Wednesday, 24 August 2022

पुनर्विकास

 विधानपरिषद लक्षवेधी :


ठाणे शहरांतर्गत मेट्रोच्या आखणीमध्ये बाधित होणाऱ्या


इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सर्व संबंधितांची बैठक घेणार- दीपक केसरकर

            मुंबई, दि. 23 :- ठाणे शहरांतर्गत मेट्रोच्या आखणीमध्ये बाधित होत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत शहराचे महापौर, नगरविकास विभागाचे सचिव तसेच महामेट्रोचे कार्यकारी संचालक यांच्या समन्वय समितीत निर्णय घेण्यात येईल. या समितीच्या बैठकीत स्थानिक संबंधित लोकप्रतिनिधींना देखील निमंत्रित करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. हा विषय रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने विधान परिषद सभापतींच्या दालनात सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, असे निर्देश तालिका सभापती प्रसाद लाड यांनी दिले.

            ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच जुन्या इमारतींच्या बांधकामांना मंजुरी नाकारण्याचे प्रकार ठाणे महापालिकेकडून सुरू असल्याने मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नाबाबत विधान परिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            याबाबत झालेल्या चर्चेत नागपूर येथील महामेट्रोशी संबंधित कर्मचाऱ्यांना कंत्राटदार कंपनी वेळेवर वेतन देत नसल्याची बाब सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षात आणून दिली. यावर संबंधित ग्रेट वॉल या कंपनीकडून आता वेळेवर वेतन देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. सदस्य अभिजित वंजारी यांनी देखील चर्चेत सहभाग घेत प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोच्या पुढील टप्प्यांना लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी केली.

राष्ट्रीयत्व

 महाराष्ट्राची राष्ट्रीयत्वाची परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या

- तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी

पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व परीक्षार्थींना मार्गदर्शन.

            नवी दिल्ली, 23 : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व स्वातंत्र्यचळवळीतील महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण असून महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या’, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी आज येथे केले.

            ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आयोजित सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या सत्कार समारंभात आर. एन. रवी बोलत होते. श्री. रवी म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा देशभर विशेष सन्मान केला जातो. मुळात महाराष्ट्राला थोरपुरुष, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आदींची गौरवशाली परंपरा आहे, त्यामुळे राज्याच्या मातीतून भारतीय प्रशासकीय सेवेत येणारे हे अधिकारी आपल्या कार्याचा ठसा उमटवितात. याचा देशाला आभिमान असल्याचेही श्री रवी म्हणाले. राज्याची हीच परंपरा पुढे घेवून जातांना प्रशासन व जनता यामध्ये उत्तम सेतू बनून कार्य करा व त्यासाठी भारतदेश समजून घ्या, असेही त्यांनी सांगितले. 

         श्री. रवी यांनी यावेळी उपस्थितांना आरोग्याची काळजी, वाचन व अभ्यासवृत्ती वृद्धिंगत करणे, आर्थिक स्वावलंबन तसेच आध्यात्मिकशक्ती यांचा उचित समतोल राखण्याविषयीही मार्गदर्शन केले.

             दिल्ली स्थित मराठी अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आज येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले. एकूण तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात राज्यपाल आर. एन. रवी यांच्या हस्ते व लोकपाल सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डी. के. जैन, पुढचे पाऊलचे संस्थापक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास संपकाळ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाच्या सदस्य (वित्त) रेखा रायकर यांच्या उपस्थितीत सनदी सेवा उर्त्तीण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.  


गुणवंतांचा गौरव

           या कार्यक्रमात संदीप शिंदे, प्रशांत बाविस्कर, रणजित यादव, ओंकार शिंदे, अक्षय प्रकाशकर, पवन खाडे, निरंजन सुर्वे, शंतनू मलानी, यश काळे, अर्जित महाजन, विशाल खत्री, रोहन कदम, नितीश डोमळे, स्वप्नील सिसले, अजिंक्य माने, अभिजित पाटील, देवराज पाटील, शुभम भोसले, पद्मभूषण राजगुरू, गिरीष पालवे या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

             तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेची व अभ्यासाची तयारी या विषयी अनुभव कथन केले. तसेच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परिक्षेविषयी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. दुसऱ्या सत्रात उत्तीर्ण उमेदवरांनी परीक्षार्थींना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीविषयी मार्गदर्शन केले. दिल्लीच्या विविध भागात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

          पुढचे पाऊल संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे हे चौथे वर्ष आहे.                                                 

00000

My. बाप

 


ना. ती




 

सुखकर्ता


 

तुला ते आठवेल का सारे

 


Tuesday, 23 August 2022

पशुधन

 विधानपरिषद प्रश्नोत्तरे :

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या

निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक घेणार

- पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील

           

            मुंबई, दि. 23 : अकोला जिल्ह्यातील मागील 18 वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            अकोला येथील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला  उत्तर देतांना मंत्री श्री विखे पाटील बोलत होते.

            या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुकेडॉ. रणजित पाटीलएकनाथ खडसेशशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi