सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 29 August 2022
Sunday, 28 August 2022
क्रीडा दिन
क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मुंबई, दि.28 : 29 ऑगस्ट रोजी हॉकी खेळातील जादुगर म्हणून नावाजलेले मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन सर्व देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयाच्यावतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांचे शुभहस्ते मुंबई हॉकी स्टेडियम, चर्चगेट येथे सकाळी 9 वा. मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेस वंदन करुन राष्ट्रीय क्रीडा दिनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉन बॉस्को स्कूल, माटुंगा येथे सकाळी 10 वा. क्रीडा मंत्री यांच्या हस्ते मुंबई शहरातील नावाजलेले खेळाडू व मार्गदर्शक यांचा सत्कार होणार आहे. तसेच कबड्डी, फुटबॉल व हॉकी खेळांचे सामने सुरु होणार आहेत. या कार्यक्रमाकरीता सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उपसंचालक, क्रीडा युवक सेवा, मुंबई विभाग यांची उपस्थिती असणार आहे.
शासन जनतेसाठी
शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको.
चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे दि.28: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल.
मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. श्री.शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते.
आज मुंबईकडे परत जात असताना प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांना होणार त्रास लवकर दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको' हे त्यांचे वाक्य आणि आज दिलेली भेट नक्कीच जनतेला दिलासा देणारी आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...










