Saturday, 10 September 2022

नाचू चला

 श्रीकृष्ण महिला मंडळ, गवळी वाडी, पोष्ट  - वेश्वी

ता. अलिबाग



चौपाटीची स्वच्छता

 गणेश विसर्जनानंतरगिरगांव चौपाटीची स्वच्छता

क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत

स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा उपक्रम.

            मुंबई, दि. 10 : गणपती विर्सजन झाल्या नंतर गिरगांव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्मल्यांची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे 400 सभासद एन.सी.सी. मधील 1500 मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते.

            गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.

            या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन. बी. मोटे राज्य चिटणीस (अ.का.) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन स्काऊटस् आणि गाईडस् राज्यसंस्थेच्या वतीने करण्यात येत असते.



राजभवन भेट

 दि. 1 ऑक्टोबर पासून राजभवन भेट पुन्हा सुरु

            मुंबई दि.10 : तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. 

            दिनांक 10 सप्टेंबर पासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. 

            राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8.30 ही असेल व प्रतिदिवशी 30 लोकांना भेट देता येईल. 

            राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट येईल.  

राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील.   

            सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे. दिवाळीमुळे 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही. 

Raj Bhavan Heritage Tours to resume from 1 Oct.

            The heritage tour of Raj Bhavan at Malabar Hill will resume from 1 October. The booking for Raj Bhavan visit has started from today. The visits were closed during monsoon.

            The visits will remain open on all days except Mondays and official holidays. There will be a Diwali break of 7 days from 22 to 28 October. 

The timing of the visits will be 6 am to 8.30 am. 

            The tour will include visit to the Sunrise Gallery, Devi Mandir, the Underground Bunker, the Gallery of Revolutionaries, Darbar Hall, Jal Vihar and the Maharashtra Formation memorial.  


 

जात पडताळणी

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापिअद्याप ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही अशांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीपुणे यांनी एका केले आहे.

             शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असून, चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नयेतयासाठी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी  https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावी.

            जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीस जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाहीअसे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे.

*****


 


 

मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून

पडताळणीसाठी अर्जाचे आवाहन

 

            मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या जागांवर प्रवेश घेवू इच्छिनाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विहित वेळेत सादर करण्याचे आवाहनमुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त सलिमा तडवी यांनी केले आहे.

            जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावेत.  मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी  https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जाची एक प्रत मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करावी, असे आवाहन समितीच्या अध्यक्ष अनिता मेश्राम (वानखेडे) व उपायुक्त तथा सदस्य सलिमा तडवीसंशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुनिता मते यांनी केले आहे.

000


क्रीडा पुरस्कार

 क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

            मुंबई दि.8 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

            तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वतः फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र सरकारच्या dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर संकेतस्थळावर सादर करावे.

            तसेच ऑनलाईन अर्जाबाबत समस्या आल्यास 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करावा. केंद्रशासनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती व नियमावली व विहित नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

०००


साहित्य खंड

 स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड मोबाईल ॲपचे

येत्या सोमवारी लोकार्पण

 

            मुंबईदि. 8 : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड- 1 ते 13 या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाटय मंदिर येथे येत्या सोमवारदि. 12 सप्टेंबर 2022 रोजी लोकार्पण होणार आहे.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादीजहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ जसे असहकार आंदोलनसविनय कायदेभंगचलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.

            लोकार्पण सोहळयादरम्यान स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या अज्ञात पैलू’ तसेच मराठीहिंदीउर्दु भाषेतील निवडक रचनांवर आधारित यशोयुताम् वंदे’ हा कार्यक्रम होणार असून पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना त्यावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

            या कार्यक्रमाद्वारे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीद्वारे प्रायोगिक नाट्यगृहाचे उट्घाटन होणार आहे.

 


Featured post

Lakshvedhi