Tuesday, 16 August 2022

राष्ट्रगीत विक्रम

 चला सारेजण राष्ट्रगीत गाऊ या,एक अनोखा विक्रम करू या !

                                 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      मुंबई, दि. १६ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत नियोजित ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम निर्माण करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.


 


         नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान - थोर, स्त्री - पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.


000


 


 



 



मंत्रिमंडळ पद शपथ

 राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार राज्यपालांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ.

       मुंबई, दि. 9 : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

          या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.

          शपथविधी सोहळ्यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांनापद व गोपनीयतेची शपथ दिली.

          राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

0000


                                                           


मा.ना.श्री.विखे पाटील परिचय

 




Sree स्वतंत्रते

 चांभारखिंड गावातून प्रभातफेरी.प्राथमिक जिल्हा प रीषद ,रायगड (चांभारखिंड)शाळेत ध्वजारोहणानंतर गावकरी एकञ जमून चहा नाश्ता आणि गावाच्या विकासासाठी विचारमंथन तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आपले विचार विद्यार्थी आणि गावकर्यांसोबत मांडताना.



सुख दुःख

 सुख दु:ख एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले

" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?" 

त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले

गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,

"पाण्याची चव कशी वाटली ? 

तेव्हा शिष्य म्हणाला, 

"अतिशय खारट".

त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?

शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.

गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."

*विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!

गुरू

 *परिस्थिती हा सर्वात मोठा गुरू आहे..*

*कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कुणीही शिकवू शकत नाही.*******

 


Featured post

Lakshvedhi