Friday, 19 August 2022

सूचना, बाल कामगार

 Dear Sir/Madam,

As you are aware, the Government has enacted the "Child & Adolescent Labour (Prohibition and Regulation) Act" in 1986 to eradicate the practice of Child and Adolescent labour in our country.

In this connection, it is necessary that all the Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) across the nation strictly comply with the provisions of the Act to realize the goal of Child-labour free India.

You are also aware that mandatory self-declaration is also taken when an MSME applies for Udyam Registration that no child and adolescent labour will be employed in their premises.

You are requested to strictly adhere to the provisions of the Act. Detailed information relating to the Act can be downloaded from here, which may also be accessed at https://labour.gov.in/childlabour/child-labour-acts-and-rules. Website links to the provisions of the Act are also given on our websites http://msme.gov.in/ and http://dcmsme.gov.in/.

Regards,

Ministry of MSME

Share it on Social Media social icon social icon 

social icon Forward it to a Friend

This message was sent to lakshvedhimm[at]gmail[dot]com from Ministry of Micro, Small & Medium Enterprises through no-reply[at]sampark[dot]gov[dot]in



सूचना

 IF ANY CENTRAL GOVT / BANK / INSURANCE OR CENTRAL GOVT. UNDERTAKING EMPLOYEE DEMANDS BRIBE,

PLEASE COMPLAIN TO CBI ANTI CORRUPTION BRANCH MUMBAI ON MOBILE NO. 8433700000 THROUGH CALL / SMS / WHATSAPP OR EMAIL TO sp1acmum@cbi.gov.in.

आला रे आला , मोबाईल कृष्ण


 

Jai कांन्हाय लाल की






 

Go vinda उपचार free

 जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

            मुंबई, दि 19 : आज दहीहंडी असून कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती.

            त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

००००l

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित.

            मुंबई दि. 19 : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे शासन निर्णय तातडीने जारी केलेले आहेत.

            राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथके सहभागी होत असतात. दरम्यान या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविदांना अपघात होऊन काही गोविंदांना किरकोळ तर काही गोविंदांना गंभीर दुखापत होत असते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक गोविंदा कायमचे अपंग होण्याची देखील शक्यता असते. या गोविंदांना वेळेत आणि निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक असते, त्यामुळे सदर गोविंदांना दहीहंडीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेताना दुखापत झाल्यास राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच नगरपालिकेतील रुग्णालय, दवाखान्यात निःशुल्क उपचार उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

            नगरविकास विभागातर्फे राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या दवाखान्यात निःशुल्क उपचार देण्यात येतील, अशा सूचना या शासन निर्णयात सविस्तरपणे समाविष्ठ केल्या आहेत.

            वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय, दंतमहाविद्यालय रुग्णालयांपैकी कोणत्याही रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यास गोविंदांवर तातडीने मोफत वैद्यकिय उपचार करण्यात येतील. हा शासन निर्णय स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वा पालन न करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचनाही शासननिर्णयात समाविष्ठ करण्यात आली आहे. 

            सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे दवाखाने अशा ठिकाणी निःशुल्क वैद्यकीय उपचार देण्यात यावेत. हा शासन निर्णय स्थायी असून सन २०२२-२३ पासून यापुढे दरवर्षी लागू राहणार आहे, याबाबत स्वतंत्रपणे सर्व माहिती आज दि.19 ऑगस्ट 2022 रोजीच्या तीनही शासन निर्णयात देण्यात आली आहे. सोबत शासन निर्णय जोडलेले आहेत.

०००० 


 


 




 



Best

 



बेस्ट’ला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

· डबलडेकर इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाडी व प्रिमियम बससेवेचे लोकार्पण.

· कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील आवश्यक निधी लवकरच वितरित करणार.

            मुंबई दि 18:- मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या मागण्यासंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट ( बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डबलडेकर इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाडी व प्रिमियम बससेवेचे लोकार्पण तसेच बेस्ट कॉफी टेबल पुस्तक, बेस्ट उपक्रमाची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

            एन.सी.पी.ए च्या टाटा थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमास यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, बेस्ट उपक्रम महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्र हे उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. वाहतूक, विद्युत पुरवठा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी बेस्टने नेहमीच चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कुठलाही ऋतू, नैसर्गिक आपत्ती असो बेस्ट नागरिकांच्या सेवेत अविरत कार्यरत आहे. कोरोनात देखील अखंड सेवा सुरु होती. बदलत्या काळाप्रमाणे आपल्या सेवेत बदल केल्यामुळे बेस्ट यशस्वीपणे सेवा देत आहे. डबलडेकर इलेक्ट्रीक वातानुकूलित बस आणि प्रिमियम बससेवा हे बेस्टच्या बदलाचे उदाहरण आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी बेस्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. मुंबईच्या वीज वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत आहोत. पदवी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बेस्टने पासेस देण्याची कार्यवाही करावी. बेस्टची सेवा जागतिक दर्जाची होण्यासाठी राज्य शासन सर्व प्रकारची आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

            चांगले रस्ते ही प्रगतीची पहिली पायरी आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गामुळे वाहतूक व्यवस्थेसह अर्थकारणातही मोठे बदल झाले. एमएसआरडीसीचे यामध्ये मोठे योगदान आहे. समृद्धी महामार्गामुळे देखील आता असेच मोठे बदल होणार आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा हा महामार्ग ठरेल.  

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर    

            केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच बेस्टचाही अमृत महोत्सव हा अपूर्व योग आहे. ‘बेस्ट’ ही खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून बळकट आणि प्रवाशांना सुविधा देणारी असावी, यावर भर देण्यात येत आहे.

            पर्यावरणपूरक वाहने हेच वाहतूक व्यवस्थेतील पुढील भविष्य असेल. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आहे. याद्वारे पर्यावरणाचे रक्षणही होईल. ‘बेस्ट’चे चलो अॅप प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. बेस्टला केंद्र सरकारही नेहमी मदत करेल. रस्तेबांधणीत आता क्रांतिकारक बदल होत असून डबलडेकर, थ्री लेअर ब्रीज यापुढे बांधावे लागतील. पनवेल जंक्शन विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंबई - दिल्ली हायवे देखील उभारण्यात येणार आहे. बंदरांचा विकासही जलद वाहतूकीत महत्वपूर्ण ठरणार आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते वापरात आणले पाहिजे. पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने आणत आहोत. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील महत्त्वाचे इंधन ठरणार असून या सगळ्या पुढाकारामुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

            विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, ‘बेस्ट’ ही मुंबईची लाईफ लाईन असून बेस्टशिवाय मुंबईकरांचे जनजीवन शक्यच नाही. मुंबईकर बेस्टचे सदैव ऋणी आहेत. पर्यावरण समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. मात्र बेस्ट पर्यावरणपूरक वाटचाल करत आहे हे विशेष. बेस्ट ही मुंबईकरांचा अभिमान असल्याचेही ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.

            महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी प्रास्ताविकात ‘बेस्ट’च्या वाटचालीचा आणि आगामी उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

-----///--------



Featured post

Lakshvedhi