खाणे पाणी पिणे कमी होते, हळूहळू दहा-पंधरा मी. मी. व्यासाच्या गाठी, प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येवून दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात अशी लक्षणे दिसतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

लम्‍पी हा संसर्गजन्य आजार असल्याने रोग होवू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग झाल्यास त्याचा प्रसार होवू नये, याकरिता पशुपालकांनी पुढीलप्रमाणे आवश्यक काळजी घ्यावी.

        बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.

            निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.

            जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लम्‍पी सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.

बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.

            बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता १% फॉर्मलीन किंवा २-३ % सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २४ यांचा वापर करता येईल. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावताना मृत जनावरांच्या खाली व वर चुना पावडर टाकावी.

या रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डासमाश्यागोचीड इ.) होत असल्याने निरोगी सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना औषधोपचार करावेत. रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी - विक्री थांबवावी.

            लम्‍पी औषधोपचाराने बरा होत असल्यानेपशुपालकांनी प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्र.१८००२३३०४९८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 वर तत्काळ द्यावी. असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. "प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 ( The Prevention and Control of Infectious & Contagious Diseases in Animals Act, 2009) मधील कलम ४ (१) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्तीअशासकीय संस्थासंबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ही माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

००००


            

Featured post

Lakshvedhi