Wednesday, 14 September 2022

मधुमेह उपचार

 *🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी  भगवान कांबळे.कोल्हापुर महानगर पालिकामधे कामगार आहे. *एका पायात जयपूर फूट* आहे.हो..म्हणजे अपंगच आहे.मला शुगरमुळे दुसऱ्या पायाला जखम झाली होती.जखम काही केल्या बरी होत नव्हती. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता दोन्हीही पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.अपंगत्व काय असते हे मी अनुभवत आलो आहे.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

 Bahot imp.hai, please padiye

बाप डोक्याला ताप?

 *"साठीच्या व्यथा, पिंजऱ्यातील बाप"_ मित्रांनो,🙏, प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने बहुतेक घरात हीच परिस्थिती असते !👇*

*******************************

बहुतेक सगळेच बापांना नेहमीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातात, आणि त्यांच्यावर विविध कलमांखाली आरोप ठेवले जातात. 

घरोघरचे आरोप त्याच त्या स्वरुपाचे असतात, आणि बहुतेक बापांना हे समजतच नाही की ,आपण तर अनेक गोष्टी ज्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी  करताना आयुष्यभर स्वत:लाच शिक्षा देत आलो, त्यांनीच का बरं आपल्यावर आरोप पत्र ठेवावं ?🤔,

 वाढलेल्या वयात, मानसिक ताण सहन होत नसतानाही का त्या आरोपांसाठी होणार्‍या उलट तपासणीला सामोरं जावं.😴

*तुम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले ?


हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुम्ही, ते तर सगळेच बाप करतात,” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते.


*तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही*

असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं.

अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती.


 *तुम्हाला दूरदृष्टीच नाही.* 

ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. 

तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. 


माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं. पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक. म्हणून रूजू झाली.तुम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो?  तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला,खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता.समाजात एक वेगळा स्टेटस् ,दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते,काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले,

आता ती हा विचार मात्र करत नाही की , तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळवण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच नाही, शोभत नाही 🤔, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.


*मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो , त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं.* 

*_माझ्या एका मित्राच्या मुलीने मुलगा पाहिला आणि मला याच्याशीच लग्न करायचंय असा हट्ट केला._* 

*_बापाने सांगून पाहिलं, पण मुलगी हट्टाला पेटली आहे, बापाला काय कळतंय? ही समज आल्याने, शेवटी आणखी विरोध केला तर मुलगी विचित्र काही करेल, असं वाटून त्याने परवानगी दिली._*

*_त्या मुलाला राहायला घर नसल्याने बापाने आपला एक ब्लॉक त्याला दिला, संसार उभा करुन दिला. पुढे पाच वर्षात त्या दोघांचं बिनसलं आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. मुलगी घरी आली._* 

*_बाप आतल्या आत रडत होता. त्यावेळी मुलगी, आणि तिची आई, त्याला जाब विचारत होती, ”मला एक कळत नव्हतं, तुम्ही तर कडाडून विरोध करायचा होतात ना._*

*_तुम्ही बेसुमार लाडे लाडे जावई म्हणून त्याच्या नावावर घर करुन दिलंत. तुम्ही जर विरोध केला असता, तर माझं लग्न त्या विचित्र स्वभावाच्या मुलाशी झालं नसतं आणि आज ही वेळ आली नसती,😪


*_त्याला त्याच्या बायकोनेही नेहमीप्रमाणेच मुलीची री ओढली होती याचं दु:ख अधिकच होत होतं.😔😌😪😴_* 


*_तुम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात._* 


*_विशेषत: ,बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना ,एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस,अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे टाकाऊ बनलो.🤔😴_*


 *_जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता_*


 *_बापावरचं अवलंबित्व  संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे._*


*_आता बापांनी आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा._* 


*_जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा._* 


*_मित्रांनो, ज्यांच्यासाठी त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे नां..🤔_* 


*_एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं,आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत , मस्तीत व्यतीत करायचं.👍✌️😁😀, सकाळ  संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतित करायचे , त्यांचेशी समक्ष तर कधी फोन वर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासले पाहिजेत, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे. 

मित्रांनो, 

शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे ", "ये तो होना ही था ,"👍✌️_*माझ्या सर्व जेष्ठ नागरिक मित्रांनो, 🙏 आपल्याला हे पिंजऱ्यातील जिवन तितकेच आनंदात जगायचं आहे. 

जमेल  मित्रांनो,👍✌️

🙏🏻🙏🏻

सुदिन

 People don't change when you tell them better option, they change only when they realise that there is no other option.

Good day 

सुप्रभात

 *"वेळेला " कुणी मदतीला येईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आलेल्या "परिस्थितीशी" स्वतः दोन हात केलेले कधीही चांगलंच...!!*शुभ सकाळ*🌹🙏

