Sunday, 21 August 2022

शिक्षकाचा नाद करायचा नाय

 *😄🤣एका वकिलाने आपली विहीर एका शिक्षकाला विकली.कागदपत्रे सर्व व्यवस्थित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वकील शिक्षकाकडे गेला.*  

*वकील : मास्तर. मी तुम्हाला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही. तेव्हा तुम्हाला पाणी हवं असेल तर त्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील.*

*शिक्षक : बरं झालं, आपण आलात आणि विषय काढला. नाहीतर मीच तुमच्याकडे येणार होतो. तर मग आल्यासरशी तुम्ही तुमचं पाणी घेऊन जा नाहीतर माझ्या विहिरीचे भाडे तुम्हाला द्यावे लागेल.* 

*वकील : तसं काही नाही मास्तर, मी थोडीशी तुमची गंमत करत होतो.*

*शिक्षक: लेका, तुझे जज, मामलेदार, तहसीलदार माझ्याकडून शिकून गेलेत.....*

*🤣🤣शिक्षकाचा नादच नाय करायचा🤣🤣*

अपघात

 रत्नागिरीतील मांडवी किनारी नाैका बुडाली; एकजण बेपत्ता, चाैघांना वाचविण्यात यश

ही नाैका राजीवडा येथील इम्रान साेलकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन नाैका असून, ‘इब्राहीम’ असे या नाैकेचे नाव आहे.ही नाैका राजीवडा येथील इम्रान साेलकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन नाैका असून, ‘इब्राहीम’ असे या नाैकेचे नाव आहे. ही नाैका जयगड येथील खलील साेलकर यांनी करारावर घेतली आहे.

मांडवी बंदरातील गाळामुळे राजीवडा येथील मासेमारी नाैका बुडाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी घडली. या बाेटीतील चाैघांना वाचविण्यात यश आले असून, एकजण बुडाला आहे. ओवेस अजूम मखी (२१, रा. जयगड) असे बेपत्ता झालेल्या खलाशाचे नावे आहे.

या नाैकेवर जयगड येथील फईम पाईक शेख (२१), उजेफा निजामुद्दीन मुल्ला (२१), अफरान महेबुब मुजावर (२२), अय्याज गुलाब माखजनकर (२६) आणि ओवेस अजूम मखी पाच खलाशी हाेते. हे सर्वजण जयगड येथील राहणार असून, रविवारी सकाळी मिरकरवाडा येथे नाैका दुरुस्तीसाठी नेत हाेते.

तेथे नाैका दुरुस्त करुन ते जयगड येथे जाणार हाेते. समुद्र खवळलेला असल्याने आज नाैका नेऊ नका, असे इम्रान साेलकर यांनी खलाशांना सांगितले हाेते. मात्र, तरीही पाचजण ही नाैका घेऊन निघाले हाेते. मांडवी बंदराच्या मुखाशी माेठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नाैकांना मासेमारीसाठी जाताना अडचण येत आहे. या गाळात ही नाैका फसल्याने मांडवी समुद्रकिनारी नाैका बुडाली.

ही नाैका बुडाल्याची माहिती मिळताच राजीवडा व भाटकरवाडा येथील नाैकांच्या सहाय्याने चाैघांना वाचविण्यात यश आले. मात्र, नाैकेवरील ओवेस अजूम मखी हा खलाशी बेपत्ता झाला असून, त्याचा शाेध सुरु आहे. स्थानिक मच्छिमारही त्याठिकाणी दाखल झाले असून, तेही बेपत्ता खलाशाचा शाेध घेत आहेत. उर्वरीत चारजणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पत्रकार -राजू मोहिते

Sunday स्पेशल

 


दही हंडी, गोविंदा



 मुरूड रायगड 

 आलिबाग तालुक्यांतील कुरडूस गावची मानाची दहीहंडी अशी ओळखली जाणारी दहीहंडी 😍

ही दहीहंडी विहिरीच्या वर बरोबर मध्याशी बांधली जाते आणि गावातील सगळी पोर विहरी च्या कट्ट्या वर उभे राहून उडी मारून ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात ❤❤❤❤

तो बघ आला

 

सारा पडोळे draw by 

रक्तदान शिबिर

 


Featured post

Lakshvedhi