एस्टोनिया (युरोप) येथे 5 ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत जागतिक फील्ड तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा पार पडली, या स्पर्धेत भारतासह 47 देशांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत कुर्डुस(अलिबाग) येथील आर्चरी खेळाडू सर्वेश थळे (रौप्य पदक) तर बाळू ढेबे शिरवली (माणगाव) यांचा वरिष्ठांमध्ये सहभाग. या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 14 August 2022
Saturday, 13 August 2022
देशभक्ती गायन
🕉️ ऍक्टिव्हिटी 09🕉️
🚩सेलिब्रेशन ऑफ फेस्टिव्हल्स 🚩
दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी
मुरुड पोलीस ठाणे यांच्या साठी
माळी समाज हॉल मुरुड येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करून सर्व पोलिस बांधव व नागरिकां सोबत स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीबाग लायन्स क्लब प्रेसिडेंट लायन ऍड कला पाटील ,तसेच व्हाईस प्रेसिडेंट लायन संजय रावळे यांनी गीते सादर केली.
धन्यवाद : पोलीस ठाणे मुरुड व ज्येष्ठ समाजसेविका सौ वासंती उमरो
ठकर
हसू किती हसू किती
विरंगुळा.....
🥱🤔-------
गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?
गणेश - खिळ्याला 😀
गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले.
😂😂😂😂😂😂
😱👌मास्तर :- अशी कोणती बाई आहे, तीला १००% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??ू
गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!!
😁😂😬😠
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या 🙋🏻♂: बायकोला माहेरी जाण्यापासून
रोखणे 🤗
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी : "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?.
बंड्या : दुष्काळ
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला..
😝😝😝😂😂😂
ekdam new....
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?
विद्यार्थी - नाही गुरुजी
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!!!!!
--- गुरुजी अजून वर्गात आले नाहीत.
😜🌝😆
🔘 पुणेरी विनोद 🔘
😂🤣एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!!
🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
😂🤣स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
स्थळ : पुणे
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣पाहुणा : अहो camp ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी : २० number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣पुण्याला डेक्कनच्या चौकात cctv कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
पुणेरी स्पेशल
चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣**पुणेरी स्पेशल
बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
��** भन्नाट पुणेरी
बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🤣😂पुणेरी राँग नंबर
अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप ?
अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!!!!?
😆😆😜
🤣😂😜😝😅😅
खळखळुन हसा निरोगी रहा,
मित्रांनो आपणही हसा, आणि दुसऱ्यांनाही हसवा😃हे फक्त पुण्यातच पिकत व सगळीकडे प्रसारीत केल जात म्हणून म्हणतात पुण ते पुणं, आलं का लक्षात!!!
😀😄😄😄😄😄
स्वराज स्वातंत्र्य लढा
स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा'‘दूरचित्रवाणी’ वर रविवारपासून प्रसारीत
नवी दिल्ली, दि. 13 : ‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दूरचित्रवाणीवर दर रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित होणार आहे. या मालिकेचा पहिला भाग उद्या 14 ऑगस्ट 2022 प्रसारित होणार आहे.
'स्वराज - द होल स्टोरी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल' ही एक मेगा ऐतिहासिक लघुपट मालिका आहे. 15 व्या शतकापासून ते 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्भीड, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविला जाईल.
ही मालिका केवळ इंग्रजांनी केलेल्या अन्यायावर नसून तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या 75 ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा, गणेश सावरकर, विनायक दामोदर सावरकर, नाना साहेब, बाजीराव पेशवे, तसेच राणी आबक्का, बक्षी जगबंधू, तिरोत सिंग, सिद्धो कांथो मुर्मू तसेच शिवाप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांसारख्या स्वातंत्र्यावीरांच्या गाथांचा समावेश असणार आहे.
चित्रपट अभिनेता मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका बजावली आहे.
‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ 20 ऑगस्टपासून मराठीत प्रसारित
20 ऑगस्टपासून सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरुन ‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा ’ही मालिका मराठीत प्रसारित होणार आहे. मराठीसह इंग्रजी , तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी अशा 8 प्रादेशिक भाषांमध्येही 20 ऑगस्टपासून रात्री 8 ते 9 वा. यावेळेत प्रसारित केली जाईल.
000
शोर्य पुरस्कार
महाराष्ट्रातील 11 पोलीसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक'जाहीर.
नवी दिल्ली, दि. 13 : सन 2022 च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीसांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन 2022 साठी उत्कृष्ट तपासासाठीचे "केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता तपास पदक" (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation ) आज जाहीर करण्यात आले. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
या पुरस्काराची सुरुवात सन 2018 पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास" जाहीर झाले आहेत.
राज्यातील पोलीसांमध्ये कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त, प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक, मनोज मोहन पवार, सहा. पोलीस निरीक्षक, दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक, अशोक तानाजी वीरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), श्रीमती राणी तुकाराम काळे, सहा. निरीक्षक, दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक, सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक, जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक, समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक यांचा समावेश आहे.
यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे 15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी - कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी - कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशातून पोलीस आहेत. 28 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जन्मभूमी
जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि. 12 (जिमाका): ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हीताचे निर्णय घेतांना प्रेरणादायी ठरेल.’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तापोळा ता. महाबळेश्वर येथे तापोळा ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह तापोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हीताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन हेक्टर पर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगी विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभाण्यावर भर देण्यात येणार आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला कसा जोडला जाईल यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
0000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...