किनारपट्टीवरील समुद्री प्राण्यांचा अभ्यास

 किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास

येत्या दीड वर्षात पूर्ण करणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 13 : मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवासत्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या 18 महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासामध्ये मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या इतर सागरी सस्तन प्राण्यांच्या नोंदी करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीतील करण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या या पहिल्या अभ्यासात मुंबई महानगरातील साधारण ७० किमी (उत्तर - दक्षिण) किनारपट्टीचा समावेश करण्यात येणार आहे.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेराज्य शासनाने हाती घेतलेला हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट १५२०२० मध्ये घोषित केलेल्या Project Dolphin या दूरदर्शी उपक्रमाला अनुसरून असून त्यामुळे देशातील नद्या व खाड्यांमधील डॉल्फिनच्या संरक्षण व संवर्धनात मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हा प्रकल्प सुरु होणार असून कांदळवन प्रतिष्ठान आणि कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन (CCF) स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सदर प्रकल्पाचे अभ्यास क्षेत्र उत्तरेकडील वैतरणा नदीच्या मुखापासून सुरू होऊन दक्षिणेकडील ठाणे खाडी तसेच बृहन्मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतचा पश्चिम समुद्र किनारा व्यापेल. या क्षेत्रामध्ये बॅक बेहाजी अली आणि माहीम खाडी यांसारख्या अनेक खाड्या तसेच एमएमआर क्षेत्रामधील मिठीदहिसरपोईसरओशिवरा आणि वैतरणा या पाच नदीच्या मुखांचा समावेश असेलजे डॉल्फिन आणि पॉरपॉइज या दोन प्रमुख  प्रजातींच्या अधिवासाचा अभ्यास करतील.

जैविक शेती

 पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी घेतली वनमंत्री यांची सदिच्छा भेट.राहीबाई यांनी जैविक शेतीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविले

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 13 : देशभरात बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. राहीबाई यांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद असून त्यांनी जैविक शेतीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविले असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

            गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्रीमती पोपेरे या गावरान वाण जपत त्याच्या बिया संकलित करण्याचे काम करत आहेत. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून देशी पिके पिकविणाऱ्या पोपेरे यांनी अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून जैविक शेतीला चालना दिली आहे.

            या सदिच्छा भेटीवेळी ममता भांगरेयोगेश नवले आणि डॉ. राजश्री जोशी उपस्थित होते.






जैवविविधता प्रशिक्षण

 जैवविविधता विषयावर कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र चद्रपूर येथे सुरु करणार

- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. 13 : राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून यासंदर्भात जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेजैवविविधतेचे संवर्धन करणे हे अत्यंत आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्वांसाठी एक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येईल. या केंद्रामध्ये वर्षांतील 365 दिवस जैवविविधता जपण्यावर प्रशिक्षण देण्यात येईल. राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारीविद्यार्थीशेतकरीकृषी तज्ज्ञ यांच्यासह याविषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल.

जैवविविधता विषयावर क्यूआर कॉफी टेबल बुक

            जैवविविधता म्हणजे नेमके कायजैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता तसेच या क्षेत्रात तज्ज्ञ लोकांनी केलेले काम लोकांसमोर आणण्यासाठी छोटेखानी क्यूआर कॉफी टेबल बुक तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे. जैवविविधता मंडळाने एक स्वतंत्र ॲप तयार करुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना यामध्ये जोडून घ्यावे. तसेच जिल्हा नियोजन समिती निधीमध्ये जैवविविधतेसाठी काही निधी देता येतो का याची माहिती घ्यावी. राज्य शासनामार्फत विविध विभागांमध्ये पदभरती करण्यात येणार असून वन विभाग आणि जैवविविधता मंडळाकडे आवश्यक पदभरती याबाबत माहिती त्वरित देण्यात यावीअसेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

जैवविविधतेवर मराठीत साहित्य उपलब्ध करा

            जैवविविधता मंडळामार्फत तयार करण्यात आलेले 1 ते 3 खंड त्वरित मराठीत करण्यात यावेत जेणेकरुन ते अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेत असल्यामुळे पोहोचण्यास मदत होईल. पहिली ते दहावीपर्यंतच्या पाठयपुस्तकात पर्यावरणजैवविविधता यावर पाठ असेल याची खात्री करुन घेण्यात यावी अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. मानव विकास निर्देशांकामध्ये शिक्षणआरोग्य आणि रोजगार यावर भर देण्यात येतो. गडचिरोली आणि नंदुरबार यासारख्या ठिकाणी रानभाज्या आणि दुर्मिळ प्रजाती मुबलक सापडतात अशा वेळी येथील स्थानिक बाबींना बाजारपेठ कशी मिळेल तसेच मोठमोठ्या बाजारांबरोबर ऑनलाईन करार कसे करता येतील याकडे लक्ष देण्यात यावे. दरवर्षी रानभाज्या महोत्सव आयोजित करुन या रानभाज्यांना चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी आणि यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रसिध्द शेफ यांचीही मदत घेण्यात यावी, असेही वनमंत्री यावेळी म्हणाले.

            या बैठकीदरम्यान महाराष्ट्र जेन बँक प्रोगॅम फ्रेशवॉटर बायोडायर्व्हसिटीस्थानिक पिकांमधील विविधता पिक वाणांची सूचीकृषी जैवविविधता संवर्धन व्यवस्थापन आण्णि पुनरुज्जीवन : दृष्टीकोन व मार्गदर्शक तत्वेबियाणे बँकाची उभारणी आणि व्यवस्थापनजनुकांचे वारसदारजनावरांसाठी चाऱ्यांचा प्रश्न कसा सोडवालमहाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच जैवविविधता मंडळामार्फत जैवविविधता या विषयावर 37 लघुपट युटयूबवर प्रदर्शित करण्यात आले.

            या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीमत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानोटियाप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. रावमहाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्षे. ही. पाटीलप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमयेजैवविविधता मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण श्रीवास्तवपद्मश्री राहीबाई पोपेरेबीएआयएफचे विश्वस्त गिरीश सोहनीडॉ. राजश्री जोशीममता भांगरेयोगेश नवलेयांच्यासह जैवविविधतेवर काम करणारे अभ्यासक उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi