Monday, 12 September 2022

हाकेला दिली साथ

  

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांचे सरकार असल्याची नातेवाईकांची भावना

            मुंबई, दि. 11: उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्यूमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केले. या दु:खद प्रसंगात मुख्यमंत्र्यांनी केलेली तातडीची मदत नातेवाईकांसाठी दिलासा देणारी ठरली.  


            पालघर जिल्ह्यातील काही यात्रेकरू ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरूंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३ वर्षे), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४० वर्षे), पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ वर्षे), दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय ५३ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.


            अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने उत्तराखंडमधील यंत्रणेशी संपर्क साधला आणि जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी जखमींवर उपचाराची माहितीही घेतली. 


            अपघातातील मृतांचे शवविच्छेदन आणि इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्याचदिवशी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आले, तेथून पहाटे हे पार्थिव मुंबईत विमानाने आणण्यात आले, त्यानंतर लगेचच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.


            इतक्या जलदगतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडून कोणत्याही अडचणींशिवाय पार्थिव नातेवाईकांकडे सुपुर्द केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच प्रशासकीय गतिमानतेचे कौतुक होत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, हेच यातून अधोरेखित झाले आहे, अशी भावना अपघातग्रस्तांचे नातेवाईक दयानंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

००००००



 

Bharitya संस्कृती विश्व माझे घर

 यह देखिए इंग्लैंड की महारानी की मृत्यु के बाद भारतीय सनातन का शांति पाठ किया जा रहा है और हम पाश्चात्य सभ्यता में आकर श्राद्ध का और शांति पाठ का उपहास उड़ाते हैं। हमको अपनी संस्कृति का अपमान करते हुए तनिक भी लज्जा नहीं आती। 🙏🙏


Sunday, 11 September 2022

केंद्रीय समाचार

 











विभागीय मुख्यमंत्री सचिवालय

 


नागरिकांनी तक्रारीअर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे

विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश  

 

मुंबईदि.11: ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुखपारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

            नागरिकांनी देखील आपल्या तक्रारीनिवेदनेअर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेसुशासन नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 8 सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीत विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजाविषयी चर्चा झाली. नागरिकांचे विविध प्रश्न आणि शासनस्तरावरील कामे तालुकाजिल्हा पातळीवरच निकाली निघावेत यासाठी विभागीय मुख्यमंत्री सचिवालय अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  मुख्य सचिवांना दिल्या.

            नागरिकांची शासनस्तरावर असलेली कामेत्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्जनिवेदने आदी मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात स्विकारून त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीयस्तरावर कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखतापारदर्शकतागतिमानता आणतानाच सर्वसामान्य जनतेला कमी त्रास व्हावा या हेतूने कोकणअमरावतीपुणेनाशिकऔरंगाबादनागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय (सीएमओ) यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

            विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत संनियंत्रण करीत असून विभागीय कक्षांमध्ये अर्ज स्विकारणेपोच पावती देणेअर्जावर कार्यवाही करणे तसेच प्राप्त अर्जत्यावरील कार्यवाही केलेले अर्ज व प्रलंबीत अर्ज इ. बाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचे या क्षेत्रियस्तरावरील मुख्यमंत्री कार्यालयावर संनियंत्रण केले जात आहे.

            माहिती अधिकाराअन्वये प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जावर प्रशासकीय विलंब टाळण्याच्या दृष्टीने व तातडीने कार्यवाही होण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जन माहिती अधिकारीसहायक जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आले आहे.

सफाई mohim


 माणुसकी प्रतिष्ठान , अलिबाग किनारपट्टी 

भले भी हम


 

आभार महा पोलिस


 

Featured post

Lakshvedhi