जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापि, अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही अशांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, पुणे यांनी एका केले आहे.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असून, चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीस जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे.
*****
मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून
पडताळणीसाठी अर्जाचे आवाहन
मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या जागांवर प्रवेश घेवू इच्छिनाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विहित वेळेत सादर करण्याचे आवाहन, मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त सलिमा तडवी यांनी केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावेत. मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.
000
No comments:
Post a Comment