Monday, 22 August 2022

सायबर युनिट

 सायबर युनिट’ अधिक सक्षम करणार

- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 22 : राज्य पोलीस दलाच्या सायबर युनिटमधील यंत्रणा अद्ययावत असून मनुष्यबळ देखील प्रशिक्षित आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान हे सतत बदलत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांच्या सेवा घेवून सायबर युनिट अधिक सक्षम करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. येत्या काळात राज्यातील सायबर शाखेत गुप्तचर यंत्रणा तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            गृहमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, नागरिकांचे दैनंदिन आर्थिक, व्यावसायिक व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ व सोशल मीडियाचा वाढता वापर या कारणांमुळे सायबर गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. या गुन्ह्यांना भौगोलिक कक्षा नसल्याने हे मोठे आव्हान असते. गुन्हेगार नवनवीन तंत्राचा वापर करतात. त्यांना रोखण्यासाठी राज्याचे सायबर युनिट सक्षम आहे. तथापि, बदलत्या तंत्रज्ञानासोबत अद्ययावत राहण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांचीही मदत घेतली जाईल.

            सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी नागरिकांनी देखील दक्ष राहणे आवश्यक असून यासाठी शासनाबरोबरच सोशल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आदी माध्यमांतून जनजागृती होणे गरजेचे असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सिनेमा क्षेत्रात होणारी पायरसी रोखण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळांनी तेथे दिली जाणारी माहिती खरी असेल, जेणेकरून त्या माध्यमातून फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच वेळोवेळी नागरिकांना अवगत करण्यासाठी यासंदर्भात मार्गदर्शिका प्रसारित करून सायबर गुन्ह्यांबाबत माहिती दिली जात असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, राजहंस सिंह, सचिन अहिर आदींनी सहभाग घेतला.


0

दहीहंडी

 दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

गोविंदांबाबतच्या निर्णयांचे केले स्वागत.

            मुंबई, दि. 22 :- दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येत असून जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासह गोविंदांचा विमा उतरविण्याच्या निर्णयाचे दहिहंडी समन्वय समितीने स्वागत केले असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन, आमदार प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, डॉ. बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            दहीहंडीला क्रीडा क्षेत्रामध्ये साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असून समन्वय समितीचे पदाधिकारी आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली आहे, ही समिती दहीहंडीसाठी उभारण्यात येणारे मानवी मनोरे आणि इतर बाबींचा अभ्यास करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरुण पाटील, सचिव सुरेंद्र पांचाळ, गीता झगडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


०००००



 

रिपोर्ट

 


भरती

 मॅनेजर :- तो क्लार्क झोपलाय आणि शिपाई त्याला पिपाणी वाजवून पाणी मारुन उठवतोय. हे काय चाललंय ? 

                                                                           हेडक्लार्क :- साहेब, तो नविन गोविंदा कोट्यातून भरती झालाय ना ? माळ्यावरच्या फायली वगैरे काढायच्या आहेत पण अंगावर पाणी पडल्याशिवाय आणि कानात पिपाणी वाजवल्याशिवाय उठतच नाही तो !!!


😂😂😂😂😂😂😂😂

Tawer

 

ओळखा पाहू, कॉमेंट करा

Nice thinking

  : *Faith is like a smallest lamp in a Darkest Forest. Though it does not show everything at once, but, it does give enough light for oneself to take the next step to be SAFE.                              Anything is possible when you have the right people there to support you.


Good Morning.

प्रो गोविंदा स्पर्धा

 दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

            मुंबईदि. 18 : महाराष्ट्राची  सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) "प्रो गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून विजेत्यांना शासकीय नोकरी देण्यात येईलअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

            विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेराज्य शासनाने दहिहंडी (गोविंदा) या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून "प्रो गोविंदा"  स्पर्धा राबवाव्यातअशी मागणी दहीहंडी उत्सव आयोजकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर  खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            स्पेन व चीन या देशांमध्ये मानवी मनोरे (पिरॅमिड) म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश असून आपल्याकडे असलेल्या कबड्डीखो-खोमल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही समावेश होईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

00000


 

Featured post

Lakshvedhi