Thursday, 18 August 2022

मंत्री परिचय

 विधानपरिषदेत नवनिर्वाचित मंत्री यांचा परिचय


            मुंबई, दि. 17 : विधानपरिषदेत नवनिर्वाचित मंत्री यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला यावेळी करून दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा परिचय सभागृहाला यावेळी करून देण्यात आला.


००००

 *🌷‼️विचार पुष्प‼️🌷*

*ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे भान असणेआणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे ज्ञान असणे. दुसर्‍याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. सुखाचे अनेक भागीदार भेटतील दु:खाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं...*

*🙏🌹सुप्रभात 🌹🙏*

अवतार

 *कृष्ण*,,,

नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,,

प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,,

जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,,

पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,,

जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,,

दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,,

सातवा अवतार प्रभू राम,,

*राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,,

म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,,,

रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,,

तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,,

मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,,

करा काय करायचं ते,,,😃😃😃

जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,,

कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,,

कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,,,

जीवनाचं सार,,,

प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,,

जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,,

गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,,

म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर्यंत,,,

जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी,,,

ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं,,

किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ,निस्सीम,निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं,,

कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,,,

जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम,,

असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम,,

किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण,,

कृष्णाला 16 हजार 108 बायका,,

त्याचा ही इतिहास,,

ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला,,

अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता,,,

आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे,,

अरे त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती,,,

तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की आधी मग कृष्णाची बरोबरी कर,,,

मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा,,

त्या साठी गीता समजून घेणं महत्वाचं,,

गीते मध्ये काय नाही??

तर गीतेत सर्व आहे,,

जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल,,,

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं,,,

यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं,,

अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं,,

या देशासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो 5 वर्षे तिथे राहिला,,

म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं,,

त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह,माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली,,,

गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं,,

त्याची तयारी करून घेतली ,,,

मग पुढे खरा गूढार्थ सांगितला,,,

विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला 

आधी दिव्य दृष्टी दिली,,,

त्याची तयारी करून घेतली,,

मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे,,

तू फक्त निमित्तमात्र आहेस,,,

असा हा कृष्ण,,

त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको,,,

तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो,,जास्त आवडतो,,

त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच,,,

त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार,,,

ते समजून घेतलं की जीवन समजलं,,

जीवन सफल झालं,,

मनुष्य जीवनमुक्त झाला,,

अशा या कृष्णाला वंदन,,

*श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,*

*हे नाथ नारायण वासुदेव,*

*प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,*

*मुकुंद विष्णू भगवन नमस्ते*!!!

.....जय श्री राधे कृष्णा.....

श्री कृष्णाला *समजून* घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना,,,


 *कुरुक्षेत्रात* युध्दभूमीवर जेव्हा *कर्ण* व *अर्जुन* समोरा-समोर आले तेव्हा,

 कर्णाने *वासुकी* नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले.


 प्रत्येकाला वाटले- आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार...  😳

तितक्यात, 

*श्रीकृष्णाने* आपल्या पायाचा भार रथावर दिला.


 रथ थोडा खाली खचला. 

व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.


नंतर,

सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. 


तेव्हा, 

पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. 


जेव्हा,

पूर्ण युध्द संपले व 

पांडवांचा विजय झाला. तेव्हा, 


श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला,  "आधी तू रथाच्या खाली उतर."

त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. 


त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले  घोडे बाजूला काढले व नंतर च  स्वतः रथाच्या खाली उतरला. 


दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.🔥

जमलेले सर्व जण आश्चर्या ने ते दृश्य पाहत होते. 😳😳


तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतल्या रथ आपोआप कसा काय पेटला

"अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? "🤔


तेव्हा 

*भगवान श्रीकृष्ण म्हणाले की,* 😇


*"युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही  करू शकले नाहीत.*

*ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली.. तेव्हा, ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस."*


त्याच प्रमाणे 

*मानवी देह* आहे.


 *जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण ,आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते* .😥😥😥

  

       *।।जय श्रीकृष्ण।।*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


मला खूप आवडले म्हणून तुम्हाला पाठवले ! 

🙏🏻💐💐  💐💐

ओ बी सी

 इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांकडून विभागाचा आढावा

            मुंबई, दि. 17 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासमोर करण्यात आले.

              मंत्रालयातील परिषद सभागृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व भौतिक योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी उपसचिव (आश्रमशाळा विभाग) कैलास साळुंखे, संचालक सिध्दार्थ झाल्टे, उपसचिव महामंडळे श्री. सहस्त्रबुध्दे, उपसचिव श्री. जनबंधू, महाज्योतीचे व्यवस्थापक प्रदीप डांगे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

           अतिरक्त मुख्य सचिव नंदकुमार सादरीकरणादरम्यान म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी हा विभाग स्वतंत्रपणे काम करत असून विभागामार्फत इतर मागास बहुजन घटकातील नागरिकांसाठी वैयक्त‍िक व समूह विकासाच्या योजना राबविण्यात येतात. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘निपूण भारत’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व वसतीगृह अधीक्षकांसाठी कौशल्य विकसित करण्यात येत आहे.

      “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) ही संस्था या घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणारे इतर उपक्रम व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेसाठी भरीव तरतूद, बंजारा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी या बैठकीत सादर केली.


***



तो आला, आला , आलारे



 

 Every lost game inspires us to try one more time,

Always remember

"Defeat is Temporary, but Giving Up makes it Permanent.."


Good Morning.

सुस्वागतम

 


Featured post

Lakshvedhi