सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 24 August 2022
Good morning
*“Pages of yesterday cannot be revised, but the pages of today & tomorrow are blank & you hold the pen... Make it an inspiring story... We are the architect of our Destiny ....”*
*Good morning*😊
नुकसानभरपाई
सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्वपूर्ण निर्णय.
मुंबई, दि. 23 : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेत सर्वश्री विरोधी पक्ष नेते अजित पवार, अशोक चव्हाण, समीर कुणावार, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ, नाना पटोले, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, सुरेश वरपूडकर, कैलास पाटील, धर्मरावबाबा आत्राम, प्राजक्त तनपुरे, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, राजेश टोपे, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर, हरीश पिंपळे, अनिल पाटील यासह मान्यवर सदस्यांनी आपली मत मांडून विविध मागण्या मांडल्या होत्या.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर
नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील मदत
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्
निवासस्थान
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप
मुंबई, दि. 23 : शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),
श्री. सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),
श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड),
श्री. विजयकुमार गावीत (चित्रकुट),
श्री. गिरीश महाजन (सेवासदन),
श्री. गुलाबराव पाटील (जेतवन),
श्री. संजय राठोड ( शिवनेरी),
श्री. सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी),
श्री. संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),
श्री. उदय सामंत (मुक्तागिरी),
श्री. रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),
श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),
श्री. दीपक केसरकर (रामटेक),
श्री. अतुल सावे (अ-३ (शिवगड),
श्री. शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड) आणि
श्री.मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग).
***
महाप्रीत
विकासक व गुंतवणूक संस्थांच्या माध्यमातूनरोजगार निर्मितीची साखळी निर्माण होईल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· ‘महाप्रित’ हरितनिधी गुंतवणूक बैठकीत रु. २५,३६१ कोटींचा सामंजस्य करार
· विविध नामवंत कंपन्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.
मुंबई, दि. 23 : महाप्रितने ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट -2022 च्या माध्यमातून विकासक व गुंतवणुक संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण करण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
जुहू येथील जेडब्लू मेरियट हॉटेल येथे महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितने मुंबईत आयोजिलेल्या महाप्रित हरितनिधी गुंतवणूक बैठकीत विविध २२ प्रकल्पांसाठी तब्बल २५ हजार ३६१ कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, इरेडा , ग्रो बेटर ऍग्री ओव्हरसीज, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यासह अनेक नामवंत कंपन्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाप्रित कंपनी सौरऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन, कृषी प्रक्रिया मुख्य साखळी, परवडणारी घरे, महामार्ग रस्ते प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान तसेच सामाजिक बांधिलकी व सामुदायिक विकास क्षेत्र व त्यात लागू असलेले महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विभागाच्या योजना, प्रकल्प व धोरणे राबवित आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘महाप्रित’ने ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट -2022 आयोजित केली आहे. यामध्ये विकासक व गुंतवणूक संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण करण्याचा संकल्प ‘महाप्रित’ने केला आहे तो संकल्प लवकरच पूर्ण होईल, याची खात्री आहे.” असेही श्री. शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना म्हणाले, “महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने एप्रिल २०२१ मध्ये महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्यौगिकी मर्यादित अर्थात महाप्रित म्हणून वेगळी उपकंपनी स्थापन केली. नागपूर महानगरपालिका आणि महाप्रित यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पात्र स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास मदत होऊन समाजातील दुर्बल घटकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ही चांगली बाब असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.”
या बैठकीला महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, बी.एस.सी चे चेअरमन व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी उपगव्हर्नर सुभाष मुन्द्रा, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, निवृत्त प्रशासकीय अधिकारी उमाकांत दांगट, निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर, अखिल भारतीय इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कलंत्री, डॉ. दीपक म्हैसेकर, ईरडाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार दास, ईबीटीएसचे व्यवस्थापकीय संचालक पॉल जेसेन, एन.आय.आय.एफ.चे अजय सक्सेना, निवृत्त तांत्रिक शिक्षण कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, आय.सी.ए.आय.चे निलेश विकमसी, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे दाखविण्यात आलेल्या ‘महाप्रित’ कंपनीतर्फे समाजातील दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पाची प्रशंसा केली. तसेच हरितनिधी गुंतवणूक चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या.
इंडो ब्रिटीश फोरमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कविता शर्मा यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. ‘महाप्रित’च्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, गुंतवणूकदार व विकासक यांना एकाच मंचावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण होईल. मागासवर्गीय समाजातील घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न महात्मा फुले विकास महामंडळाच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थींसाठी वापरण्यात येईल. जेणेकरून मागास, दुर्बल घटकांना उत्पन्नाची साधने उपलब्ध होऊन त्यांची सर्वांगीण प्रगती होईल, असा विश्वास श्री.
नुकसान भरपाई
विधानसभा कामकाज/लक्षवेधी क्रमांक ४७८४७
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करणार.
- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण.
मुंबई, दि. 23 : मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणाऱ्या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्याबाबतच्या तक्रारीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी उपाययोजना करू अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणाऱ्या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य श्रीनिवास वनगा यांनी उपस्थित केला होता त्याचे उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणा-या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व भागातील नावझे, गिराळे, साखरे, पारगाव, वनघर, घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील शेती पावसाळ्यात पाण्याखाली जावून शेतीच्या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त आहेत, त्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
*****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


