Wednesday, 24 August 2022

नुकसान भरपाई

 विधानसभा कामकाज/लक्षवेधी क्रमांक ४७८४७

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करणार.

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण.

            मुंबई, दि. 23 : मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणाऱ्या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्याबाबतच्या तक्रारीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी उपाययोजना करू अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.


             मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणाऱ्या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य श्रीनिवास वनगा यांनी उपस्थित केला होता त्याचे उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.


        सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणा-या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व भागातील नावझे, गिराळे, साखरे, पारगाव, वनघर, घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील शेती पावसाळ्यात पाण्याखाली जावून शेतीच्या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त आहेत, त्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.


*****



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi