Friday, 19 August 2022

गोपिया

 


कान्हा कान्हा


 

कान्हा कान्हा

 




आज आनंदी आनंद झाला


 तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही.

प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले.

राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती 

पण 

हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !

एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही 

आणि 

राज्य अभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही.

अत्यंत उत्कटपणे नाती निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला.

परत कधीच परतून न येण्यासाठी !! 

त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला.

राधे बरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही. 

ज्या उत्कटतेने त्याने राधे साठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुना बरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कुट नीतीने गाजवले . 

राधे ला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होवून सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हे ही ही सांगितले.

एका पेक्षा एक अभेद्य , अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरती ढगात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता.

ज्या हळूवारपणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवार पणे त्याची बोटे सुदर्शन चक्र ही चालवत असत. 

हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही.

कारण. 

कारण तो कृष्ण होता 

*संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतः चे वचन आहे*

_तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता आहे आणि राहील गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची._

*आयुष्यात कधी कोणाला गुरू करायचा असेल तर नेहमी कृष्ण हा समोर असू द्या.*

*प्रेमळ,जिवलग, धुरंधर राजकरणी, कुटनीती अश्या वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्थिर राहिला आहे.

*श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा*

Thursday, 18 August 2022

शोधा त्या कुंभाराला,गवत्या का नाही

 


म च गया

 


मंत्री परिचय

 विधानपरिषदेत नवनिर्वाचित मंत्री यांचा परिचय


            मुंबई, दि. 17 : विधानपरिषदेत नवनिर्वाचित मंत्री यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला यावेळी करून दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा परिचय सभागृहाला यावेळी करून देण्यात आला.


००००

Featured post

Lakshvedhi