सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 30 August 2022
अनुभवाचं बोल
*जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका..*
*कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं*
*आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं...*
🙏🏻 *शुभ प्रभात* 🙏🏻
Monday, 29 August 2022
World आर्चरी असो
आज *राष्ट्रीय क्रीडा दिन* या निमित्ताने महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब,रायगड जिल्ह्याचे लाडके आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले आहे. सदर खेळाडू *जागतिक फिल्ड आर्चरी स्पर्धा 2022* एस्टोनिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत १३ वर्ष खलील मुले या गटात *कु. सर्वेश निवास थले* (कुर्डूस, अलिबाग) रौप्यपदक मिळून रायगड जिल्हा शिरपेचात मानाचा तुरा रौला आहे.तसेच *कु. बाळू भाऊ ढेबे* (शिरवली, माणगाव) ९ व्या स्थानी राहिला आहे. हे दोन्ही खेळाडू *बावलेकर आर्चरी अकॅडमी* मध्ये आर्चरी चे शिक्षण घेत आहे.
व्यापार वृध्दी
भारत-अमेरीका दरम्यान व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण - राजदूत तरणजित सिंह संधु
मुंबई ः भारत-अमेरीका दरम्यान द्विपक्षीय व्यापार वृध्दिसाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चा ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण भुमिका बजावेल असे प्रतिपादन अमेरीकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधु यांनी केले.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ तर्फे भारत-अमेरीका व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ स्थापन करण्यात आली असुन या फोरम च्या बोधचिन्हाचे वॉशिंग्टन डीसी येथील इंडिया हाऊस येथे अनावरण करून या फोरम चा औपचारीक शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ललित गांधी, उमेश दाशरथी, भाऊसाहेब, कालवाघे, मयंक गुप्ता, नितिन इंगळे उपस्थित होते.
अमेरीकेतील भारतीय दुतावासातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभास ललित गांधी व महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विशेष अतिथि म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
ललित गांधी यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध आहेत त्याचा अमेरीकेतील गुंतवणुकदार व उद्योजकांनी लाभ घ्यावा असे सांगुन अमेरीकेच्या राजधानीत भारतीय दुतावासात संपन्न होत असलेल्या भव्य स्वातंत्र्य दिन समारंभात सहभागाची संधी मिळणे हा विशेष गौरवपुर्ण सन्मान असल्याचे नमुद केले.
भारतीय राजदुत तरणजित सिंह संधु यांनी भारत एक नवसामर्थ्यशाली देश म्हणुन पुढे येत असुन भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था व स्थित प्रशासन यामुळे भारतात उद्योग वाढ वेगाने होत आहे. इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम च्या माध्यमातुन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’ च्या प्रयत्नांना भारतीय दुतावास व अमेरीकेतील सर्व कॉन्सुलेट जनरल कार्यालये सक्रीय सहकार्य करतील असे आश्वासन दिले.
फोटो कॅप्शन ः महाराष्ट्र चेंबरच्या ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करताना अमेरीकेतील भारतीय राजुदत तरणजित सिंह संधु सोबत ललित गांधी, उमेश दाशरथी, नितिन इंगळे, भाऊसाहेब कालवाघे, मयंक गुप्ता इ.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...






