Thursday, 25 August 2022

सायबर instruction

 Got message from relative/friend/colleague asking for money/coupons? Could be FRAUD. Always Recheck and Reconfirm - Maharashtra Cyber Department

सेंद्रिय खताची किमया


 

कोळीवाडा विकास

 कोळीवाड्यांचा विकासन .वीन नियमावलीनुसार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

            मुंबई, दि 25 : मुंबई शहरातील कोळीवाड्यांचा विकास नवीन विकास नियमावलीनुसार केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

            लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. रेखांकनाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टींचा विकास केला जाईल. मात्र रेखांकनात समावेश असलेल्या कोळीवाडा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी नवीन विकास नियमावली तयार करण्यात येत आहे. त्या नियमावलीनुसार कोळी वाड्यांचा विकास केला जाईल.

            मुंबईतील विविध झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्रकल्पांबाबत सर्व आमदारांची व्यापक बैठक बोलावली जाईल. तसेच झोपडपट्टी पात्रतेबाबत एक विशेष कार्यप्रणाली विकसित केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            झोपडपट्टी पुनर्वसन विकास करताना भाडे न देणाऱ्या विकासकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. भाडे देण्यासाठी सक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

            कॅप्टन आर. तमिल सेल्वन, अस्लम शेख, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.


००००

शिवम

 


Swami समर्थ


 

अल्पसंख्यक

 अल्पसंख्याक विभागातीलरिक्त पदे लवकरच भरणार

मंत्री सांदीपान भुमरे यांची माहिती.

            मुंबई, दि. 25: अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री सांदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.

            मंत्री सांदीपान भुमरे यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त असणाऱ्या पदाच्या भरतीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.

            अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच अल्पसंख्याक विभागात निधी खर्च होण्यासाठी विविध विभागांशी समन्वय ठेवण्यात येईल, अशी माहितीही मंत्री भुमरे यांनी दिली.

            सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.


०००००

चौकशी

 दुधनी परिसरातील गैरप्रकारांचीसखोल चौकशी करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

            मुंबई दि. 25 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत चौकशी करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

            सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी आज उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिसरातील विविध प्रकारच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.



Featured post

Lakshvedhi